एक्स्प्लोर

Marathwada Weather: आजपासून मराठवाड्यातील 'या' जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Marathwada Weather: सध्या गव्हाची काढणी सुरु असून, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Marathwada Weather : राज्यातील वातावरणात सातत्याने बदल (Climate change) होत असून, हवामान विभागाने (India Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार आजपासून सहा मार्चपर्यंत राज्यातील अनेक भागात पावसाची (Rain) शक्यता वर्तवली गेली आहे. दरम्यान मराठवाड्यातील (Marathwada) छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडसह परभणी जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या गव्हाची काढणी सुरु असून, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सोबतच या पावसाचा इतर पिकांनाही फटका बसण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यात 5 तसेच 6 मार्चला तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या स्वरुपाचा शनिवारी पाऊस होईल. तर 7 मार्चला तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या शक्यता पावसाची आहे.

जालना जिल्ह्यात 7 मार्चला तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यात 7 मार्चला तुरळक ठिकाणी ठिकाणी विजेच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यात 5 ते 7 मार्चदरम्यान गडगडाटासह हलक्या स्वरुपाच्या हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यात पुढील पाच दिवस वाऱ्याचा वेग अधिक राहण्याची शक्यता आहे. वनामकृविच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राने हा हवामान सल्ला दिला आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढली 

सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरु आहे. तर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात गव्हाची काढणी केली जात आहे. मात्र अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तर गव्हाचे पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ पाहताना मिळत आहे. मोठ्या कष्टाने पिकवलेले पीक आता काढणीला आले असतानाच, अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांना पुन्हा नवीन संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. 

आधीच संकटात त्यात आता अवकाळीचं संकट 

यावर्षी शेतकऱ्यांवरील संकट काही थांबता थांबत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कारण खरीप हंगामात सुरुवातीला अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान केले. शेतात अक्षरशः पाणी तुंबल्याने पीके वाहून गेली होती. त्यामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेल्याने, आता रब्बीत काहीतरी हाती येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र आता अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Maharashtra Weather : आजपासून राज्यात पावसासह गारपीट होण्याची शक्यता, द्राक्ष उत्पादक चिंतेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget