Market Committee Election : छत्रपती संभाजीनगरमधील बाजार समितीच्या मतमोजणीला सुरुवात; पाहा कुठे काय परिस्थिती
Market Committee Election : आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरवात झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकं कोणाला कौल देणार याचे चित्र तासाभरात स्पष्ट होणार आहे.
Market Committee Election : ग्रामीण राजकारणाचं केंद्र समजल्या जाणाऱ्या राज्यातील बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. त्यापैकी 95 बाजार समित्यांची आज (29 एप्रिल) मतमोजणीला सुरवात झाली आहे, ज्यात छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील बाजार समित्यांचं देखील समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर बाजार समिती, वैजापूर आणि कन्नड या तीन बाजार समितीसाठी शुक्रवारी मतदान झाले. तर आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरवात झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकं कोणाला कौल देणार याचे चित्र तासाभरात स्पष्ट होणार आहे.
बाजारसमिती कशासाठी ओळखली जाते..
- छत्रपती संभाजीनगर बाजार समिती भुसार मालासाठी ओळखली जाते.(गहू, डाळिंब,)
- वैजापूर बाजार समिती कांदा पिकासाठी ओळखली जाते.
- कन्नड बाजार समिती मका, कांदा, प्रमुख कडधान्य, ओळखली जाते
वार्षिक उलाढाल
- छत्रपती संभाजीनगर वार्षिक उलाढाल: 3 कोटी 87 लाख .
- वैजापूर बाजार समिती वार्षिक उलाढाल: 3 कोटी 47 लाख
- कन्नड बाजार समिती वार्षिक उलाढाल: दीड कोटी
कोणा विरुद्ध कोण
- छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीत एवढे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भाजप आमदार हरिभाऊ नाना बागडे विरुद्ध काँग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे अशी लढत होणार आहे.
- वैजापूर बाजार समितीच्या निवडणुकीत शिंदे गट, भाजप विरुद्ध भाजप दुसरा गट, ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादीसह वंचित बहुजन आघाडी एकत्र मैदानात आहे. त्यामुळे येथे आमदार शिंदे गट रमेश बोरणारे विरुद्ध माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर अशी लढत पाहायला मिळत आहे.
- कन्नड बाजार समितीमध्ये एकूण 5 पॅनल निवडणूक लढवत आहेत. सर्वधिक 86 उमेदवार या निवडणुकीत उभे आहेत. उद्धव ठाकरे शिवसेनेचे विद्यमान आमदार उदयसिंह राजपूत विरुद्ध नुकताच बीआरएस मध्ये गेलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव अशी लढत या निवडणुकीत पाहायला मिळेल. या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य भाजपचे किशोर पवार यांच्या नेतृत्वातील पॅनलची सुद्धा मोठी लढत होऊ शकते. तर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांचे शिवशाही शेतकरी विकास पॅनल देखील मैदानात आहे.
राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला...
काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुका गाव पातळीवर झाल्या होत्या. मात्र राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर तालुका पातळीवर पहिल्यांदाच बाजार समितीच्या निमित्ताने मोठी निवडणूक होत आहे. त्यामुळे महत्वाच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तसेच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बाजार समिती निवडणुका ट्रेलर समजला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
APMC Election 2023 Result Live Updates : 95 बाजार समित्यांचा आज निकाल, पाहा राज्यभरातील परिस्थिती