एक्स्प्लोर

'सिंघम अगेन'मधला सलमान खानचा कॅमिओ कॅन्सल; शूटिंगपूर्वीच रोहित शेट्टी, अजय देवगणचा मोठा निर्णय, काय घडलं नेमकं?

Salman Khan Cameo in Singham Again: रोहित शेट्टीचा 'सिंघम अगेन' हा चित्रपट पुढील महिन्यात दिवाळीच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटात स्टार्सची फौज आहे, ज्यामध्ये चुलबुल पांडे म्हणजेच, सलमान खान देखील सामील होणार होता. पण, सलमानचा कॅमिओ आता कॅन्सल करण्यात आलाय.

Big Update on Salman Khan Cameo in Singham Again: यंदाच्या वर्षी 2024 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर दोन मोठे चित्रपट एकमेकांना भिडणार आहेत. अजय देवगणचा कॉप युनिव्हर्स चित्रपट 'सिंघम अगेन' (Singham Again) आणि दुसरा कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) हॉरर-कॉमेडी चित्रपट 'भूल भुलैया 3' (Bhool Bhulaiyaa 3) यांच्यात बॉक्स ऑफिसवर (Box Office) जोरदार टक्कर होणार आहे. या दोन्ही चित्रपटांची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. एकीकडे भूल भुलैया 3 च्या निर्मात्यांनी दोन मंजुलिकाचा ट्विस्ट देऊन प्रसिद्धी मिळवली आहे. दुसरीकडे, सिंघम अगेनच्या निर्मात्यांनी या चित्रपटात सूर्यवंशीसह (Sooryavanshi) दबंग खानच्या कॅमिओनं लक्ष वेधलं आहे. पण, आता समोर आलेल्या एका बातमीनं चाहत्यांचा पुरता हिरमोड झाला आहे. आता सिंघम अगेनच्या निर्मात्यांनी मोठा निर्णय घेतला असून सलमान खानचा (Salman Khan) कॅमिओ कॅन्सल करण्यात आला आहे. 

रोहित शेट्टीचा 'सिंघम अगेन' हा चित्रपट पुढील महिन्यात दिवाळीच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटात स्टार्सची फौज आहे, ज्यामध्ये चुलबुल पांडे म्हणजेच, सलमान खान देखील सामील होणार होता. सलमान खानचा या चित्रपटात विशेष कॅमिओ असणार होता. घोषणा झाल्यापासूनच चाहत्यांमध्ये सलमान खानच्या कॅमिओची जोरदार चर्चा रंगली होती, मात्र आता चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भाईजान सिंघम अगेनमध्ये कॅमिओ करणार नाही, अशी माहिती मिळत आहे.

बॉलिवूड हंगामानं दिलेल्या रिपोर्टनुसार, सलमान खानचा सिंघम अगेनमधील कॅमिओ कॅन्सल करण्यात आला आहे. सलमानला सतत मिळणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्यांदरम्यान हा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे त्याच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. त्यामुळे सिंघम अगेनच्या निर्मात्यांनी दबंग भाईजानचा कॅमिओ कॅन्सल करण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुंबईत होणार होती शुटिंग, पण बाबा सिद्दिकींच्या हत्येमुळे... 

मीडिया रिपोर्टनुसार, मुंबईच्या गोल्डन टोबॅकोमध्ये एका दिवसात सलमान खानच्या कॅमिओचं शुटिंग पूर्ण केलं जाणार होतं, पण बाबा सिद्दिकींच्या हत्येमुळे शूटिंग रद्द करण्यात आलं. यानंतर, रोहित शेट्टी आणि अजय देवगणनं अंतर्गत चर्चा केली. त्यावेळी त्यांचं असं ठरलं की, सध्या सुरू असलेल्या प्रकरणामुळे (सलमना खानला सातत्यानं बिश्नोई गँगकडून मिळत असलेल्या धमक्या, बाबा सिद्दिकींची हत्या) सलमान खानला शूट करण्याची विनंती करणं असंवेदनशील आहे. तसेच, चित्रपटाची रिलीज डेट जवळ आली आहे. अजून सेन्सॉर बोर्डकडे चित्रपट पाठवणं बाकी आहे. त्यामुळेच निर्मात्यांनी सलमान खानच्या अनुपस्थितीशिवाय तो सीबीएफसीकडे सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सुत्रांनी सांगितलं की, पोस्ट-क्रेडिट सीनमध्ये चुलबुल पांडेचा बॅकशॉट देखील असू शकतो. मात्र, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

संपूर्ण प्रकरण नेमकं काय?

अजय देवगणचा चित्रपटात सूर्यवंशी बनलेले अक्षय कुमार आणि सिंबा बनलेले रणवीर सिंह यांच्या एन्ट्रीमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अशातच आणखी एक माहिती समोर आली की, सिंघम अगेनमध्ये बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खानही दिसून येणार. दरम्यान, 12 ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली. त्यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगनं घेतली आहे. त्यामुळे आता सलमान खानच्या जीवालाही धोका असल्याचं बोललं जात आहे. तसेच, सध्या सलमान सध्या मानसिक तणावातून जात आहे. अशात त्याला शुटिंगसाठी बोलणावणं म्हणजे, असंवेदनशील ठरेल, असं निर्मात्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे सिंघम अगेनमधून सलमान खानचा कॅमिओ कॅन्सल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Salman-Aishwarya : सलमान ऐश्वर्याचं लग्न झालेलं? न्यूयॉर्कमध्ये हनिमूनच्याही रंगलेल्या चर्चा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli District Assembly Constituency : तर अपक्ष उमेदवारीचा 'सांगली पॅटर्न'! सांगली विधानसभेच्या तिकिटासाठी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून दबावतंत्राचा अवलंब
तर अपक्ष उमेदवारीचा 'सांगली पॅटर्न'! सांगली विधानसभेच्या तिकिटासाठी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून दबावतंत्राचा अवलंब
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीकडून 6 उमेदवार घोषित! महाविकास आघाडीचा सावळागोंधळ संपेना, कोल्हापूर उत्तर भलत्याच 'धर्मसंकटात'!
कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीकडून 6 उमेदवार घोषित! महाविकास आघाडीचा सावळागोंधळ संपेना, कोल्हापूर उत्तर भलत्याच 'धर्मसंकटात'!
Maharashtra Assembly Election 2024: इच्छुकांच्या वाढत्या संख्येने भाजपची डोकेदुखी वाढली, नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट
इच्छुकांच्या वाढत्या संख्येने भाजपची डोकेदुखी वाढली, नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट
Anna Bansode: अजित पवारांनी पिंपरीत नव्या चेहऱ्याला संधी दिली तरी चालेल, अण्णा बनसोडेंच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी पिंपरीत नव्या चेहऱ्याला संधी दिली तरी चालेल, अण्णा बनसोडेंच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला, नेमकं काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 23  ऑक्टोबर 2024 : ABP MAJHAKedar Dighe Thane : एकनाथ शिंदेंविरोधात कोपरी पाचपाखाडीतून केदार दिघे ?Sunil Maharaj : सुनील महाराजांचा ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'ABP Majha Headlines :  9 AM : 23 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli District Assembly Constituency : तर अपक्ष उमेदवारीचा 'सांगली पॅटर्न'! सांगली विधानसभेच्या तिकिटासाठी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून दबावतंत्राचा अवलंब
तर अपक्ष उमेदवारीचा 'सांगली पॅटर्न'! सांगली विधानसभेच्या तिकिटासाठी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून दबावतंत्राचा अवलंब
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीकडून 6 उमेदवार घोषित! महाविकास आघाडीचा सावळागोंधळ संपेना, कोल्हापूर उत्तर भलत्याच 'धर्मसंकटात'!
कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीकडून 6 उमेदवार घोषित! महाविकास आघाडीचा सावळागोंधळ संपेना, कोल्हापूर उत्तर भलत्याच 'धर्मसंकटात'!
Maharashtra Assembly Election 2024: इच्छुकांच्या वाढत्या संख्येने भाजपची डोकेदुखी वाढली, नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट
इच्छुकांच्या वाढत्या संख्येने भाजपची डोकेदुखी वाढली, नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट
Anna Bansode: अजित पवारांनी पिंपरीत नव्या चेहऱ्याला संधी दिली तरी चालेल, अण्णा बनसोडेंच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी पिंपरीत नव्या चेहऱ्याला संधी दिली तरी चालेल, अण्णा बनसोडेंच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला, नेमकं काय म्हणाले?
Kolhapur Uttar Vidhan Sabha : अडीच वर्षांपूर्वी उमेदवारी फायनल, अर्ज भरण्याचा मुहूर्तही ठरला, तरीही राजेश क्षीरसागर कोल्हापूर उत्तरमध्ये वेटिंगवर!
अडीच वर्षांपूर्वी उमेदवारी फायनल, अर्ज भरण्याचा मुहूर्तही ठरला, तरीही राजेश क्षीरसागर कोल्हापूर उत्तरमध्ये वेटिंगवर!
Shiv sena Shinde camp candidate list: शिंदे गटाची 45 उमेदवारांची यादी जाहीर होताच पहिली बंडखोरी, प्रेमलता सोनावणे शिवसेनेच्या संजय गायकवाडांविरोधात अपक्ष लढणार
एकनाथ शिंदे गुवाहाटीत कामाख्या देवीच्या दर्शनाला, इकडे महाराष्ट्रात 'लाडक्या बहिणी'ने बंडाचं निशाण फडकावलं
दापोली ते पैठण! कुठे मुलगा तर कुठे भाऊ, शिंदेंच्या शिवसेनेत अनेक जागांवर प्रस्थापितांच्या पुढच्या पिढीला तिकीट!
दापोली ते पैठण! कुठे मुलगा तर कुठे भाऊ, शिंदेंच्या शिवसेनेत अनेक जागांवर प्रस्थापितांच्या पुढच्या पिढीला तिकीट!
Maharashtra Assembly Election 2024: धनंजय मुंडेंच्या मतदारसंघाबाबत मोठा निर्णय, परळी विधानसभेतील 112  मतदान केंद्रे अतिसंवेदनशील कॅटेगरीत, आता काय होणार?
धनंजय मुंडेंच्या मतदारसंघाबाबत मोठा निर्णय, परळी विधानसभेतील 112 मतदान केंद्रे अतिसंवेदनशील कॅटेगरीत, आता काय होणार?
Embed widget