एक्स्प्लोर
Political War: 'जेवढं बदनाम केलं, तेवढं देवाने लोकप्रिय केलं', Dhananjay Munde यांचा विरोधकांना टोला
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी परळी तालुक्यातील बोधेगाव येथील एका कार्यक्रमात आपल्या विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. 'जेवढं बदनाम करायचा प्रयत्न केला त्याच्यापेक्षा जास्त परमेश्वराने लोकप्रिय केलं, मन साफ असेल तर नियती सुद्धा आपल्यासोबत राहते,' असे म्हणत मुंडे यांनी त्यांच्यावरील टीकेला उत्तर दिले. परळी तालुक्यातील बोधेगाव (Bodhegaon) येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यावेळी ते बोलत होते. जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद हीच आपली सर्वात मोठी ताकद असल्याचे सांगत, त्यांनी कठीण काळातून बाहेर पडल्याचे संकेत दिले. आपल्या जीवनातील संघर्षांबद्दल बोलताना ते म्हणाले की, माझा जन्म लोकांची सेवा करण्यासाठीच झाला आहे. या कार्यक्रमातून मुंडे यांनी आपल्या राजकीय विरोधकांना एकप्रकारे आव्हानच दिले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















