संतापजनक! पन्नास रुपयांचे आमिष दाखवत वडिलांच्या मित्रानेच केला सात वर्षीय चिमुकलीवर बलात्कार
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : एका 7 वर्षीय चिमुकलीवर तिच्या वडिलांच्या 25 वर्षीय मित्राने 50 रुपयांचे आमिष दाखवून बलात्कार केला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : दोन दिवसांपूर्वी एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर 6 जणांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच छत्रपती संभाजीनगर जिल्हा (Chhatrapati Sambhaji Nagar District) पुन्हा एका चिमुकलीवर झालेल्या बलात्काराच्या (Rape) घटनेने हादरून गेला आहे. एका 7 वर्षीय चिमुकलीवर तिच्या वडिलांच्या 25 वर्षीय मित्राने 50 रुपयांचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शेख मुनवर ऊर्फ मंनू अनीस शेख असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिल्लोड शहरातील एका 7 वर्षीय चिमुकलीवर तिच्या वडिलांच्या 25 वर्षीय मित्राने 50 रुपयांचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना 5 जून रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शुक्रवारी सिल्लोड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे यातील आरोपी शेख मुनवर ऊर्फ मनू अनीस शेख हा मुलीच्या वडिलांचा मित्र आहे. तर मुलीच्या आईने याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली.
डॉक्टरांनी तपासून बलात्कार झाल्याचे सांगितले
मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, मुलीस 50 रुपयांचे आमिष दाखवून आरोपीने 5 जून रोजी संध्याकाळी त्याच्या घरात नेऊन बलात्कार केला. तसेच कुणाला काही सांगितले तर जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे भीतीपोटी या चिमुकलीने याबाबत कोणाला सांगितले नाही. परंतु त्रास होत असल्याने पीडित चिमुकलीने 9 जून रोजी सकाळी आईला याबाबत सांगितले. त्यानंतर आईने तिला रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तपासून बलात्कार झाल्याचे सांगितले.
त्यानंतर पीडितेच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने आपबीती सांगितली. त्यानंतर पीडितेच्या आईने सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात 9 जून रोजी सायंकाळी याबाबत फिर्याद दिली. त्यावरून आरोपी शेख मुनवर ऊर्फ मनू अनीस शेख याच्या विरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपीला त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नालंदा लांडगे करीत आहेत.
मित्राच्या मुलीवरच केले अत्याचार...
पिडीत चिमुकलीचे वडील आणि आरोपी शेख मुनवर ऊर्फ मनू अनीस शेख मित्र आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची एकमेकांची ओळख आहे. दरम्यान याचाच फायदा घेत मुनवर याने आपल्या मित्राच्या मुलीला पैश्याचे आमिष दाखवून स्वतः च्या घरात नेले. तसेच तिच्यावर अत्याचार केला. तर याबाबत कोणालाही काहीही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र जेव्हा हा सर्व प्रकार समोर आला तेव्हा मुलीच्या वडीलांना धक्काच बसला. मित्र म्हणून सोबत राहणाऱ्या मित्रानेच आपल्या मुलीवर अत्याचार केल्याचे समजल्यावर त्यांना मोठा धक्का बसला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: