Buldhana: धरण फुटलं...पळा... पळा; बुलढाण्यातील गोराळा धरण फुटल्याची अफवा अन् नागरिकांची पळापळ; धरण सुरक्षित असल्याची प्रशासनाची माहिती
Buldhana Dam News: जळगाव जामोद तालुक्यातील गोराळा धारण फुटल्याची अफवा पसरल्यानंतर परिसरातील नागरिकांची धावपळ सुरू झाली.
Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरानजीक सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गोराळा धरण फुटल्याची अफवा दुपारपासून पसरली आहे. त्यामुळे नागरिकांची मात्र मोठी धावपळ झाल्याची बघायला मिळत आहे. मातीचे हे धरण 100 टक्के सुरक्षित असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं. या अफवेचा रियालिटी चेक एबीपी माझाने केला.
जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी जवळपास 20 वर्षे जुने आणि शंभर टक्के मातीचे असलेले गोराळा धरण आहे. शनिवारी या परिसरात झालेल्या ढगफुटी नंतर हे धरण फुटल्याची अफवा जळगाव जामोद शहरात पसरली आणि त्यामुळे मात्र नागरिकांनी मोठी धावपळ झाली. यानंतर एबीपी माझाने या धरणावर जाऊन रियालिटी चेक केला आहे. प्रत्यक्ष धरण स्थळी भेट देऊन याचा रियालिटी चेक करण्यात आल्यानंतर हे धरण सुरक्षित असल्याचं समोर आलं आहे.
या परिसरात अफवा पसरल्यानंतर पाठबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस एस सोळंके या परिसरात दाखल झाले. त्यांना एबीपी माझाने विचारलं असता हे धरण 100 टक्के मातीचे जरी असलं तरी शनिवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे धरणात मोठा पूर आला आणि त्यामुळे धरणाच्या एका बाजूने पाणी निघण्यासाठी जागा करण्यात आली. त्यामुळे एका बाजूचा भाग धरणाचा जवळपास 30 ते 35 फूट कसला असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र धरण हे सुरक्षित असल्याची ग्वाही त्यांनी दिलेली आहे.
ढगफुटी सदृश पावसाने सातपुड्याच्या पर्वतातून या धरणात मोठा पूर आला. मात्र धरणाचा सांडवा क्षमतेपेक्षा जास्त वाहू लागल्याने सांडव्याच्या बाजूने 30 फूट असलेली भिंत कसलेली आहे आणि त्यातून धरणातील पंधरा ते वीस टक्के पाणी वाहून गेलेलं आहे. मात्र आज धरण फुटलेलं नाही असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
बुलढाणा जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला असून त्यामुळे जिल्ह्यातील 40 ते 45 गावांत पुराचं पाणी शिरल्याची माहिती आहे. तर शेकडो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत.
महाराष्ट्रात आज काही तुरळक भाग वगळता पावसाने सर्वदूर हजेरी लावलीय. मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्र आज ओलेचिंब झालाय. दरम्यान विदर्भाला मात्र अतिवृष्टीचा फटका बसलाय. यवतमाळ जिल्ह्यातील नदीकाठच्या अनेक गावांना पुराने वेढा दिला. त्याचप्रमाणे शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तसेच महागाव तालुक्यातील आनंदनगरमध्ये 110 ग्रामस्थ पुरात अडकले होते. त्यांची सुटका करण्यात आलीय. महत्त्वाचं म्हणजे आज या पुरात अडकलेल्या एक महिन्याच्या बाळाचीही सुखरूप सुटका करण्यात आलीय. तर तिकडे वाशिम जिल्ह्यातील 21 सर्कलच्या क्षेत्रात पिकांचं मोठं नुकसान झालंय. नांदेड, बुलढाणा, जळगाव जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झालंय. त्याचप्रमाणे मराठवाड्यातही अनेक भागांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय. त्यामुळे, पाऊस आला उशिरा, मात्र त्याने अनेक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवलीय.
ही बातमी वाचा: