HSC Exam: उत्तरपत्रिकांमध्ये एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर, प्राचार्यांच्या चौकशीसह गुन्हा दाखल होण्याची शक्यता
HSC Exam : विशेष म्हणजे या सर्व प्रकरणात गरज पडल्यास शिक्षण मंडळाकडून गुन्हा दाखल करण्याची देखील तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
HSC Exam Scam : बारावीच्या परीक्षेच्या (HSC Exam) भौतिकशास्त्र पेपर तपासणीमध्ये तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत दोन हस्ताक्षर असल्याचे समोर आले होते. त्यामुळे या प्रकरणात केलेल्या चौकशीनंतर एकाच व्यक्तीने या सर्व उत्तरपत्रिका लिहल्या असल्याचे समोर आले. या सर्व प्रकरणात विद्यार्थी, परीक्षा केंद्र संचालक, पर्यवेक्षक, कस्टडियनची यांची सुनावणी झाली होती. मात्र आता मॉडरेटर आणि प्राचार्यांची देखील चौकशी केली जाणार आहे. तर 24 मे पासून ही चौकशी केली जाणार आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रकरणात गरज पडल्यास शिक्षण मंडळाकडून गुन्हा दाखल करण्याची देखील तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
औरंगाबाद विभागात बारावीच्या परीक्षेत भौतिकशास्त्र विषयाच्या तब्बल 372 उत्तरपत्रिकेत दोन हस्ताक्षर आढळून आले होते. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे याची चौकशी करण्यात आली. ज्यात विद्यार्थी, परीक्षा केंद्र संचालक, पर्यवेक्षक, कस्टडियनची यांची चौकशी झाली. दरम्यान या चौकशीनंतर देखील शिक्षण मंडळ उत्तरपत्रिका लिहिणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे या सर्व प्रकरणात आता मॉडरेटर आणि प्राचार्यांची देखील चौकशी करण्याचा शिक्षण मंडळाने निर्णय घेतला आहे. त्यासाठी 24 मे रोजी संबंधित मॉडरेटर आणि प्राचार्यांची चौकशी होणार आहे. या सर्व प्रकरणात काही आर्थिक व्यवहार झाला आहे का? या दृष्टीने देखील चौकशी केली जात आहे. तर या सर्व प्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल करण्याची बोर्डाची तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
प्राचार्यांची चौकशी...
बारावीच्या परीक्षेत भौतिकशास्त्र विषयाच्या तब्बल 372 उत्तरपत्रिकेत दोन हस्ताक्षर आढळून आल्यावर बोर्डाने सुरुवातीला संबंधित विद्यार्थ्यांना नोटीसा पाठवत त्यांची चौकशी केली. मात्र दुसरे हस्ताक्षर कोणाचे आहेत माहित नाही म्हणत विद्यार्थ्यांनी आपली भूमिका मांडली. आम्ही पेपर लिहिल्यावर त्याच्यावर पुन्हा आणखी कोणी उत्तरे लिहिले याबाबत आम्हाला काहीच माहित नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली. तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व उत्तरपत्रिका एकाच संस्थेच्या दोन वेगवेगळ्या महाविद्यालयात तपासणीसाठी गेल्या होत्या आणि तिथेच एका व्यक्तीने या उत्तरपत्रिका लिहिल्या असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ज्या प्राचार्यांकडे तपासणीसाठी हे पेपर गेले होते, त्यांना देखील चौकशीसाठी बोलावले जाणार आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल करण्याची देखील बोर्डाची तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI