एक्स्प्लोर

Samriddhi Highway Accident : आरटीओने ट्रक अडवला अन् चालकाने ब्रेक मारला, समृद्धीवरील अपघाताची धक्कादायक माहिती आली समोर

Accident : आरटीओच्या पथकाने अडवल्याने ट्रक चालकाने अचानक ब्रेक मारला आणि मागून धरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हल्स बस चालकाला काही कळण्याच्या आतच बस उभ्या ट्रकवर जाऊन धडकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोलनाका भागातील समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway) ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, 12 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मात्र, या अपघाताबाबत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. आरटीओच्या पथकाने अडवल्याने ट्रक चालकाने अचानक ब्रेक मारला आणि मागून धरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हल्स बस चालकाला काही कळण्याच्या आतच बस उभ्या ट्रकवर जाऊन धडकली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अधिक माहितीनुसार, ट्रॅव्हल्स बसमधील सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील आहे. या ट्रॅव्हल्स बसमध्ये एकूण 36 प्रवासी होते. हे सर्वजण बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गाचे दर्शन करून पुन्हा नाशिककडे परत निघाले होते. ज्यात काही लहान मुलांचा देखील समावेश होता. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावर आल्यावर बसच्या पुढे एक ट्रक चालत होता. मात्र, जांबरगाव टोलनाक्याच्या जवळ ट्रकला अचानकपणे एका आरटीओच्या पथकाने हात दाखवत थांबण्याचा इशारा केला आणि ट्रक चालकाने जागेवरच ब्रेक मारला. त्यामुळे मागून येणाऱ्या ट्रॅव्हल्स बस चालकाला काही कळण्याच्या आता धरधाव वेगाने येणारी ट्रॅव्हल्स बस ट्रकवर जाऊन धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रॅव्हल्स बसच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. 

अपघातात 12 जणांचा मृत्यू... 

छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघतात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 23 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका 5 वर्षीय बालकाचा देखील समावेश आहे. सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील असून ते बुलढाणा येथील सैलानी बाबाच्या दर्शनासाठी गेले होते. मात्र, परत जातांना त्यांच्या गाडीला अपघात झाला. 

मदतीसाठी नागरिकांची धाव... 

छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर अनेकजण थेट रुग्णालयात पोहचले. शक्य होईल त्या पद्धतीने प्रत्येकजण जखमींना मदत करण्याचा प्रयत्न करत होता. तर, वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी देखील माहिती मिळताच रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली. तसेच, डॉक्टरांना सूचना दिल्या. 

संबंधित बातम्या: 

मोठी बातमी! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दहा ते बारा जणांचा मृत्यू; घटनास्थळी मदतकार्य सुरू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Visit Ajit Pawar Home : सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या मातोश्रीची भेटUddhav Thackeray Speech | खुर्चीवरून शिंदेंवर टीका, आरक्षणासाठी मनोज जरांगे, हाकेंना केलं आवाहनMCA Stadium : एमसीए उभारणार ठाण्यामध्ये भव्य स्टेडियम, सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षाManoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
Embed widget