Chandrapur Crime : पत्नीला पळविल्याचा राग, प्रियकराच्या वडिलांनाच संपविले
आरोपीने दोन साथीदारांच्या मदतीने पूरग्रस्त छावणीत प्रवेश केला. मृतकाला चारचाकी गाडीमध्ये जबरदस्तीने बसवून कोराडी नाल्याजवळ नेले. त्याची हत्या केली. पोलीस तपासात ही बाब उघडकीस आली.
चंद्रपूर : पत्नी प्रियकरासोबत पळाली म्हणून पती नैराश्यात होता. त्यांचा काही सुगावा लागला नाही. माझ्या पत्नीला का पळवून नेले. म्हणून युवकाच्या वडिलांवर त्याने राग काढला. पत्नीला पळवून नेणाऱ्या तरुणाच्या वडिलांची हत्या केली. हा धक्कादायक प्रकार चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात उघडकीस आला आहे. काही दिवंसापूर्वी माजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोराडी (Koradi) नाल्यावरील पुलाखाली एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता.
पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात खुनाचा (Murder) गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. अखेर या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. 50 वर्षीय मृतक रामभाऊ पाटील हे माजरी कॉलनी येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यामध्ये मृतकाच्या मुलाचे आरोपी आशिष पेटकर याच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचे आणि त्याने तिला पळवून नेल्याचे स्पष्ट झाले.
आरोपीला अटक, पाच दिवसांची कोठडी
माझ्या पत्नीला का पळवून नेले. म्हणून युवकाच्या वडिलांवर तो राग काढला. आरोपीने दोन साथीदारांच्या मदतीने पूरग्रस्त छावणीत प्रवेश केला. मृतकाला चारचाकी गाडीमध्ये जबरदस्तीने बसवून कोराडी नाल्याजवळ नेले. त्याची हत्या केली. पोलिसांनी (Arrested) आरोपीला अटक केली आहे. त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशी माहिती वरोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी यांनी दिली.
पत्नीचे दुसऱ्या युवकावर प्रेम
आशिष पेटकर याच्या पत्नीचे दुसऱ्या एका युवकावर प्रेम जळले. ती रामभाऊ पाटील यांच्या मुलासोबत पळून गेली. याचा प्रचंड राग आशिषला आला. तो रागाच्या भरात रामभाऊच्या घरी गेला. पण, मुलगा तिथं नव्हता. रामभाऊ भेटले. त्यांनाच आशिषने चारचाकी गाडीत बसविले. कोराडी येथील नाल्याजवळ नेले. दोन मित्रांच्या मदतीनं त्यांची हत्या केली. त्यानंतर मृतदेह फेकून ते परत आले. माजरी पोलिसांनी या प्रकरणाची छडा लावला. आता आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.