Unseasonal Rain: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाला सुरुवात, पुढील चार दिवस अवकाळीची शक्यता
Rain News: रात्री 10 वाजल्यापासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
Chhatrapati Sambhajinagar Rain News: छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यात रविवार रात्रीच्या सुमारास अनेक ठिकाणी पावसाने (Rain) हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. तर आजपासून पुढील चार दिवस जिल्ह्यात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान रात्री 10 पासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह जोरदार वारा देखील पाहायला मिळाला.
दरम्यान रविवारी रात्री जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. ज्यात गंगापूर शहरासह ग्रामीण भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. वैजापूर तालुक्यात आणि शहरात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस पडत होता. यासोबत सिरेसायगाव, बोर दहेगाव, चापनेरसह जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
असा आहे पावसाचा अंदाज!
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 5 ते 8 मार्चदरम्यान वादळवारा आणि विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात काही ठिकाणी वादळवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. ज्यात जिल्ह्यातील विविध ठिकाणी 5 मार्च रोजी 4 मिलिमीटर पावसाची शक्यता आहे, तर 6 मार्च रोजी 13 मिलिमीटर, 7 मार्च रोजी 12 मिलिमीटर, 8 मार्च रोजी 13 मिलिमीटर पावसाची शक्यता आहे. तसेच 5 ते 8 मार्च दरम्यान जिल्ह्यात ढगाळ आणि अंशतः ढगाळ वातावरण असेल.
शेतकऱ्यांनो अशी काळजी घ्या!
सध्या शेतात हरभरा, ज्वारी, गहू, उन्हाळी मका, करडई आदी पिके काढणीला आलेली आहेत. अशा शेतकऱ्यांनी पिकांची काढणी करून तातडीने ढीग मारून ताडपत्रीने झाकून ठेवावे. तसेच स्थानिक वातावरण पाहून पिकांची मळणी करून धान्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे, असा विभागीय कृषी विज्ञान केंद्राने दिला आहे.
Rain News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाला सुरवात, पुढील चार दिवस अवकाळीची शक्यता#Rain #ChhatrapatiSambhajinagar
— Mosin Shaikh (@MosinAbp) March 6, 2023
@abpmajhatv pic.twitter.com/8wpefvbHgA
शेतकरी पुन्हा अडचणीत!
यावर्षीच्या खरीप हंगामात आधी अतिवृष्टी आणि त्यानंतर परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे किमान रब्बीमध्ये तरी दिलासा मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र आता रब्बीच्या हंगामात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तर काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिकांची काढणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ पाहायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Marathwada Weather: आजपासून मराठवाड्यातील 'या' जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता