डोळ्यासमोर भीषण आग, बाहेर पडण्याचा मार्गही बंद; आगीत बचावलेल्या कामगारानं सांगितला सुटकेचा थरार
Chhatrapati Sambhaji Nagar Fire : एवढ्या भीषण आगीत आणि त्यातल्या त्यात बाहेर पडण्याचा मार्गही बंद झाल्यावर देखील चार कामगारांनी समयसूचकता दाखवत स्वतःचा जीव वाचवला आहे.
![डोळ्यासमोर भीषण आग, बाहेर पडण्याचा मार्गही बंद; आगीत बचावलेल्या कामगारानं सांगितला सुटकेचा थरार Chhatrapati Sambhaji Nagar waluj midc fire worker who survived fire narrated incident 6 people died in fire marathi news डोळ्यासमोर भीषण आग, बाहेर पडण्याचा मार्गही बंद; आगीत बचावलेल्या कामगारानं सांगितला सुटकेचा थरार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/31/61834275fcfdde087cfe15b67a38314c1703994548247737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Chhatrapati Sambhaji Nagar Fire : छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhaji Nagar) वाळूज एमआयडीसीमध्ये (Waluj MIDC) हातमोजे बनविणाऱ्या एका कारखान्यात भीषण आग (Fire) लागल्याची घटना मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास घडली. या आगीत 10 जण अडकले होते. ज्यात 6 जणांचा जागीच आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे कारखान्यातून बाहेर पडण्याच्या मुख्य गेटवरच आग लागल्याने कामगारांना बाहेर पडताच आले नाही. मात्र, एवढ्या भीषण आगीत आणि त्यातल्या त्यात बाहेर पडण्याचा मार्गही बंद झाल्यावर देखील चार कामगारांनी समयसूचकता दाखवत स्वतःचा जीव वाचवला आहे.
आगीत बचावलेल्या कामगारानं सांगितला सुटकेचा थरार
दरम्यान या आगीत बचावलेल्या अली अकबर यांनी या घटनेची माहिती देतांना सांगितले की,“आम्ही सर्वजण कंपनीत झोपलो होतो. कंपनीतील काम देखील बंद झाले होते. आमच्यातील एकजण रात्री बारा वाजेच्या सुमारास आला आणि तो देखील झोपी गेला. थोड्या वेळाने आम्हाला गरम वाटायला लागले.त्यामुळे नेमकं काय झाले हे पाहण्यासाठी आम्ही उठलो. त्यावेळी कंपनीत आग लागल्याचे आम्हाला दिसले. आम्ही सर्वांना झोपेतून उठवले. आग लागल्याने कंपनीत एकच गदारोळ उठला आणि सगळे ओरडू लागले. बाहेर निघण्याच्या मार्गावरच आग लागल्याने बाहेर पडणे अशक्य झाले होते. याचवेळी आम्ही कंपनीत असलेली एक सीडी लावून कंपनीचे वरील पत्र बाजूल करून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पत्र्यावर येऊन एका झाडाच्या मदतीने आम्ही चार लोकं बाहेर पडलो. मात्र, इतर लोकांना बाहेर पडणं अशक्य झाले आणि ते अगीतीच अडकल्याचे अली अकबर म्हणाले.
काम संपल्यावर कामगार कंपनीतच झोपले...
यापूर्वी ही कंपनी रात्री देखील चालू असायची. मात्र, मागील काही दिवसांपासून रात्री कंपनी बंद ठेवण्यात येत होती. काही कामगार गावी गेल्याने कंपनी रात्री बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता. दरम्यान, सध्या एका शिफ्टमध्ये काम चालायचे. मात्र, काम बंद झाल्यावर काही कामगार कंपनीतच झोपायचे. त्यानुसार शनिवारी देखील काम बंद झाल्यावर अंदाजे 10 ते 15 कामगार कंपनीत झोपले होते.
'त्या' 6 जणांना जीव वाचवता आला नाही...
जेव्हा कंपनीत आग लागली तेव्हा कंपनीत 10-15 कामगार झोपले होते. अचानक लागलेल्या आगीनंतर हे कामगार जागी झाले. जीव वाचवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत होते. मात्र, आग भीषण असल्याने जीव वाचवणे अवघड होते. अशात चार कामगारांनी सीडी लावून वरच्या बाजूने बाहेर पडले. याचवेळी चार-पाच लोकांनी कारखान्याच्या खालच्या बाजूने पत्रा तोडून बाहेर पडत जीव वाचवला. मात्र, यातील 6 जणांना जीव वाचवला आल नाही आणि त्यांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला. याचवेळी कंपनीत एका कुत्रा देखील होता आणि त्याचा देखील आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! छ.संभाजीनगरमध्ये हँडग्लव्ह बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, 6 कामगारांचा होरपळून मृत्यू
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)