Buldhana News: संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयालाच ठोकले कुलूप; बुलढाणा जिल्ह्यातील घटना
तहसील कार्यालल्यात शिबिराचे आयोजन करून त्यात शेकडो शेतकऱ्यांना बोलवण्यात आले. मात्र तहसीलदारसह कार्यालयातील बहुतांश कर्मचारी गैरहजर होते. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयालाच कुलूप ठोकले.
Buldhana News बुलढाणा : अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या होते नव्हतं ते सारेच पावसाने हिरावून घेतले आहे. त्यामुळे शासन दरबारी आपल्या वेदना मांडल्या तर त्यातून काही आर्थिक मदत होऊन हा दु:खाचा डोंगर काही अंशी कमी होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना (Farmer) असते. मात्र निसर्गाप्रमाणेच शासनाने शेतकऱ्यांची चेष्टा करण्याची कुठलीच संधी सोडली नसल्याचा प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana News)जळगाव जामोद तहसील कार्यालयात घडला आहे.
तहसीलदारांकडून शेतकऱ्यांची थट्टा
अतिवृष्टीमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसान आणि माहिती जाणून घेण्यासाठी तहसील कार्यालयात एक शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना नोटीस देऊन शिबिरात बोलावले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने तहसील कार्यालय गाठले. मात्र तहसीलदारसह तहसील कार्यालयातील बहुतांश कर्मचारी गैरहजर असल्याने शेतकऱ्यांची थट्टा करण्यात आल्याचा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी या तहसील कार्यालयाला कुलूप ठोकून परिसरातच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद या तालुक्यात 22 जुलै रोजी अतिवृष्टी झाली होती. ज्यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. शासन दरबारी कुठली मदत जाहीर होईल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी अस लावली होती. अखेर या संकटाची तिव्रता लक्षात घेता तालुक्यातील शेतकऱ्यांना जळगाव जामोदच्या तहसीलदार शितल सोलाट यांनी बोलावले होते. त्या अनुषंगाने तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना नोटीस देऊन शिबिरात येण्याचे आवाहन करत आपल्या अडचणी या शिबिरात सोडवून दिल्या जाईल, असे लेखी आश्वासन देखील देण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज तालुक्यातील कोनाकोपऱ्यातील शेतकरी तहसील कार्यालय जवळ आयोजित शिबिर मध्ये आले.
संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयालाच ठोकले कुलूप
मात्र बारच वेळ होऊन देखील तहसील कार्यालयातील कुणीही संबंधित अधिकारी अथवा कर्मचारी या ठिकाणी फिरकले नाहीत. परिणामी शेतकऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मात्र या प्रकाराबाबत अधिक तपास केला असता, स्वतः तहसीलदार शितल सोलाट यांच्यासह तहसील कार्यालयातील 75 टक्के कर्मचारी गैरहजर असल्या धक्कादायक बाब समोर आली. त्यानंतर शेतकऱ्यांनी अशा प्रकारे बोलावून स्वता गैरहजर असणाऱ्या तहसीलदार विरोधात संताप व्यक्त केला. दरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी थेट तहसील कार्यालयालाच कुलूप ठोकून आंदोलन सुरू केले. जोपर्यंत तहसीलदार आणि कर्मचारी तहसील कार्यालयात येत नाही, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. असा आक्रमक पवित्रा घेत शेतकऱ्यांनी या ठिकाणी आता ठिया आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे जळगाव जामोद तहसील कार्यालयात मोठा गोंधळ बघायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या