GST Raid : मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगर शहरात जीएसटी विभागाचे छापे; सराफा दुकानावर कारवाई
GST Raid in Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर शहरातील एका सराफा दुकानावर जीएसटी पथकाने छापेमारी केली आहे. बाफना ज्वेलर्स असं कारवाई करण्यात आलेल्या सराफा दुकानाचं नाव आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar GST Raid : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कागलच्या (Kagal) निवासस्थानी ईडीची (ED) कारवाई सुरु असतानाच, छत्रपती संभाजीनगर शहरातील (Chhatrapati Sambhaji Nagar City) एका सराफा दुकानावर जीएसटीच्या वसुली पथकाने (GST Recovery Squad) छापा घातला आहे. शुक्रवारी दुपारी सुरु झालेली छापेमारीची कारवाई अजूनही सुरुच आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
शहरातील एका सराफा दुकानावर शुक्रवारी जीएसटीच्या वसुली पथकाने छापा घातला. शुक्रवारी दुपारी एक वाजेपासून रात्री उशिरापर्यंत कर विभागाचे पथक दुकानात तपास करीत होते. दुकानातील कर्मचाऱ्यांना या वेळेत दुकानातच थांबवून ठेवण्यात आले होते. तर आजही दुसऱ्या दिवशी ही कारवाई सुरूच आहे. बाफना ज्वेलर्स असं कारवाई करण्यात आलेल्या सराफा दुकानाचं नाव आहे.
आर्थिक वर्षातील मार्च हा अखेरचा महिना असल्याने करवसुली यंत्रणा सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरातील बाफना ज्वेलर्स जीएसटीच्या वसुली पथकाने छापा घातला आहे. शहरातील जालना रस्त्यावरील बाफना ज्वेलर्स या सराफा दुकानावर जीएसटीच्या वसुली अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. शुक्रवारी सुमारे 10 तास अधिकाऱ्यांनी दुकानातील व्यवहारांची चौकशी केली. त्यानंतर आज देखील कारवाई सुरूच असून, या काळात सर्व कर्मचारी आणि व्यवस्थापकांना दुकानातच थांबवण्यात आले. तर शुक्रवारी दुपारनंतर दुकानाचे मालक शहरात पोहोचल्यावर पुढील चौकशी करण्यास सुरुवात झाली. दरम्यान दुसऱ्या दिवशी म्हणजेच आजही ही चौकशी सुरू आहे.
कागदपत्रांची तपासणी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर चोरीप्रकरणी जीएसटीच्या वसुली पथकाने ही छापेमारी केली आहे. तर कारवाईसाठी आलेल्या पथकाने सुरुवातीला दुकानातील सर्व फोन बंद करून, त्यानंतर चौकशी सुरु केली. तसेच या पथकाने दुकानातील ज्वेलरी खरेदी-विक्री संबधित कागदपत्रे तपासली आहे. सोबतच वेगवेगळ्या बिलांची तपासणी करण्यात येत असून भरलेल्या जीएसटीबाबत चौकशी केली जात आहे. तर संबधित ज्वेलर्सने कर चोरल्याचा जीएसटी पथकाला संशय असून, त्यानुसार चौकशी केली जात असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. तर या कारवाईबाबत जीएसटी विभागाकडून अजूनही कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
मुश्रीफ यांच्या कागलच्या निवासस्थानी ईडीची कारवाई
एकीकडे छत्रपती संभाजीनगर शहरात जीएसटी विभागाची छापेमारी सुरु असताना तिकडे, कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागलच्या निवासस्थानी ईडीची कारवाई सुरु आहे. सकाळी आलेल्या पथकाची कारवाई पाच तासानंतर देखील सुरूच आहे. तर दुसरीकडे मुश्रीफ यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. मुश्रीफ यांच्यावर राजकीय दबावाखाली कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
