एक्स्प्लोर

Crime News: प्रेमविवाह करण्यासाठी घेतलेले पैसे फेडण्यासाठी मंगळसूत्र चोरी; पोलिसांनी ठोकल्या दोघांना बेड्या

Chhatrapati Sambhaji Nagar : आरोपीला पहिला गुन्हा केल्यावर अवघ्या चार दिवसांत बेड्या ठोकण्यात आला आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar News: प्रेमविवाह करण्यासाठी घेतलेले उसने पैसे फेडण्यासाठी मित्राला सोबत घेऊन चक्क मंगळसूत्र चोरी करणाऱ्याला छत्रपती संभाजीनगर शहर (Chhatrapati Sambhaji Nagar City) पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.  सेवानिवृत्त शिक्षिकेचे दोन तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावल्याचा उस्मानपुरा ठाण्याच्या हद्दीत गुन्हा दाखल करण्यात आलेलं होता, त्याचा तपास करताना पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे आरोपीला पहिला गुन्हा केल्यावर अवघ्या चार दिवसांत बेड्या ठोकण्यात आला आहे. मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. सुनील अरुण सपकाळ (वय 21 वर्षे), रवी उर्फ गोलू एकनाथ महाजन (वय 20 वर्षे, दोघे रा. हायकोर्ट कॉलनी, संग्रामनगर, सातारा परिसर) अशी आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनील आणि रवी हे दोघे सेलगाव (जि. जळगाव) येथील रहिवासी आहेत. दोघेही दूध डेअरी परिसरातील एका नामांकित ज्वेलरी दुकानात ऑफिस बॉय म्हणून कामाला होते. दरम्यान सुनीलने तेथे नोकरीला असलेल्या मुलीसोबतच प्रेमविवाह केला आहे. त्यासाठी त्याने मित्रमंडळींकडून मोठ्याप्रमाणात उसने पैसे जमा केले होते. हे पैसे परत देण्यासाठी संबंधितांनी तगादा लावल्यामुळे सुनीलने मंगळसूत्र चोरी करण्याचा मार्ग निवडला. त्यासाठी त्याने रवीला सोबत घेतले. 

दरम्यान 5 मे रोजी पहाटेच त्यांनी दुचाकी काढली. उस्मानपुरा भागातील देवानगरीत गेले. तेथे एक वृद्धा मॉर्निंग वॉक करीत असल्याचे दिसल्यावर त्यांनी बीड बायपासकडे जाणारा रस्ता विचारला. रवी दुचाकी चालवीत होता. त्याचवेळी सुनीलने निवृत्त शिक्षिकेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावले आणि पोबारा केला. 

पोलिसांनी बेड्या ठोकल्या 

वृद्ध महिलेचं मंगळसूत्र चोरी प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या घटनेचा तपास स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडून करण्यात येत होता. तर गुन्हे शाखेच्या पथकाने घटनेनंतर तत्काळ तपास सुरू केला. यासाठी पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक अमोल म्हस्के आणि प्रवीण वाघ यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेज मिळताच सातारा परिसरातील खबऱ्यांना दाखविले. त्यानंतर सुनील आणि रवी यांची ओळख पटली.  त्यानुसार पोलिसांनी दोघांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच चोरीचा मंगळसूत्र एका ज्वेलर्सला विकला असल्याची माहिती दिली. 

प्रेमविवाह करण्यासाठी घेतलेले पैसे फेडण्यासाठी चोरी

सुनीलने सोबत काम करणाऱ्या मुलीसोबतच प्रेमविवाह केला होता. मात्र या लग्नासाठी त्याने अनेक ओळखीच्या लोकांकडून उसने पैसे घेतले होते. दरम्यान अनेक दिवस उलटून देखील सुनीलकडून त्या लोकांचे पैसे परत करण्यात आले नाही. त्यामुळे उसने पैसे देणाऱ्या लोकांकडून सुनीलकडे मागणी होऊ लागली. पण पैसे नसल्याने चक्क मंगळसूत्र चोरी करण्याचा त्याने निर्णय घेतला. यासाठी त्याने एका मित्राची मदत घेतली. पण पहिल्याच चोरीनंतर त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

इतर महत्वाच्या बातम्या:

Chhatrapati Sambhaji Nagar : जेलमध्ये तंबाखू-सिगारेट घेऊन जाण्यास नकार; आरोपीचा न्यायालयातचं राडा, वॉरंटदेखील फाडले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूर वाघ अन् 'वारां'चा जिल्हा, आम्ही प्रत्येक वारां'चा सन्मान करतो, कारण...; मुनगंटीवारांच्या नाराजीच्या चर्चेवर काय म्हणाले फडणवीस?
चंद्रपूर वाघ अन् 'वारां'चा जिल्हा, आम्ही प्रत्येक वारां'चा सन्मान करतो, कारण...; मुनगंटीवारांच्या नाराजीच्या चर्चेवर काय म्हणाले फडणवीस?
Sanjay Shirsat :  ठाकरे गट फडणवीसांच्या प्रेमात पडलाय, त्याच्या प्रेमाला पवार गट थकलाय; मंत्री संजय शिरसाटांची टीका
ठाकरे गट फडणवीसांच्या प्रेमात पडलाय, त्याच्या प्रेमाला पवार गट थकलाय; मंत्री संजय शिरसाटांची टीका
Novak Djokovic : ऑस्ट्रेलियात मला विष देण्यात आले; टेनिस जगताचा बादशाह नोव्हाक जोकोविचच्या सनसनाटी आरोपाने जग हादरले
ऑस्ट्रेलियात मला विष देण्यात आले; टेनिस जगताचा बादशाह नोव्हाक जोकोविचच्या सनसनाटी आरोपाने जग हादरले
Uddhav Thackeray: अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नाही, ज्यांना जायचंय त्यांनी जा; उद्धव ठाकरेंनी पक्षातील नाराजांना सुनावलं
अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणाऱ्या नगरसेवकांवर उद्धव ठाकरे डाफरले, म्हणाले, 'ज्यांना जायचंय त्यांनी जा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bar Raid Video Viral : ठाकरेंची बदनामी करणारा अंधेरीतील बारचा जुना व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरलSharad Pawar NCP : पालिका निवडणुका तोंडावर असताना तिन्ही पक्षांची चर्चा न झाल्यानं पवारांची नाराजीSantosh Deshmukh Case:Vishnu Chate च्या मोबाईवरून Walmik Karad ने खंडणी मागितली?आवाजाचे सॅम्पल घेणारSanjay Raut PC : मविआतील तिन्ही पक्षात समन्वय राहिला नाही हे सत्य : संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूर वाघ अन् 'वारां'चा जिल्हा, आम्ही प्रत्येक वारां'चा सन्मान करतो, कारण...; मुनगंटीवारांच्या नाराजीच्या चर्चेवर काय म्हणाले फडणवीस?
चंद्रपूर वाघ अन् 'वारां'चा जिल्हा, आम्ही प्रत्येक वारां'चा सन्मान करतो, कारण...; मुनगंटीवारांच्या नाराजीच्या चर्चेवर काय म्हणाले फडणवीस?
Sanjay Shirsat :  ठाकरे गट फडणवीसांच्या प्रेमात पडलाय, त्याच्या प्रेमाला पवार गट थकलाय; मंत्री संजय शिरसाटांची टीका
ठाकरे गट फडणवीसांच्या प्रेमात पडलाय, त्याच्या प्रेमाला पवार गट थकलाय; मंत्री संजय शिरसाटांची टीका
Novak Djokovic : ऑस्ट्रेलियात मला विष देण्यात आले; टेनिस जगताचा बादशाह नोव्हाक जोकोविचच्या सनसनाटी आरोपाने जग हादरले
ऑस्ट्रेलियात मला विष देण्यात आले; टेनिस जगताचा बादशाह नोव्हाक जोकोविचच्या सनसनाटी आरोपाने जग हादरले
Uddhav Thackeray: अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नाही, ज्यांना जायचंय त्यांनी जा; उद्धव ठाकरेंनी पक्षातील नाराजांना सुनावलं
अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणाऱ्या नगरसेवकांवर उद्धव ठाकरे डाफरले, म्हणाले, 'ज्यांना जायचंय त्यांनी जा'
Fact Check : मुनव्वर फारुकीला मारहाण झाल्याचा दावा करत व्हिडीओ व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
मुनव्वर फारुकीला मारहाण झाल्याचा दावा करत व्हिडीओ व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
SN Subrahmanyan:  पत्नीकडे किती वेळ पाहणार? 90 तास काम करा,एल अँड टीचे चेअरमन सल्ला देऊन फसले, ट्रोल होताच कंपनीचं स्पष्टीकरण
एस.एन. सुब्रह्मण्यन यांचं 90 तास कामाचं लॉजिक नेमकं काय? टीका होताच एल अँड टीचं स्पष्टीकरण
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराचं थेट लोणार सरोवरशी कनेक्शन? मेडीकल कॉलेजच्या डीननेच सांगितलं
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराचं थेट लोणार सरोवरशी कनेक्शन? मेडीकल कॉलेजच्या डीननेच सांगितलं
Manoj Jarange Patil : धनंजय देशमुखांना धमकी दिल्याचा आरोप, मनोज जरांगे संतापले, धनुभाऊंचा एकेरी उल्लेख करत म्हणाले...
धनंजय देशमुखांना धमकी दिल्याचा आरोप, मनोज जरांगे संतापले, धनुभाऊंचा एकेरी उल्लेख करत म्हणाले...
Embed widget