एक्स्प्लोर

Chandrapur Lok Sabha : लेकीसाठी विजय वडेट्टीवारांनी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बाजी प्रतिभा धानोरकरांनी मारली

Lok Sabha Electio 2024 : थेट दिल्ली वारी करून वडेट्टीवारांनी मुलीच्या उमेदवारीसाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. पण शेवटी उमेदवारी मिळवण्यात प्रतिभा धानोरकरांनी बाजी मारली आहे. 

Lok Sabha Electio 2024 : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून (Lok Sabha Election Seat Sharing) अनेक घडामोडी घडत आहेत. अशात महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) काँग्रेसच्या (Congress) वाट्याला आलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या (Chandrapur Lok Sabha Constituency) जागेवरून देखील रस्सीखेच पाहायला मिळाली. शेवटी दिवंगत खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून विजय वडेट्टीवारांची (Vijay Wadettiwar) कन्या शिवानी वडेट्टीवार (Shivani Wadettiwar) देखील इच्छुक होत्या. तर, लेकीच्या उमेदवारीसाठी वडेट्टीवारांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. थेट दिल्ली वारी करून त्यांनी मुलीच्या उमेदवारीसाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. पण शेवटी उमेदवारी मिळवण्यात प्रतिभा धानोरकरांनी बाजी मारली आहे. 

मागील लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसची लाज राखणारा म्हणजेच एकमेव उमेदवार निवडून आलेला मतदारसंघ म्हणून चंद्रपूर मतदारसंघ ठरला होता. मात्र, खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाल्यावर या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशात बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. याचवेळी शिवानी वडेट्टीवार यांनी देखील तयारी सुरु केली.  विजय वडेट्टीवार यांच्याकडून मुलीला उमेदवारी मिळावी यासाठी हालचाली सुरु होताच,  प्रतिभा धानोरकर देखील थेट दिल्लीत पोहचल्या. दिल्लीतील नेत्यांची भेट घेऊन त्यांनी आपली बाजू मांडली. शेवटी रविवारी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीत चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

एका लेकीला उमेदवारी दुसरी लेकीला डावललं....

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून दोन लेकी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या. ज्यात सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे आणि विजय वडेट्टीवारांची कन्या शिवानी वडेट्टीवारांचा समावेश होता. प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून तर शिवानी वडेट्टीवार चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून इच्छुक होत्या. मात्र, प्रणिती यांना उमेदवारी जाहीर झाली असून, शिवानी यांना मात्र उमेदवारी नाकारण्यात आली आहे. 

अखेर तिढा सुटला, पण वडेट्टीवारांची भूमिका काय? 

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवारांची कन्या शिवानी वडेट्टीवार उमेदवारीसाठी मैदानात होत्या. पण, प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे आता मुलीला उमेदवारी नाकारल्यानंतर विजय  वडेट्टीवारांची भूमिका काय असणार आहे. प्रतिभा धानोरकर यांचा प्रचार वडेट्टीवारांकडून केला जाणार का?, शिवानी वडेट्टीवार देखील पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रस्त्यावर येणार का? या प्रश्नांची उत्तरे अजूनही मिळालेली नाही. त्यामुळे आता विजय वडेट्टीवारांची भूमिका नेमकी काय असणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे. 

सुधीर मुनगंटीवारांच्या विरोधात प्रतिभा धानोरकर 

रविवारी काँग्रेसकडून उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्यात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याच मतदारसंघातून भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर असा सामना रंगणार आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार हे 4 जून रोजीच स्पष्ट होणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

मोठी बातमी : सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात प्रतिभा धानोरकर रिंगणात, काँग्रेसकडून उमेदवारांची पाचवी यादी जाहीर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget