एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगरच्या राड्यातील आठ जणांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Chhatrapati Sambhaji Nagar : अटकेतील आठ आरोपींनी नियमित जामिनीसाठी अर्ज केला होता.

Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजी नगरमधील राड्या प्रकरणात अटकेत असलेल्या आठ आरोपींचा जामीन कोर्टाने शुक्रवारी (7 एप्रिल) फेटाळला.छत्रपती संभाजीनगर शहरापासून (Chhatrapati Sambhaji Nagar City) जवळच असलेल्या ओहर गावात (Ohar Village) 31 मार्च रोजी दोन गटात वाद झाला होता. वादाचं रुपांतर दगडफेकीत झाल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी तात्काळ गावात धाव घेऊन, परिस्थिती नियंत्रणात आणली होती. तर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करत आरोपींची धरपकड सुरु केली आहे. अटकेतील आठ आरोपींनी नियमित जामिनीसाठी अर्ज केला होता. मात्र प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. एम. माळी यांनी शुक्रवारी आठ जणांचा जामीन अर्ज फेटाळला. 

संभाजीनगरच्या जटवाडा रोडवरील ओहर गावात बॅनर फाडल्याप्रकरणी दोन गटांत झालेल्या राड्याप्रकरणातील आठ आरोपींचा नियमित जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. एम. माळी यांनी शुक्रवारी फेटाळून लावला आहे. भास्कर लिंबाजी पिठोरे (वय 26 वर्षे), अजय दीनानाथ भालकर (वय 34 वर्षे), मोसीन खान मोईन खान पठाण (वय 33 वर्षे), मुजफ्फर मन्‍सूर पठाण (वय 25 वर्षे), फयाज हारुनखाँ पठाण (वय 19 वर्षे), मोसीन रशिदखाँ पठाण (वय 22 वर्षे), मु‍स्तकिन नसीरखाँ पठाण (वय 32 वर्षे) आणि खान समीर अकबर ऊर्फ एमडी समीर (वय 23 वर्षे, सर्व रा. ओहरगाव) अशी आरोपींची नावे आहेत. 

यामुळे जामीन नाकारला...

दरम्यान पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून न्यायालयात नियमित जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. दरम्यान याचवेळी सरकारी वकिलांनी जामीन देण्यावर आक्षेप घेत, आरोपींच्या साथीदारांना अटक करायची आहे. गुन्ह्यात वापरलेली हत्यारे हस्तगत करायची आहेत. आरोपींना जामीन दिल्यास पुन्हा दंगल उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे म्हणत सहाय्यक सरकारी वकील शशिकांत इघारे यांनी आरोपींच्या जामीन अर्जाला विरोध केला होता. दरम्यान न्यायालयाने आठही आरोपींची जामीन फेटाळून लावली आहे. 

किराडपुरा राड्याप्रकरणी तिघांना 10 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात झालेल्या राड्याप्रकरणी पोलिसांनी आणखी तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान त्यांना 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. एम. माळी यांनी दिले आहे. सलमान खान हारुण खान (वय 24 वर्षे, रा. गणेश कॉलनी), शेख फैजान शेख मेहराज (वय 20 वर्षे, रा. किराडपुरा) आणि शेख सर्फराज शेख शफिक (रा. रहेमानिया कॉलनी) अशी आरोपींची नावे आहेत. तर तीनही आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील शशिकांत इघारे यांनी न्यायालयाकडे केली होती, आणि न्यायालयाने ती मान्य करत पोलीस कोठडी सुनावली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या : 

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरच्या राड्यात पोलिसांचा सहभाग?; इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CM Ladki Bahin: विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी भाजपकडून लाडकी बहिणीचं जोरदार प्रमोशन, मुख्यमंत्री शब्द गायब
विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी भाजपकडून लाडकी बहिणीचं जोरदार प्रमोशन, मुख्यमंत्री शब्द गायब
Baba Siddique Murder : 'स्नॅपचॅट'मध्ये ठरला 'गन शॉट'चा प्लॅन, बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट नेमका कसा रचला? खळबळजनक माहिती समोर
'स्नॅपचॅट'मध्ये ठरला 'गन शॉट'चा प्लॅन, बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट नेमका कसा रचला? खळबळजनक माहिती समोर
Ramdas Kadam : त्यांनी शंभरी गाठावी, पण 84 वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं? हे सांगावं; रामदास कदमांचा शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल
त्यांनी शंभरी गाठावी, पण 84 वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं? हे सांगावं; रामदास कदमांचा शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल
Maharashtra News Live Updates : दुपारी 12 वाजता 7 आमदारांचा शपथविधी, निलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडणार
Maharashtra News Live Updates : दुपारी 12 वाजता 7 आमदारांचा शपथविधी, निलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar on Vidhan Sabha Election : 84 होवो, 90 होवो हे म्हातारं काही थांबत नाहीTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 15 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 15 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  15  ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CM Ladki Bahin: विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी भाजपकडून लाडकी बहिणीचं जोरदार प्रमोशन, मुख्यमंत्री शब्द गायब
विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी भाजपकडून लाडकी बहिणीचं जोरदार प्रमोशन, मुख्यमंत्री शब्द गायब
Baba Siddique Murder : 'स्नॅपचॅट'मध्ये ठरला 'गन शॉट'चा प्लॅन, बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट नेमका कसा रचला? खळबळजनक माहिती समोर
'स्नॅपचॅट'मध्ये ठरला 'गन शॉट'चा प्लॅन, बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट नेमका कसा रचला? खळबळजनक माहिती समोर
Ramdas Kadam : त्यांनी शंभरी गाठावी, पण 84 वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं? हे सांगावं; रामदास कदमांचा शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल
त्यांनी शंभरी गाठावी, पण 84 वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं? हे सांगावं; रामदास कदमांचा शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल
Maharashtra News Live Updates : दुपारी 12 वाजता 7 आमदारांचा शपथविधी, निलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडणार
Maharashtra News Live Updates : दुपारी 12 वाजता 7 आमदारांचा शपथविधी, निलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडणार
गर्लफ्रेंडचा क्रूर शेवट ठरला लॉरेन्स बिश्नोईच्या गुन्हेगारीची सुरुवात, प्रेमकहाणीचा थरकाप उडवणारा अंत
गर्लफ्रेंडचा क्रूर शेवट ठरला लॉरेन्स बिश्नोईच्या गुन्हेगारीची सुरुवात, प्रेमकहाणीचा थरकाप उडवणारा अंत
Babar Azam On Virat Kohli: विराट कोहलीसोबतच्या तुलनेवर पाकिस्तानचा बाबर आझम स्पष्टच बोलला; चाहत्यांकडून कौतुकांचा वर्षाव
विराट कोहलीसोबतच्या तुलनेवर पाकिस्तानचा बाबर आझम स्पष्टच बोलला; चाहत्यांकडून कौतुकांचा वर्षाव
70 कोटींच्या बजेटमध्ये कमावले 343 कोटी;  सिंघम किंवा गोलमाल नाही, तर 'हा' ठरला अजय देवगणचा ब्लॉकबस्टर सिनेमा
70 कोटींच्या बजेटमध्ये कमावले 343 कोटी; सिंघम किंवा गोलमाल नाही, तर 'हा' ठरला अजय देवगणचा ब्लॉकबस्टर सिनेमा
Lawrence Bishnoi gang: खोलीसाठी दुप्पट भाडं, शेजाऱ्यांच्या  कुत्र्याशी खेळायचे; सिद्दीकींच्या मारेकऱ्यांचे चेहरे टीव्हीवर पाहताच कुर्ल्यातील पटेल चाळ हादरली
लहान मुलांशी इंग्लिश टॉकिंग, शेजाऱ्यांच्या कुत्र्याशी खेळायचा; सिद्दीकींच्या मारेकऱ्याला पाहताच कुर्ल्यातील पटेल चाळ हादरली
Embed widget