एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

औरंगाबाद शहराच्या रस्त्यावर पोलिसच पोलीस, तब्बल 7270 पोलिसांचा बंदोबस्त

Aurangabad : औरंगाबाद शहरात पुढील चार दिवसांसाठी 7 हजार 270 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

औरंगाबाद : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन (Marathwada Liberation Day) , मंत्रिमंडळाची बैठक आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचा दौरा पाहता पुढील चार दिवस औरंगाबाद (Aurangabad) शहरात रस्त्यावर पोलिसच पोलीस पाहायला मिळणार आहे. कारण एकट्या औरंगाबाद शहरात पुढील चार दिवसांसाठी 7 हजार 270 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यासाठी इतर जिल्ह्यातून देखील पोलिसांचा फौजफाटा मागविण्यात आला आहे. विशेष म्हणजे या पोलीस बंदोबस्तात 10 पोलीस अधीक्षक व अप्पर अधीक्षक, 30 उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.

काय आहे शहरात? 

पुढील चार दिवस औरंगाबाद शहरात विविध कार्यक्रम होत आहे. जात 16 सप्टेंबरला मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे, 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृतमहोत्सव आहे. सोबतच 17 तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्र नायडू, सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई, कर्नाटक, मद्रास खंडपीठातील न्यायमूर्ती, देशाचे अतिरिक्त महाअधिवक्ता शहरात असणार आहे. तर, मंत्रिमंडळाची बैठक असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ शहरात असणार आहे. या सोबतच सर्व आमदार आणि उच्चपदस्थ अधिकारी देखील शहरात असणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर औरंगाबाद सह इतर सहा जिल्ह्यातून पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे.

बाहेरून आलेला पोलीस बंदोबस्त?

  • या सर्व पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात पुढील चार दिवस तगडा बंदोबस्त असणार आहे.
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना झेड प्लस सुरक्षा पुरवली जाणार आहे.
  • यासाठी बुलेटप्रूफ वाहन, अन्य दहा वाहने, जामर, एनएसजी कमांडो, यासह 55 कर्मचाऱ्यांचा सुरक्षा कवच असणार आहे.
  • सोबतच इतर जिल्ह्यातून देखील पोलीस बंदोबस मागवण्यात आला आहे.
  • ज्यात 10 पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक
  • 30 सहाय्यक आयुक्त/उपाधीक्षक, 160 पोलीस निरीक्षक
  • 400 सहाय्यक निरीक्षक/उपनिरीक्षक असणार आहे.
  • 2800 महिला पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे.
  • यासोबत 20 वाहतूक कर्मचारी, 150 होमगार्ड, 500 एसआरपीच्या 4 तुकड्या,6 बॉम्बशोधक नाशक पथक बंदोबस्तावर राहणार आहेत.

स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त?

  • औरंगाबाद शहर पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली तीन उपायुक्त बंदोबस्तावर असणार आहे.
  • पाच सहाय्यक पोलीस आयुक्त बंदोबस्तावर असणार आहे.
  • 25 वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचा देखील बंदोबस्तात सहभाग असणार आहे.
  • 96 पोलीस सहाय्यक निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश.
  • सोबतच औरंगाबाद शहर पोलीस दलातील 3 हजार 200 पोलीस सलग तीन दिवस बंदोबस्तात असणार आहे.

रस्त्यांवर 'पोलिस आणि पोलिसचं...'

आज पासून पुढील चार दिवस औरंगाबाद शहरातील वेगवेगळ्या भागात पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. कारण या चार दिवसात शहरात वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त व्हीआयपी शहरात असणार आहे. सोबतच मंत्रिमंडळात बैठक असल्याने अनेक आंदोलन होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुढील चार दिवस शहरात रस्त्या रस्त्यावर 'पोलीस आणि फक्त पोलीसच' पाहायला मिळणारा आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Amit Shah: अमित शहा 16 सप्टेंबर रोजी औरंगाबाद दौऱ्यावर, मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या कार्यक्रमाला लावणार हजेरी; सभेचंही नियोजन?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Guinea Football Match : फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
Rohit Pawar: एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा इशारा
विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा इशारा
बाळासाहेब थोरातांना पोस्टल मते 70 टक्के, मग EVM मध्ये मागे कसे, ठाकरे गटाने प्रेझेंटेशन मांडलं
बाळासाहेब थोरातांना पोस्टल मते 70 टक्के, मग EVM मध्ये मागे कसे, ठाकरे गटाने प्रेझेंटेशन मांडलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 02 December 2024Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 3 PM : 02 डिसेंबर 2024 : ABP MajhaMahayuti Sarkar Oath Ceremony News : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबरला, आसन व्यवस्था कशी असणार?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 2 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Guinea Football Match : फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
Rohit Pawar: एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा इशारा
विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा इशारा
बाळासाहेब थोरातांना पोस्टल मते 70 टक्के, मग EVM मध्ये मागे कसे, ठाकरे गटाने प्रेझेंटेशन मांडलं
बाळासाहेब थोरातांना पोस्टल मते 70 टक्के, मग EVM मध्ये मागे कसे, ठाकरे गटाने प्रेझेंटेशन मांडलं
Rishabh Pant And Shreyas Iyer Qualification : IPL इतिहासातील सर्वात महागडे ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर कितवीपर्यंत शिकले?
IPL इतिहासातील सर्वात महागडे ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर कितवीपर्यंत शिकले?
Chhagan Bhujbal : खरंच गृहमंत्रीपदावरून महायुतीची गाडी अडली? छगन भुजबळांनी सांगितलं कारण; म्हणाले, मोदी-शाह...
खरंच गृहमंत्रीपदावरून महायुतीची गाडी अडली? छगन भुजबळांनी सांगितलं कारण; म्हणाले, मोदी-शाह...
किमान कुराणची तरी लाज ठेवायची, राज्यात एमआयएमच्या पराभवानंतर असदुद्दीन ओवैसींनी सज्जाद नोमानींवर डागली तोफ
किमान कुराणची तरी लाज ठेवायची, राज्यात एमआयएमच्या पराभवानंतर असदुद्दीन ओवैसींनी सज्जाद नोमानींवर डागली तोफ
Suryakumar Yadav And Devisha Shetty Love Story : आयुष्यातील पहिलं प्रेम ते आयुष्याचे साथीदार; साऊथ इंडियन फॅमिलीमधील देविशा शेट्टी अन् सूर्यादादाच्या पहिल्या भेटीची भन्नाट कहाणी
आयुष्यातील पहिलं प्रेम ते आयुष्याचे साथीदार; साऊथ इंडियन फॅमिलीमधील देविशा शेट्टी अन् सूर्यादादाच्या पहिल्या भेटीची भन्नाट कहाणी
Embed widget