Buldhana News : अमरावतीच्या डॉक्टर तरुणीला बुलढाण्यात जबर मारहाण, धिंड काढण्याचाही प्रयत्न; तिघांविरोधात गुन्हा दाखल
Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील बारलिंगा गावामध्ये अमरावती जिल्ह्यातील एका डॉक्टर तरुणीला जबर मारहाण करण्यात आली आहे. या डॉक्टर तरुणीचा गावातील लोकांनी विनयभंगही केला.
Buldhana News : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील बारलिंगा गावामध्ये अमरावती जिल्ह्यातील एका डॉक्टर (Doctor) तरुणीला जबर मारहाण करण्यात आली आहे. या डॉक्टर तरुणीचा गावातील लोकांनी विनयभंगही केला. मात्र काही सुज्ञ नागरिकांनी या तरुणीला अंधेरा पोलीस स्टेशनला पोहोचवले आणि अंढेरा पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरुन जबर मारहाण आणि विनयभंगाचे गुन्हे तीन आरोपींवर दाखल केले आहेत. मात्र अद्याप आरोपींना अटक केली नाही. या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तर या घटनेबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.
तरुणीला मारहाण करत गावात फिरवले
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हा मातृतीर्थ जिजाऊंचा तालुका मानला जातो. मात्र याच तालुक्यात काल एक दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली. अमरावती जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी असलेली एक डॉक्टर तरुणी बारलिंगा या छोट्याशा गावात सायंकाळी पाच वाजता आली होती. ही तरुणी गावातील एका घरात शिरली. मात्र या घरातील दोन पुरुष आणि एक महिलेने या तरुणीला जबर मारहाण करत गल्लीत आणि मारहाण करत गावातून फिरवले. या तरुणीला इतकी मारहाण केली की या तरुणीचे कपडे सुद्धा फाटले. सुदैवाने गावातील काही सुज्ञ नागरिकांनी या तरुणीला अंढेरा पोलीस स्थानकात पोहोचवले. अंधेरा पोलिसांनी चौकशीअंती बारलिंगा गावातील एक महिला आणि दोन पुरुषांवर जबर मारहाण करणे आणि विनयभंग करणे असे गुन्हे दाखल केले आहेत.
'या' प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरित
मात्र अमरावती जिल्ह्यातील ही तरुणी बारलिंगा या गावात का आली, ती आरोपींच्याच घरात का शिरली, आरोपींनी तिला का मारहाण केली, उच्चशिक्षित डॉक्टर व वैद्यकीय अधिकारी असलेली ही तरुणी एकटीच या गावात का आली या प्रश्नांची उत्तरे मात्र पोलिसांनी अद्याप माध्यमांना दिली नाहीत.
रात्री बारा वाजता ज्यावेळेस माध्यमांना ही बातमी कळली त्यावेळेस माध्यमांनी अंधेरा पोलीस स्थानक गाठले. मात्र यावेळी पोलिसांनी या तरुणीला लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला व याबाबत योग्य माहिती माध्यमांना दिली नाही. परंतु प्रत्यक्षदर्शी यांनी काही वेगळीच माहिती माध्यमांसमोर दिली आहे. यातील गावातील सुधाकर नागरे या व्यक्तीने या पीडित तरुणीला बारलिंगा गावातून 30 किलोमीटर असलेल्या अंढेरा पोलीस स्थानकात पोहोचवले.
उच्चशिक्षित व वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉक्टर तरुणीला अमरावतीहून बारलिंगा या छोट्याशा गावात काय काम पडलं असावं....? पोलीस स्थानकात नेमकं काय काय घडलं?असेच अनेक प्रश्न आता निरुत्तरित आहेत याची उकल बुलढाणा पोलीस अधीक्षक करतील काय, असा प्रश्न आहे.
VIDEO : Buldhana: बुलढाण्यात डॉक्टर तरुणीला जबर मारहाण; तीन जणांवर गुन्हे दाखल