छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा अतिक्रमणावर हातोडा; मुकुंदवाडी परिसरातील एकूण 14 दुकाने जमीनदोस्त
Chhatrapati Sambhaji Nagar : या कारवाईमुळे सर्विस रोड मोकळा झाला असून, आता नागरिकांचा वाहतूक कोंडी मुद्दा देखील मार्गी लागला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News : औरंगाबाद खंडपीठाच्या (Aurangabad Bench) आदेशानुसार छत्रपती संभाजीनगर शहरातील (Chhatrapati Sambhaji Nagar City) अतिक्रमणाच्या विरोधात महानगरपालिका सतत कारवाई करत आहे. विशेष म्हणजे कित्येक वर्षांपासून अनेक रस्त्यावर अतिक्रमणधारकांनी कच्च्चे-पक्के बांधकाम देखील केले आहेत. त्यामुळे आता अशा अतिक्रमणावर महानगरपालिका थेट कारवाई करत असून, आज देखील अशीच काही कारवाई करण्यात आली आहे. अतिक्रमण हटाव विभाग मार्फत मुकुंदवाडी सिग्नल लागत वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या एकूण 14 दुकाने आज जेसीबीचे साह्याने जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्विस रोड मोकळा झाला असून, आता नागरिकांचा वाहतूक कोंडी मुद्दा देखील मार्गी लागला आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभाग मार्फत मुकुंदवाडी सिगनल लगत वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या एकूण 14 दुकाने आज जेसीबीचे साह्याने जमीनदोस्त करण्यात आल्या. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, शहरातील आणि विमानतळ रोड लगत असलेला बहुचर्चित मुकुंदवाडी भागातील शिवाजी महाराज पुतळा पासून ते सोहम मोटर पर्यंत एकूण पंधरा फुटाच्या सर्विस रोड नकाशा प्रमाणे आहे. या सर्विस रोडवरील दुकाने ही खाजगी जागा होती. परंतु या ठिकाणी बांधण्यात आलेले बांधकाम दुकाने हॉटेल, घर इत्यादी अनधिकृत होती.
विशेष म्हणजे हा सर्विस रोड असल्याचे माहित असताना देखील हा रोड खुला केला जात नव्हता. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी अतिक्रमण काढण्यासाठी पथक गेले असताना, त्यांना प्रचंड विरोध करण्यात आला. मात्र अखेर अतिक्रमण विभाग प्रमुख रवींद्र निकम आणि इतर अधिकाऱ्यांनी चर्चा करून ही कारवाई करण्यात आली. तसेच या जागेचे पंचनामे करण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी शनिवारी आणि रविवारी आपल्या साहित्य बाहेर काढले. तर आज या अतिक्रमणावर हातोडा पडला आहे.
सर्विस रोड मोकळा झाला...
अतिक्रमण विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत एकूण 14 दुकाने असून, ज्यांचे आकार दहा बाय दहा, सात बाय वीस, सतरा बाय सात, पंधरा बाय आठ अशा लहान मोठी दुकाने होती. यामध्ये चिकन मटण, भाजीपाला, मोबाईल, चहा आणि पान टपरी तसेच खानावळ अशी प्रकारची दुकाने होती. तर खाजगी जागा असल्याने आणि रस्ता बाधित असल्याने हे अतिक्रमण काढण्यात आले. अनधिकृत बांधकाम अतिक्रमण काढल्याने आता सर्विस रोड मोकळा झालेला आहे. या ठिकाणी दररोज होणारे अपघात आणि वाहतुकीची कोंडी पूर्णपणे फुटणार आहे. मोठा रस्ता झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला. तर ही कारवाई प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभाग प्रमुख रवींद्र निकम यांचे मार्गदर्शनाखाली सविता सोनवणे आणि त्यांच्या सर्व पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांनो चिंता करू नका, खते आणि बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध; प्रशासनाची बैठक पार पडली