Sanjay Gaikwad VIDEO: मी ओरिजनल, माझी कॉपी करणे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बापालाही जमणार नाही : संजय गायकवाड
Sanjay Gaikwad On Uddhav Thackeray : जे कधीही मातोश्रीच्या बाहेर पडले नव्हते ते आता रस्त्यावर उतरले आहेत, त्यांना काही काम उरलं नसल्याचं सांगत आमदार संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

बुलढाणा : गेल्या काही दिवसांपासून माध्यमांपासून दूर असलेले बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आज पुन्हा एकदा बरसले. विरोधी पक्षाला माजी कॉपी करणे जमणार नाही. मी ओरिजनल आहे. इतकंच काय तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बापालाही माझी कॉपी करणं जमणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आलं. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय गायकवाडांनी हे वक्तव्य केलं. त्यावरुन आता पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
उबाठाच्या वतीने जे आंदोलन करण्यात येत आहे, तो सर्व रिकामचोट पक्ष राहिला आहे. त्यांना काही काम राहिले नाही. ते माझी कॉपी करू शकत नाहीत, मी ओरिजनल आहे असं संजय गायकवाड म्हणाले.
आता रस्त्यावर उतरावं लागत आहे
आमदार संजय गायकवाड म्हणाले की, "विरोधी पक्षाने लोकांच्या प्रश्नावर आवाज उठवायला हवं. पण हे नको त्या गोष्टीवर आंदोलन करतात. राज्यात फक्त 16 जागा देऊन जनेतेने त्यांना त्यांची जागा दाखविली आहे. जे कधी मातोश्रीमधून बाहेर पडत नव्हते ते आता बाहेर रस्त्यावर पडले आहे. आता तरी त्यांनी सुधारावं."
आम्ही महायुतीमध्ये आहोत. भाजपला त्यांचा पक्ष वाढवायचा अधिकार आहे. तर मी माझ्या पक्षाचं काम करतोय. सर्व पक्षांना आपापले काम करण्याचा अधिकार आहे असं संजय गायकवाड म्हणाले.
धनुष्यबाण आमचाच
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सर्वोच्च न्यायालय लवकरच अंतिम निर्णय देणार आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय गायकवाड म्हणाले की, "निवडणूक आयोगाने कायदेशीर धनुष्यबान आम्हाला दिला आहे. या विधानसभेत आम्ही 61 जागांवर निवडून आलो आहोत. जनतेच्या न्यायालयाने आम्हाला विजयी केल आहे. त्यापेक्षा मोठं न्यायालय दुसरं कुठलंही नाही. त्यामुळे धन्यषबाण आमचाच आहे."
मतांची चोरी होत नाही
निवडणूक आयोगाने आणि भाजपने मतांची चोरी केल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय गायकवाड म्हणाले की, "जेव्हा लोकसभेत त्यांचा पक्ष जिंकतो तेव्हा मतांची चोरी होत नाही. विधानसभेत आम्ही पुढे येतो तेव्हाच मतांची चोरो होते का? मतदान बूथवर कधी जाऊन पाहिलं का मतदान कसं वाढतंय ते? राहुल गांधी यांनी कधी मतदान केंद्रावर जाऊन पाहिलं का? ग्रामीण भागातील गरीब कष्टकरी हा सायंकाळी 5 च्या नंतरच मतदान करतो, तेही रात्री 10 वाजेपर्यंत. त्यामध्ये मताची चोरी होतच नाही."
ही बातमी वाचा:























