एक्स्प्लोर

छत्रपती संभाजीनगरच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त; सहा महिन्यात निवडणुका घेण्याचे निर्देश

Chhatrapati Sambhaji Nagar Politics : स्थानिक राजकीयदृष्ट्या ही मोठी घडामोड समजली जात असून, भाजपसाठी मोठा धक्का समजला जात आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar: रोहयो मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्या राजकीय करिअरची जेथून सुरूवात झाली.  संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे (Sant Eknath Cooperative Sugar Factory) संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. तसेच या कारखान्यावर प्रादेशिक सहसंचालक (साखर) शरद जरे यांनी सोमवारी प्रशासक नियुक्त केला आहे. तसेच 6  महिन्यात निवडणुका घेण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहे. स्थानिक राजकीयदृष्ट्या ही मोठी घडामोड समजली जात असून, भाजपसाठी मोठा धक्का समजला जात आहे. तसेच पुढील निवडणूक होईपर्यंत जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मुकेश बारहाते व फुलंब्री येथील सहायक निबंधक (सहकारी संस्था) व्ही. पी. रोडगे यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

पैठण आणि जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहिलेल्या संत एकनाथ कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत 30 जून रोजी संपुष्टात आली. दरम्यान कोरोनाच्या संकटात निवडणुका घेता आल्या नसल्याने, तत्कालीन संचालक मंडळास कामकाज पाहण्यास मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र असे असताना संचालक मंडळास 1 मार्च पूर्वी मतदार यादीसह निवडणूक निधी भरण्याचे आदेश प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाने दिले. परंतु निधी व मतदार यादी सादर न केल्याने संचालक मंडळास नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. 

प्रशासकाची नियुक्ती करण्याचे आदेश, भाजपला धक्का 

संत एकनाथ कारखान्याच्या संचालक मंडळाकडून मतदार यादीसह निवडणूक निधी जमा करण्यात येत नसल्याने प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाने त्यांना नोटीस देऊन सुनावणीसाठी हजर राहण्याचे सांगितले होते. दरम्यान सोमवारी याबाबत झालेल्या सुनावणीत भाजप नेते तथा चेअरमन तुषार शिसोदे यांनी निधी व मतदार यादी सादर करण्यासाठी आणखी सात दिवसांची मुदत द्यावी, अशी विनंती केली होती. परंतु साखर सहसंचालकांनी शिसोदे यांची विनंती फेटाळून प्रशासकाची नियुक्ती करण्याचे आदेश काढले आहे. त्यामुळे तुषार शिसोदे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. 

भुमरेंची पुन्हा सत्ता येणार? 

पैठण तालुक्याच्या राजकारणात संत एकनाथ कारखाना नेहमीच प्रमुख मुद्दा राहिला आहे. विशेष म्हणजे मंत्री संदिपान भुमरे यांचा या कारखान्यावर वर्षोनुवर्षे वर्चस्व राहिले. परंतु सर्व विरोधकांनी एकत्र येऊन हा कारखाना भुमरेंच्या ताब्यातून ओढून आणला. त्यामुळे भुमरे यांनी शरद कारखाना पुन्हा एकदा सुरु करून संत एकनाथ कारखान्यापासून लांब राहणे पसंद केले. मात्र सध्या भुमरे मंत्री आहेत. सोबतच जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहे. अशात आता कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून, पुढील सहा महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भुमरे संथ एकनाथ आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करतील का? अशी चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात सुरु आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या:

ठाकरे गट Vs शिंदे गट! शिरसाटांच्या प्रतिमेला जोडे मारो केल्याने शिवसेना महिला आघाडी पोलिसात जाणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul shewale On MVA : ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात-राहुल शेवाळेUddhav Thackeray Meet Sharad Pawar : उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवार यांची भेट, दीड तास झाली चर्चाABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 02 PM 20 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सAkshay Shinde Fake Encounter : फेक एन्काऊंटर करणारे ते पोलिस काेण? अहवालात काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
डोनाल्ड ट्रम्प यांनी TRUMP मीम कॉइन लाँच करताच 300 टक्के तेजी, गुंतवणूकदार काही तासांमध्येच मालामाल
डोनाल्ड ट्रम्प यांनी TRUMP मीम कॉइन लाँच करताच 300 टक्के तेजी, गुंतवणूकदार काही तासांमध्येच मालामाल   
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
Video: माझा मुलगा निर्दोष होता, आम्ही आजही भीक मागून जगतोय; कोर्टाच्या अहवालावर अक्षयच्या आईची प्रतिक्रिया
Video: माझा मुलगा निर्दोष होता, आम्ही आजही भीक मागून जगतोय; कोर्टाच्या अहवालावर अक्षयच्या आईची प्रतिक्रिया
Akshay Shinde Encounter: निवडणुकीत हिरो बनण्यासाठी 'देवाभाऊचा न्याय'; हिरोगिरीच्या स्पर्धेतून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर; विजय वडेट्टीवारांचं टीकास्त्र
निवडणुकीत हिरो बनण्यासाठी 'देवाभाऊचा न्याय'; हिरोगिरीच्या स्पर्धेतून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर; विजय वडेट्टीवारांचं टीकास्त्र
Embed widget