(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आईने गॅसवर ठेवलेले गरम पाण्याचे पातेले अंगावर उलटले; अवघ्या पंधरा महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू
Chhatrapati Sambhaji Nagar : शहरातील उस्मानपुरा भागात ही घटना घडली आहे. नुरेन अजिम सय्यद असे मयत चिमुकलीचे नाव आहे.
छत्रपती संभाजीनगर : एकीकडे संपूर्ण देशभर नवीन वर्षाचे स्वागत केले जात असतांना, दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरातील घडलेल्या काही दुर्दैवी घटनांनी खळबळ उडाली आहे. आईने गॅसवर ठेवलेले गरम पाण्याचे पातेले अंगावर उलटल्याने अवघ्या पंधरा महिन्यांची चिमुकलीचा मृत्यू (Death) झाला आहे. शहरातील उस्मानपुरा भागात ही घटना घडली आहे. नुरेन अजिम सय्यद असे मयत चिमुकलीचे नाव आहे.
अधिक माहितीनुसार, अजिम सय्यद हे शहरातील उस्मानपुरा भागात राहतात. त्यांना 15 महिन्याची नुरेन नावाची मुलगी होती. दरम्यान, नुरेनाच्या वडिलांसाठी आईने गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते. मात्र, पाण्याचे पातेले अंगावर पडल्याने नुरेना गंभीर भाजली. आई-वडिलांनी तिला तात्काळ शासकीय घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, शनिवारी सकाळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेने सय्यद कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. तर, परिसरात या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे.
विजेचा धक्का लागून मुलाचा मृत्यू...
दुसऱ्या एका घटनेत, बहिणीकडे राहायला आलेल्या घराच्या पत्र्यावरील बॉल काढण्यासाठी तो छतावर चढला आणि छतावरून मृत भूषण वाढाई गेलेल्या हायटेन्शन विद्युत पुरवठा तारेचा शॉक लागून जागीच दगावला. चिमुकल्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. भूषण वाढाई असे मयत मुलाचे नाव आहे. भूषण वाढाई हा मूळचा वर्धा जिल्ह्यातील आहे. मात्र, शहरातील वाळूज भागातील रांजणगावमध्ये बहिणीच्या घरी तो आला होता. दरम्यान, शेजारच्या मुलांसोबत खेळत असताना तो पत्र्यावरील बॉल काढण्यासाठी चढला असता, हायटेन्शन तारांचा जबर धक्का लागून तो पत्र्यावरून खाली कोसळला. शेजाऱ्यांनी त्याला तत्काळ घाटीत दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.या घटनेने देखील परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कारखान्यात आग, 6 कामगारांचा होरपळून मृत्यू...
दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज भागात असलेल्या एका कारखान्यात आग लागून 6 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास समोर आली आहे. शनिवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास ही आग लागली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे एकूण 6 बंब घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, यात 6 लोकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी भेट दिली असून, या संपुर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याची माहिती भुमरे यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
डोळ्यासमोर भीषण आग, बाहेर पडण्याचा मार्गही बंद; आगीत बचावलेल्या कामगारानं सांगितला सुटकेचा थरार