चार राज्ये, दोन हजार किलोमीटरचा प्रवास; चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातील 'ब्रह्मपुरी 21' वाघाचं महाराष्ट्रातून ओडिशामध्ये स्थलांतर
Chandrapur News: राज्यातील एखादा वाघ ओरिसा राज्यात स्थलांतर करून गेल्याची ही पहिलीच घटना आहे.
चंद्रपूर: जिल्ह्यातील एका वाघाने (Chandrapur News) चार राज्यातील जंगल पार करत ओरिसा राज्यात आपला अधिवास निर्माण केल्याची घटना समोर आली आहे. केंद्र सरकारच्या वाइल्ड लाईफ इन्स्टिटयूट ऑफ इंडिया (Wild Life Institute Of India) या संस्थेने या घटनेला दुजोरा दिला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील हा वाघ (Chandrapur Tiger) असून ब्रह्मपुरी ट्वेन्टी वन असं या वाघाचं नाव आहे. त्याने आतापर्यंत दोन हजार किलोमीटरचा प्रवास केलाय. आपल्या राज्यातील एखादा वाघ ओरिसा राज्यात (Odisha) स्थलांतर करून गेल्याची ही पहिलीच घटना आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील हा वाघ असून ब्रह्मपुरी ट्वेन्टी वन असं या दोन हजार किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या वाघाचं नाव आहे. आपल्या राज्यातील एखादा वाघ ओरिसा राज्यात स्थलांतर करून गेल्याची ही पहिलीच घटना आहे. ओरिसा राज्यातील गजपती भागात काही दिवसांपूर्वी एका वाघाने गाईची शिकार केली होती. या भागात वाघ नसल्याने वनविभागाने कॅमेरा ट्रॅप लावून या वाघाचा शोध घेतला. मात्र कॅमेरात आलेला वाघ हा अनोळखी असल्याने त्याची ओळख पटविण्यासाठी त्याचा फोटो वाइल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडे पाठविण्यात आला. अंगावर असलेल्या पट्ट्यावरून हा वाघ चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी ट्वेन्टी वन असल्याची पुष्टी कऱण्यात आली.
वाघांच्या स्थलांतर आणि भ्रमण मार्गावर नव्याने प्रकाश पडण्याची शक्यता
विशेष म्हणजे 2021 च्या व्याघ्रगणनेत हा वाघ सिंदेवाही तालुक्यात असल्याची नोंद करण्यात आली होती. साधारण चार वर्षांचा हा नर वाघ अधिवास आणि जोडीदाराच्या शोधात ओरिसा राज्यात गेला असावा अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र या वाघाने आपल्या राज्यातून छत्तीसगड, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि ओरिसा असा चार राज्यांचा प्रवास अनेक अडथळे पार करत पूर्ण केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. दोन हजार किलोमीटरच्या या प्रवासामुळे वाघांच्या स्थलांतर आणि भ्रमण मार्गावर नव्याने प्रकाश पडण्याची शक्यता आहे.
वाघांची शिकार
पर्यटकांमध्ये लोकप्रिय असल्यामुळे किमान बेपत्ता होणाऱ्या या सेलेब्रिटी वाघांवर सामाजिक संस्था, वन्यजीव प्रेमी आणि मीडियाचं लक्ष तरी जातं... अन्यथा अनेक वाघ मालूम-बेमालूमपणे शिकार होतात. चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात या वर्षी बावरिया टोळीच्या शिकारीत चार वाघ मारले गेले. आसाम राज्यात शिकार झालेल्या वाघाची कातडी सापडेपर्यंत आपल्या राज्यातील वनविभागाला याचा पत्ता देखील नव्हता. दर चार वर्षांनंतर होणाऱ्या सेन्ससचे आकडे जाहीर झाल्यावर वाघ वाढले म्हणून आपण उत्सव साजरा करतो. मात्र दरवर्षी अपघातात, शिकारी मध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या आणि अशा प्रकारे बेपत्ता होणाऱ्या वाघांवर देखील चिंतन व्हायला पाहिजे.
हे ही वाचा :