एक्स्प्लोर

मनोज जरांगेंचा बॅनर फाडला, पोलिसांत गुन्हा दाखल; 'एफआयआर'मध्ये छगन भुजबळांचं नाव

ओ.बी.सी. एल्गार मेळाव्यात बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनीचं मराठा समाजाचे आरक्षणाचे बॅनर काढण्याचे  वक्तव्य केले होते. त्यामुळेचे बॅनर फाडण्यात आल्याचा आरोप पोलिसांच्या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर: गवळी शिवरा परिसरात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange)  यांचा फोटो असलेला साखळी उपोषणाचा बॅनर लावण्यात आला होता. या बॅनरवरील मनोज जरांगे यांच्या फोटो अज्ञात इसमाने फाडला आहे. खोडसाळपणा करून हे बॅनर फाडल्या प्रकरणी   शिल्लेगाव पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा खोडसाळपणा कोणी केला याचा पोलीस शोध घेत असून यामुळे यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे ओ.बी.सी. एल्गार (OBC Sabha) मेळाव्यात बोलताना मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal)  यांनीचं मराठा समाजाचे (Maratha Reservation) आरक्षणाचे बॅनर काढण्याचे  वक्तव्य केले होते. त्यामुळेचे बॅनर फाडण्यात आल्याचा आरोप पोलिसांच्या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. तर,संदीप भाऊसाहेब औताडे यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, थेट भुजबळ यांचे एफआरमध्ये नाव आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार,  शुक्रवारी अंदाजे दुपारी 2.30 च्या सुमारास  हा बॅनर फाडण्यात आला. पवन केरे यांनी फोनद्वारे बॅनर फाडल्याची माहिती दिली. नागपूर ते मुंबईला जाणाऱ्या रस्त्यावरील आरापूर शिवारातील गवळी शिवरा कमानीजवळ मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांचा साखळी उपोषणाचे बँनर फाडण्यात आले आहे. याची माहिती मिळताच  बबनराव डुबे पाटील, संदीप जालींदर औताडे यांच्यासह दुपारी 3 च्या सुमारास पाहणी केली. बँनरवरील मनोज जरांगे पाटील आणि साखळी उपोषणाचा मजकूर  फाडून बॅनरचे नुकसान केल्याचे दिसले. त्यानंतर ठाणे शिल्लेगाव पोलिस स्थानकात येऊन तक्रार दाखल केली. 

छगन भुजबळांवर कारवाई करण्याची मागणी

जालन्यातील ओबीसी मेळाव्यात मार्गदर्शन करताना छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य केले. एवढच नाही तर  त्यांनी महाराष्ट्रामध्ये गावोगावी लावलेले मराठा समाजाचे आरक्षणाचे बँनर काढून टाका अशा प्रकारचे चिथावणीखोर वक्तव्य  जाहीर सभेत केले. त्यांच्या या वक्तव्यानंतरच बॅनर फाडल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. सर्व प्रकरास छगन भुजबळ हे जबाबदार असून त्यांच्या विरुद्ध प्रक्षोभक भाषण करुन दोन समाजात तेढ निर्माण करणे, जातीय सलोखा बिघडवणे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करुन सकल मराठा समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. मंत्री छगन भुजबळ यांचे विरुध्द कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

Chhagan Bhujbal : तो पाचवी तरी पास आहे का? माझ्या शेपटीवर पाय द्यायचा प्रयत्न करू नकोस; छगन भुजबळांचे मनोज जरांगेंना थेट इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धंदे से बडा कोई धर्म नही होता; महाकुंभमेळ्यात नाविक कुटुंबाने 45 दिवसांत कमावले 30 कोटी, भुवया उंचावणारी सक्सेस स्टोरी
धंदे से बडा कोई धर्म नही होता; महाकुंभमेळ्यात नाविक कुटुंबाने 45 दिवसांत कमावले 30 कोटी, भुवया उंचावणारी 'सक्सेस स्टोरी'
आधी प्रेयसीला भोसकलं, नंतर स्वत:लाही संपवलं; दीड वर्षांपासूनच्या प्रेमाचा मन हेलावणारा शेवट
आधी प्रेयसीला भोसकलं, नंतर स्वत:लाही संपवलं; दीड वर्षांपासूनच्या प्रेमाचा मन हेलावणारा शेवट
धक्कादायक ! ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनला बुरशी; ग्राहकाची पोलिसात तक्रार, मनसे रस्त्यावर
धक्कादायक ! ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनला बुरशी; ग्राहकाची पोलिसात तक्रार, मनसे रस्त्यावर
BMC : महापालिकेच्या प्रकल्पांच्या कामाचा वेग वाढवा, फडणवीसांच्या सूचना; दोन लाख कोटींच्या कामाचा आढावा
महापालिकेच्या प्रकल्पांच्या कामाचा वेग वाढवा, फडणवीसांच्या सूचना; दोन लाख कोटींच्या कामाचा आढावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09 PM 04 March 2025Job Majha : डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची संधीPM Modi at Vantara : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वनतारा वाईल्ड लाईफचं उद्घाटनVidhan Sabha : विरोधी पक्षनेतेपदी Bhaskar Jadhav यांची वर्णी, ठाकरेंचे आमदार अध्यक्षांच्या भेटीला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धंदे से बडा कोई धर्म नही होता; महाकुंभमेळ्यात नाविक कुटुंबाने 45 दिवसांत कमावले 30 कोटी, भुवया उंचावणारी सक्सेस स्टोरी
धंदे से बडा कोई धर्म नही होता; महाकुंभमेळ्यात नाविक कुटुंबाने 45 दिवसांत कमावले 30 कोटी, भुवया उंचावणारी 'सक्सेस स्टोरी'
आधी प्रेयसीला भोसकलं, नंतर स्वत:लाही संपवलं; दीड वर्षांपासूनच्या प्रेमाचा मन हेलावणारा शेवट
आधी प्रेयसीला भोसकलं, नंतर स्वत:लाही संपवलं; दीड वर्षांपासूनच्या प्रेमाचा मन हेलावणारा शेवट
धक्कादायक ! ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनला बुरशी; ग्राहकाची पोलिसात तक्रार, मनसे रस्त्यावर
धक्कादायक ! ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनला बुरशी; ग्राहकाची पोलिसात तक्रार, मनसे रस्त्यावर
BMC : महापालिकेच्या प्रकल्पांच्या कामाचा वेग वाढवा, फडणवीसांच्या सूचना; दोन लाख कोटींच्या कामाचा आढावा
महापालिकेच्या प्रकल्पांच्या कामाचा वेग वाढवा, फडणवीसांच्या सूचना; दोन लाख कोटींच्या कामाचा आढावा
ताम्हिणी घाटात ST बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; कारमधील 2 ठार 3 जखमी
ताम्हिणी घाटात ST बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; कारमधील 2 ठार 3 जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2025 | सोमवार
धनंजय मुंडे राजीनामा देण्यास तयार नव्हते, फडणवीसांनी एका वाक्यात भरला दम; राष्ट्रवादीच्या नेत्यानं मंत्रि‍पद सोडलं
धनंजय मुंडे राजीनामा देण्यास तयार नव्हते, फडणवीसांनी एका वाक्यात भरला दम; राष्ट्रवादीच्या नेत्यानं मंत्रि‍पद सोडलं
Jitendra Awhad : Krushna Andhale ची हत्या झालीय;जितेंद्र आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट Santosh Deshmukh
Jitendra Awhad : Krushna Andhale ची हत्या झालीय;जितेंद्र आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट Santosh Deshmukh
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.