(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chhatrapati Sambhaji Nagar Crime : पोटच्या लेकीवर वडिलांनीच केला अत्याचार, मुलीची आपबिती ऐकून पोलिसांच्याही डोळ्यात अश्रू
Crime News: अखेर मुलीने शुक्रवारी स्वतः पोलीस ठाणे गाठत पोलिसांना आपबिती सांगितली. त्यानंतर सिडको पोलिसांनी तात्काळ यात गुन्हा दाखल करुन वडिलांना अटक केली आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News: दोन दिवसांपूर्वी सिल्लोड येथे एका मित्रानेच आपल्या मित्राच्या सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली असताना, आता पोटच्या लेकीवर वडिलांनीच अत्याचार केल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) समोर आला आहे. जन्म दिलेल्या वडिलांनीच पोटच्या मुलीवर दोन वर्षे अनन्वित अत्याचार केल्याचे घटनेने संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे पीडित मुलीने आईला वारंवार सांगून देखील तिने याकडे भीतीपोटी दुर्लक्ष केले. त्यामुळे अखेर मुलीने शुक्रवारी (9 जून) स्वतः पोलीस ठाणे गाठत पोलिसांना आपबिती सांगितली. त्यानंतर सिडको पोलिसांनी तात्काळ यात गुन्हा दाखल करुन वडिलांना अटक केली आहे.
उच्चशिक्षणाची स्वप्न पाहणारी 14 वर्षीय पीडित मुलगी कुटुंबातली मोठी मुलगी आहे. तिला एक लहान बहीण असून आई गर्भवती आहे. मात्र दोन वर्षांपूर्वी म्हणजे पीडित मुलगी 12 वर्षांची असतानाच वडिलांनी तिच्यावर अत्याचार सुरु केले. मुलीने आईला हा प्रकार सांगितला, पण याचा कोणताही फायदा झाला नाही. तर घाबरलेल्या मुलीवर वडिलांनी पुढे किळसवाणे प्रकार केले. सातत्याने वाईट हेतूने स्पर्श करणे, न आवडणारी कामे सांगणे सुरु केले. वयानुसार समज यायला लागलेल्या मुलीने मात्र नंतर त्याला विरोध सुरु केला. त्यामुळे या नराधम बापाने तिला बेदम मारहाण केली.
आपबिती ऐकून पोलिसांच्याही डोळ्यात अश्रू आले.
दोन दिवसांपूर्वी पीडित मुलगी घरात एकटीच असताना पुन्हा वडिलांची तिच्यावर वाईट नजर गेली. त्याने थेट तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तिने पुन्हा आईला सांगितले. मात्र, गर्भवती असलेल्या आईने पुन्हा तिलाच शांत केले. मात्र आता तिची सहनशक्ती संपली होती. शुक्रवारी सकाळी 11 वाजता ती याला त्याला विचारत सिडको पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली. मात्र, ती ठाण्यापासून काही अंतरावर दोन तास रडत बसली. महिला पोलीस चहा प्यायला जात असताना त्यांना ही मुलगी दिसली. तिला त्यांनी तात्काळ ठाण्यात नेत पोलीस निरीक्षक संभाजी पवार, सहाय्यक निरीक्षक श्रद्धा वायदंडे यांच्यासमोर नेत सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर हा किळसवाणा प्रकार समोर आला. तर पीडित मुलीची आपबिती ऐकून पोलिसांच्याही डोळ्यात अश्रू आले.
यापूर्वी देखील परिसरातील मुलीवर केला होता अत्याचार
स्वतःच्या मुलीवर गेल्या दोन वर्षांपासून अत्याचार करणाऱ्या या आरोपीवर यापूर्वी देखील एका मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तर 2015 मध्ये परिसरातील एका मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तो सहा महिने कारागृहात होता. मात्र त्यात मुलीच्या कुटुंबाने तक्रार मागे घेतल्याने तो त्यातून सुटला होता. त्यानंतर या नराधमाने आपल्याच मुलीवर अत्याचार करायला सुरुवात केली.
इतर महत्वाच्या बातम्या:
संतापजनक! पन्नास रुपयांचे आमिष दाखवत वडिलांच्या मित्रानेच केला सात वर्षीय चिमुकलीवर बलात्कार