Buldhana News : सिंदखेडराजा येथील जिजाऊ जन्मस्थळाची पुरातत्व विभागाकडून स्वच्छता, अनेक वर्षांच्या जिजाऊ भक्तांच्या प्रयत्नांना अखेर यश
Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील राजे लखोजी जाधव यांच्या समाधी इमारतीवरील झीज रोखण्यासाठी रासायनिक प्रक्रिया सुरु पुरातत्व विभागारजून सुरु करण्यात आलीये.
सिंदखेडराजा : बुलढाणा (Buldhana ) जिल्ह्यातील सिंदखेडराजा (Sindkhedaraja) या ऐतिहासिक ठिकाणी राजे लखोजी जाधव यांची समाधी 400 वर्षांपूर्वी बांधली आहे. या समाधीचं बांधकाम पूर्णपणे दगडात असल्याने अनेक वर्षांपासून या समाधीची झीज होऊन नुकसान होत असल्याचं वास्तव समोर आलं होतं. या समाधीच्या संवर्धनासाठी अनेकदा आंदोलनं देखील करण्यात आली. पण आता पुरतत्व विभागाकडून या समाधी स्थळाला वाचविण्यासाठीचे प्रयत्न सुरु करण्यात आलेत. या पूर्ण इमारतीवर रासायनिक प्रक्रिया सुरू करण्याचं काम हाती घेण्यात आलंय.
यामुळे आता ही समाधी पुढील अनेक वर्ष देखील सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे. तसेच पुढील पिढ्यांना इतिहास समजण्यास देखील मदत यामुळे होईल. कोट्यवधी जिजाऊ भक्तांच हे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे रोज हजारो भक्त , पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. मात्र पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षमुळे या ऐतिहासिक स्थळाची पुरती दुरवस्था झाल्याचं समोर आलं होतं. परिसरात घाणीच्या साम्राज्यासह गेल्या वीस दिवसांपासून वीज पुरवठा बंद होता. यामुळे हा राजवाडा अंधारात होता, तर येथील सीसीटिव्ही गेल्या महिनाभरपासून बंद होते.
पुरातत्व विभागाकडून दखल
जिजाऊ जन्मस्थळाची आता पुरातत्व विभागाकडून दखल घेण्यात आल्याचं पाहायला मिळतयं. यामुळे पुन्हा एकदा या वास्तूचे जतन करता येणार आहे. राजे लखोजी जाधव हे राजमाता जिजाऊंचे वडील. त्याकाळी त्यांचं मोठ साम्राज्य होत. मात्र दौलताबाद जिल्ह्याच्या पायथ्याशी 400 वर्षांपूर्वी त्यांची हत्या झाली आणि त्यानंतर त्यांची समाधी राजे जगदेवराव जाधव यांनी सिंदखेड राजा येथे बांधली. एखाद्या हिंदू राजाची जगातील ही सर्वात मोठी समाधी म्हणून याची ओळख आहे. संपूर्ण दगडी बांधकाम असलेली ही समाधी अतिशय सुंदर अशी आहे.
समाधीची दुरावस्था
मागील अनेक वर्षांपासून ऊन, वारा, पाऊस यामुळे या समाधीची झीज होऊ लागली. त्यामुळे या समाधीचं बरचं नुकसान झाल्याचं निदर्शनास आलं. जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या पुरातन राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यात मोठ्या प्रमाणात गवत उगवले असून परिसरात घाणीचे साम्राज्य देखील बघायला मिळालं. रोज हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. मात्र साफसफाई नसल्याने या पुरातन वस्तूची दुरवस्था बघायला मिळत आहे.
राजे लखुजीराव जाधव यांच्या मुळेच सिंदखेडराजा हे नाव पडले याचे अनेक पुरावे सिंदखेडराजा येथे पाहायला मिळतात . त्यांच्या काळामध्येच किनगाव राजा , देवुळगाव राजा , मेहुना राजा , आडगाव राजा या गावांना सुद्धा जाधवांची पार्श्वभूमी लाभली आहे. ही सर्व गावे जाधव कालीन आहे . इतिहासामध्ये तसा पुरावा सुद्धा पाहायला मिळतो सिंदखेडराजा हे सत्तेचे मुख्य केंद्र होते येथून राजे लखुजीराव जाधव राज्य कारभार पाहत आहे.असे या शहराला ऐतिहासिक व आध्यात्मिक फार मोठा वारसा लाभला आहे राजमाता जिजाऊ या राजे लखुजीराव जाधव यांची मुलगी आहे जिजाऊ चे वडील राजे लखुजीराव जाधव यांच्या कार्यकर्तृत्वाच्या इतिहासाच्या पाऊल खुणा आजही सिंदखेडराजा येथे पाहायला मिळतात.