एक्स्प्लोर

Samruddhi Highway Potholes : समृद्धी महामार्गाला खड्ड्यांचं ग्रहण; 55 हजार कोटी खर्च करुन बांधलेल्या महामार्गावर खड्डेच खड्डे, तर पुलांनाही भेगा

Samruddhi Highway Potholes : हजारो कोटींचा खर्च करुन बांधलेल्या समृद्धी महामार्गावर 6 महिन्यातच खड्डे, अपघाताचा धोका वाढला

Maharashtra Buldhana News: आंतरराष्ट्रीय दर्जाचं तंत्रज्ञान वापरून आणि 55 हजार कोटी रुपये खर्च करून नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग (Samruddhi Highway) तयार करण्यात आला आहे. हा महामार्ग सुरू होऊन जेमतेम सात महिने झाले आहेत. पण पहिल्याच पावसाळ्यात या महामार्गावर कुठे खड्डे पडत आहेत, तर कुठे पुलांनाच भेगा पडत आहेत आणि त्यामुळे या महामार्गाच्या दर्जावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. समृद्धी महामार्गावर 120 किलोमीटर प्रति तासाच्या वेगानं चालणारी वाहनं अशा खड्ड्यातून गेल्यास मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई असा 701 किलोमीटरचा असलेला स्वप्नवत वाटणारा हा महामार्ग जवळपास 55 हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त खर्च करून बांधण्यात आलेला आहे. गेल्या 11 डिसेंबर रोजी मोठ्या थाटात या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं म्हणजेच, नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते झाले. या महामार्गाला सातच महिने झाले मात्र महामार्गावर आता पॅकेज 6 आणि 7 वर पुलांवर भेगा पडण्याचं आणि खड्ड्यांचं ग्रहण सुरू झालेल आहेत.

पॅकेज 6 हे apko कन्स्ट्रक्शन कंपनीनं तर पॅकेज 7 हे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीनं याठिकाणी काम केलेलं आहे. समृद्धी महामार्गावर मेहकर नजीक अनेक पुलांवर खड्डे पडले आहेत, तर काही पुलांवर भेगासुद्धा पडल्या आहेत. त्यामुळे या महामार्गाच्या दर्जावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे.

Samruddhi Highway Potholes : समृद्धी महामार्गाला खड्ड्यांचं ग्रहण; 55 हजार कोटी खर्च करुन बांधलेल्या महामार्गावर खड्डेच खड्डे, तर पुलांनाही भेगा

या महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांची वेग मर्यादा ही 120 किलोमीटर प्रति तास आहे आणि त्यामुळे प्रचंड वेगात जर वाहनाचं चाक खड्ड्यात गेलं तर खूप मोठा झटका बसून वाहन चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटून मोठा अपघात होऊ शकतो. मेकर नजीक आयसी 11 जवळ एका पुलावर खूप मोठा खड्डा पडला आहे. गेल्या एका महिन्यापासून पडला असल्याचं स्थानिकांनी आणि वाहन चालकांनी एबीपी माझानं सांगितलं आहे.

कालच राज्याच्या विधानसभेच्या अधिवेशनात सभागृहात समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी चर्चा झाली. मात्र समृद्धीचं ग्रहण काही सुटता सुटत नाही, समृद्धी महामार्गावर कधी टायर फुटून अपघात होतात, तर कधी वाहन चालकाला झोप आल्यामुळे आता यात भर पडणार आहे. ती या खड्ड्यांमुळे त्यामुळे समृद्धी महामार्गाकडे राज्यकर्त्यांनी गांभीर्यानं बघणं आवश्यक आहे. 

खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता वाढली

समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडॉरवर मेहकरजवळील इंटरचेंजजवळ एका पुलावर भला मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. एकीकडे आजच राज्याच्या विधानसभेत समृद्धी महामार्गावरील अपघाताची चर्चा झाली असतानाच समृद्धीवर खड्डे पडत असल्याने समृद्धी महामार्गावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे.

मुंबईपर्यंत समृद्धी महामार्ग कधीपर्यंत पूर्ण होणार?

सध्या नागपूर ते शिर्डी असा 501 किमीचा टप्पा सुरू आहे. शिर्डी ते भिवंडी या टप्प्याचं काम अजूनही सुरू आहे. सिन्नर ते कसारा टप्प्यात 12 बोगदे आणि 16 छोटे पूल उभारावे लागणार आहेत. इगतपुरी ते भिवंडीजवळील आमने गाव हा शेवटचा टप्पा डिसेंबर अखेरीस खुला होण्याची शक्यता आहे. इगतपुरी ते भिवंडीजवळील आमने गाव हा शेवटचा टप्पा डिसेंबर अखेरीस खुला केला जाणार असल्याची माहिती आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यावरच मुंबईकरांना समृद्धी महामार्गाचा पूर्ण लाभ घेता येईल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांनाच एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांनाच एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 27 March 2025  दुपारी ३ च्या हेडलाईन्सUddhav Thackeray : हिंदू - मुस्लिमांमध्ये भांडणं लावणाऱ्या भाजपने सांगावं की हिंदूत्ववाद सोडला...Uddhav Thackeray on Saugat-e-Modi : बटेंगे तो कटेंगे म्हणणारे आता सौगाते मोदी देणारShivsena Uddhav Thackeray PC : भाजपने हिंदुत्व सोडलं असं जाहीर करावं, ठाकरेंची सडकून टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांनाच एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांनाच एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा
त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
Embed widget