आधी निखळला, प्रशासनानं दुरुस्त केला, पण पाच दिवसांत पुन्हा निखळला; समृद्धीवर प्रवाशांच्या जीवाशी खेळ
Samruddhi Mahamarg: पाच दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडोर दरम्यान चेनेज 319 वरील एका पुलाचा लोखंडी भाग तुटून वर आला होता. याची बातमी एबीपी माझानं दाखवली होती.
Samruddhi Mahamarg Exclusive: बुलढाणा : काही दिवसांपूर्वी मृत्यूचा सापळा बनलेला समृद्धी महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) पुलाचा 5 दिवसांपूर्वी तुटलेला भाग पुन्हा निखळला आहे. याआधी 'एबीपी माझा'नं बातमी दाखवल्यानंतर तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. पण, अवघ्या काही दिवसांतच पुलाचा तुटलेला भाग पुन्हा निखळला आहे.
पाच दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडोर दरम्यान चेनेज 319 वरील एका पुलाचा लोखंडी भाग तुटून वर आला होता. याची बातमी एबीपी माझानं दाखवली होती. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर तात्काळ प्रशासनानं दखल घेत पुलाची दुरुस्ती करण्यात आली. मात्र, समृद्धी महामार्गाच्या प्रशासनानं याची फक्त तात्पुरती वेल्डिंग करून दुरुस्ती केली होती. मात्र, पुन्हा हा भाग निखळल्याचं पाहायला मिळालं. पुलावरील निखळलेल्या भागामुळे महामार्गावर मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पाच दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडोरवरील बीड ते सिंदखेड राजा दरम्यान चेनेज 319 वरील एका पुलाचा लोखंडी भाग निखळून वर आला होता. याची बातमी काही दिवसांपूर्वी एबीपी माझानं दाखवली होती. तात्काळ या पूलाची दुरुस्ती करण्यात आली. मात्र समृद्धी महामार्गाच्या प्रशासनाने याची फक्त थातूरमातूर वेल्डिंग करून दुरुस्ती केली होती. मात्र पुन्हा हा भाग तुटलेला असून हा पुन्हा कधी महामार्गावर उचकटून येऊ शकतो आणि मोठा अपघात होऊ शकतो. चेनेज 319 वर हा लोखंडी भाग असून हा लोखंडे भाग अद्यापही तुटलेलाच आहे .समृद्धी महामार्ग प्रशासनाने याची याची गंभीर दखल न घेता तात्पुरती वेल्डिंग करून दुरुस्ती केली होती. मात्र पुन्हा तीनच दिवसात हा भाग तुटून हलायला लागलेला आहे .व कधीही वर येऊन या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. अतिशय गंभीर हा प्रकार आहे.
पाहा व्हिडीओ : Samruddhi Mahamarg EXCLUSIVE : पाच दिवसांपूर्वी पुलावर तुटलेला भाग पुन्हा निखळला