एक्स्प्लोर

मोठी बातमी! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दहा ते बारा जणांचा मृत्यू; घटनास्थळी मदतकार्य सुरू

Samriddhi Highway Accident : समृद्धी महामार्गाच्या वैजापूर येथील जांबरगाव टोल नाक्याजवळ ही घटना घडली आहे. सध्या घटनास्थळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे.

Samriddhi Highway Accident : छत्रपती संभाजी नगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway) मोठा अपघात झाला आहे. अपघातात दहा ते बारा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यात काही लहान बालकांचा देखील समावेश आहे. सैलानी येथील दर्गाला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला हा अपघात झाला असल्याचे कळत आहे. समृद्धी महामार्गाच्या वैजापूर येथील जांबरगाव टोल नाक्याजवळ ही घटना घडली आहे. सध्या घटनास्थळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे. रात्री एक ते दीड वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावरील जांबरगाव टोलनाक्याजवळ एका ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातात दहा ते बारा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रॅव्हल्स बसमधील प्रवासी बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा येथील दर्ग्याचे दर्शन घेऊन परत जात असतांना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स बसने ट्रकला मागून जोरात धडक दिल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. धक्कादायक म्हणजे अपघातात मृत व्यक्तींमध्ये काही लहान मुलांचा देखील समावेश आहे. हे सर्व भाविक नाशिक जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येत आहे.
मोठी बातमी! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दहा ते बारा जणांचा मृत्यू; घटनास्थळी मदतकार्य सुरू

ट्रॅव्हल्समध्ये एकूण 30 जण करत होते प्रवास

समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स बसमधील सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील आहे. या ट्रॅव्हल्स बसमध्ये एकूण 30 प्रवासी होते. हे सर्वजण बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गाचे दर्शन करून पुन्हा नाशिककडे परत निघाले होते. ज्यात काही लहान मुलांचा देखील समावेश होता. तर, अपघातात 10 ते 12 जणांचा मुत्यु झाला असून, ज्यात लहान मुलांचा देखील समावेश आहे. तसेच काही महिला देखील आहेत.

अपघातातील मृतांची नावं 

  1. तनुश्री लखन सोळसे ( वय 5 वर्षे, रा. समतानगर,नाशिक)
  2. संगीता विलास आठवले (वय 40 वर्षे,वणसगाव, निफाड,नाशिक)
  3. अंजाबाई रमेश जगताप (वय 38 वर्षे, रा. राजूनगर नाशिक)
  4. रतन जमधडे (वय 45 वर्षे, संत कबीर नगर नाशिक)
  5. काजल लखन सोळसे (वय 32 वर्षे, गवळाणी नाशिक)
  6. रजनी गौतम तपासे (वय 32 वर्षे, गवळाणी नाशिक)
  7. हौसाबाई आनंदा शिरसाट (वय 30 वर्ष, उजगाव निफाड, नाशिक)
  8. झुंबर काशिनाथ गांगुर्डे (वय 50 वर्षे, रा. राजूनगर नाशिक)
  9. अमोल झुंबर गांगुर्डे (वय 18 वर्षे)
  10. सारिका झुंबर गांगुर्डे (वय 40 वर्षे)
  11. मिलिंद पगारे (वय 50 वर्षे, कोकणगाव ओझर, निफाड, नाशिक)
  12. दीपक प्रभाकर केकाणे (वय 47 वर्षे, रा. बसमत पिपळगाव नाशिक)

स्थानिक आले मदतीला धावून...

वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोलनाक्याजवळ हा भीषण अपघात झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच वैजापूरसह आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करण्यात आली. सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच, घटनास्थळी समृद्धी महामार्गावरील बचाव पथक, वैजापूर पोलीस देखील दाखल झाले असून, मदतकार्य सुरू आहे.

मोठी बातमी! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दहा ते बारा जणांचा मृत्यू; घटनास्थळी मदतकार्य सुरू

मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश...

छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोल नाक्याजवळ झालेल्या अपघातात दहा ते बारा जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. ज्यात काही लहान मुलांचा देखील समावेश असल्याचं समोर आलं आहे. तसेच काही महिला देखील या अपघातात मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. तर सर्व जखमी अपघातग्रस्तांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या:

Beed Accident : मजुरांना घेऊन जाणारा पिकअप पलटी; 40 मजूर जखमी; सोयाबीन काढण्यासाठी शेतात निघाले होते

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?

व्हिडीओ

Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
Embed widget