एक्स्प्लोर

Buldhana : तहसीलदारांना सोनं घ्यायचंय सांगत सराफ व्यापाऱ्याला लुटलं, सिनेस्टाईल चोरी करणाऱ्या आरोपीला बेड्या

Buldhana Crime : सराफ व्यापाऱ्याने आरोपीसोबत आपल्या ड्रायव्हरला पाठवलं, पण त्याने ड्रायव्हरलाही फसवून सोनं घेऊन पोबारा केला. 

बुलढाणा: तहसीलदार साहेबांना सोने घ्यायचं आहे असं सांगत बुलढाण्यातील (Buldhana Crime) एका सराफ व्यावसायिकाला गंडा घातल्याची घटना शुक्रवारी घडली होती. या प्रकरणातील आरोपीला आता पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. चिखली तहसीलदारांच्या नावाने या आरोपीने सराफ व्यापाऱ्याला गंडा घालत 12 ते 15 ग्रॅमच्या अंगठ्या आणि चेन लंपास केले होते. आता त्या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 

तहसीलदार साहेबांना सोने घ्यायचे आहे, त्यांनी विश्वसनीय तसेच खात्रीचे दुकान म्हणून तुमच्या दुकानात पाठवले आहे, असं या आरोपीने सराफ व्यापाऱ्याला सांगितलं. त्यानंतर सिनेस्टाईलने सगळ्या गोष्टी पार पाडत त्याने व्यापाऱ्याला फसवलं. संबंधित व्यापाऱ्याने तहसीलदारांशी संपर्क साधल्यानंतर त्याला सत्य परिस्थिती समजली आणि आपण फसल्याची जाणीव झाली. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील सराफा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. 

शहरातील डीपी रोड वरील दिघेकर ज्वेलर्स मधील ही घटना असून  दुकानात गर्दी असल्याने दुकानात आलेल्या एका युवकाने सराफा दुकान मालकाला बोलण्यात गुंतवले आणि तहसीलदार साहेबांना सोन्याच्या अंगठ्या आणि चेन खरेदी करायचे आहेत असं सांगितलं. दुकान मालकाने आपला गाडी चालक सोबत दिल्यावर त्यांच्यासोबत अंदाजे वजन 12 ते 15 ग्रॅम वजनाच्या अंगठ्या आणि चेन दिल्या. 

ड्रायव्हर आणि चोरटा व्यक्ती तहसील कार्यालयात गेले असता  त्यावेळी साहेब तिथे नसल्याने त्या भामट्याने डायव्हरला नायब तहसीलदार यांच्या केबीनमध्ये नेले. तुम्ही इथे थांबा मी ऐवज साहेबांना दाखवतो असे सांगून त्याच्याजवळून अंगठ्या असलेली पिशवी घेतली आणि काही क्षणात परत येऊन साहेबांनी तुम्हाला इथे थांबायला सांगितले आहे असे सांगून पोबारा केला. यासंदर्भात पोलिसात आज तक्रार देण्यात आली असून आज गुन्हा दखल करण्यात आला आहे. 

आरोपीला अटक

तहसीलदारांच्या नावाने सराफ व्यापाऱ्याला गंडा घातल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आरोपीला जेरबंद केलं. या घटनेनंतर चिखलीच्या तहसीलदारांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आपल्या नावाने सराफ व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडण्यात आलं आहे. अशा गोष्टी घडत असतील तर लोकांनी सावधान राहिलं पाहिजे. सरकारी अधिकाऱ्यांच्या नावाने असा काही प्रकार होत असेल तर पोलिसांशी संपर्क साधला पाहिजे आणि त्याची खात्री केली पाहिजे. 

ही बातमी वाचा: 

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा वणवा पेटला, बुलढाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा वणवा पेटला, बुलढाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
Buldhana News: मेहकरचा गड महाविकास आघाडीच्या ताब्यात! काँग्रेसच्या 9 नगरसेवकांचा ठाकरे गटाला खुला पाठिंबा; एकनाथ शिंदेंना मोठा धक्का
मेहकरचा गड महाविकास आघाडीच्या ताब्यात! काँग्रेसच्या 9 नगरसेवकांचा ठाकरे गटाला खुला पाठिंबा; एकनाथ शिंदेंना मोठा धक्का
Maharashtra Congress: विधान परिषद निवडणुकीसाठी AICC च्या सूचनांकडे राज्यातील काँग्रेसच्या बड्या नेत्यांची पाठ; काँग्रेसचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर?
विधान परिषद निवडणुकीसाठी AICC च्या सूचनांकडे राज्यातील काँग्रेसच्या बड्या नेत्यांची पाठ; काँग्रेसचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर?

व्हिडीओ

Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद
Ambadas Danve On Operation Tiger : दम असेल तर निवडून आणा, दुसऱ्यांची पोरं का लागतात
Nitin Deshmukh On Operation Tiger : फुटणाऱ्यांना लाज वाटू दे, मशालीवर निवडून आलात
Operation Tiger : ऑपरेशन टायगर - दिल्लीत हालचालींना वेग, एकनाथ शिंदे आणि UBT खासदार दिल्लीत
Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Meloni Viral Video: मेलोनी म्हणाल्या, 'मी गेल्या एक महिन्यापासून सिगरेट ओढत नाही, त्यामुळे आता झोप घालवण्यासाठी...' जी-7 मध्ये अनौपचारिक संभाषण मायक्रोफोनवर रेकॉर्ड!
मेलोनी म्हणाल्या, 'मी गेल्या एक महिन्यापासून सिगरेट ओढत नाही, त्यामुळे आता झोप घालवण्यासाठी...' जी-7 मध्ये अनौपचारिक संभाषण मायक्रोफोनवर रेकॉर्ड!
Iran War LIve Update: 'तर आम्ही त्यांच्यावर पुन्हा बॉम्बहल्ला करू..' इराण अमेरिका शांतता करारावर डोनाल्ड ट्रम्पचा पुन्हा सनसनाटी दावा
'तर आम्ही त्यांच्यावर पुन्हा बॉम्बहल्ला करू..' इराण अमेरिका शांतता करारावर डोनाल्ड ट्रम्पचा पुन्हा सनसनाटी दावा
Omraje Nimbalkar: ऑपरेशन टायगरवर ओमराजे निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया; अखेर फोन उचलला, म्हणाले मी दिल्लीला गेलो नाही
ऑपरेशन टायगरवर ओमराजे निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया; अखेर फोन उचलला, म्हणाले मी दिल्लीला गेलो नाही
Uddhav Thackeray vs Eknath Shinde: पहिल्या केसला तारीख पे तारीखचा खेळखंडोबा सुरुच, आता पुन्हा ठाकरे विरुद्ध शिंदे कायदेशीर लढाई; असीम सरोदेंनी सांगितलं फुटीर खासदारांचं भवितव्य
पहिल्या केसला तारीख पे तारीखचा खेळखंडोबा सुरुच, आता पुन्हा ठाकरे विरुद्ध शिंदे कायदेशीर लढाई; असीम सरोदेंनी सांगितलं फुटीर खासदारांचं भवितव्य
वयाच्या 26व्या वर्षी आमदार अन् दोन वर्षांपूर्वी विक्रमी मतांनी दुसऱ्यांदा खासदार; आता शिंदेंच्या गळाला लागताच पुण्यातून दुसऱ्या मार्गाने कलटी मारली, फुटीर ओमराजेंचीच सर्वाधिक चर्चा का होत आहे?
वयाच्या 26व्या वर्षी आमदार अन् दोन वर्षांपूर्वी विक्रमी मतांनी दुसऱ्यांदा खासदार; आता शिंदेंच्या गळाला लागताच पुण्यातून दुसऱ्या मार्गाने कलटी मारली, फुटीर ओमराजेंचीच सर्वाधिक चर्चा का होत आहे?
डी लिमिटेशन विधेयकासाठीच फोडाफोडी, हकुमशाही आणण्याचा प्रयत्न; खासदार फुटीवर माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
डी लिमिटेशन विधेयकासाठीच फोडाफोडी, हकुमशाही आणण्याचा प्रयत्न; खासदार फुटीवर माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या ब्रिजवर भीषण अपघात; कारवर चढली फॉर्च्यूनर, 4 गाड्या एकमेकांना धडकल्या
मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या ब्रिजवर भीषण अपघात; कारवर चढली फॉर्च्यूनर, 4 गाड्या एकमेकांना धडकल्या
Anjali Damania: 'एक नाही असंख्य पक्ष भाजप एकानंतर एक फोडताना दिसतोय उघड्या डोळ्याने होत असताना सुद्धा सुप्रीम कोर्ट विलंब करतंय तर...अंजली दमनियांचा तीव्र संताप
'एक नाही असंख्य पक्ष भाजप एकानंतर एक फोडताना दिसतोय उघड्या डोळ्याने होत असताना सुद्धा सुप्रीम कोर्ट विलंब करतंय तर...अंजली दमनियांचा तीव्र संताप
Embed widget