Salman-Aishwarya : सलमान ऐश्वर्याचं लग्न झालेलं? न्यूयॉर्कमध्ये हनिमूनच्याही रंगलेल्या चर्चा
Salman Khan and Aishwarya Rai Secret Marriage Rumors : सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांनी गुपचूप लग्न केल्याची जोरदार चर्चा झाली होती. यामागचं सत्य जाणून घ्या.
Aishwarya Rai and Salman Khan Marriage Rumors : अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय ही 90 च्या दशकातील बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांची आवडती जोडी होती. ही जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटाच्या सेटवर सलमान आणि ऐश्वर्याच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सेटवर हळुहळु दोघांचं प्रेम खुललं. अनेक वर्ष दोघे रिलेशनशिपमध्येही होते, पण त्यांच्या लव्ह स्टोरीचा शेवट मात्र गोड झाला नाही.
सलमान - ऐश्वर्याची प्रेमकहाणी
सलमान खान (Salman Khan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांच्या लव्ह स्टोरीचा वाईट अंत झाला. 90 च्या दशकात सलमान आणि ऐश्वर्याच्या नात्याची जोरदार चर्चा होती. या स्टार्सच्या लग्नाची अफवादेखील उडाली होती. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांनी लग्न केल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांनी गुपचूप लग्न केल्याची अफवा पसरली होती. इतकंच नाही, तर सलमान खानसोबत लग्न करण्यासाठी ऐश्वर्याने धर्म बदलल्याचीही चर्चा होती. या अफवांमागचं सत्य जाणून घ्या.
सलमान आणि ऐश्वर्या रायचं झालं होतं लग्न?
1999 मध्ये आलेल्या 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटातून सलमान खान आणि ऐश्वर्या राय या जोडीने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं होतं. या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटाच्या सेटवर सुरु झालेल्या या प्रेम कहाणीचा 2001 मध्ये अंत झाला. यादरम्यान, मीडियामध्ये दोघांच्या लग्नाच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. सलमान आणि ऐश्वर्या यांनी लग्न केल्याची चर्चा रंगली होती.
लग्नासाठी ऐश्वर्याने धर्म बदलल्याचीही चर्चा
मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांनी मुस्लिम रितीरिवाजानुसार लग्न केल्याचं सांगितलं जात होतं. निकाह झाल्यानंतर दोन्ही स्टार्स हनिमूनसाठी न्यूयॉर्क गेल्याचं बोललं जात होतं. लोणावळामधील एका बंगल्याच हा निकाह पार पडल्याची चर्चा होती. सलमानसोबत लग्नासाठी ऐश्वर्याने धर्म बदलल्याचं बोललं जात होतं. या लग्न समारंभात जवळचे नातेवाईक आणि निवडक मित्रपरिवार सामील झाल्याचं सांगितलं जात होतं.
लग्नानंतर न्यूयॉर्कमध्ये हनिमून
मीडियामध्ये येणाऱ्या बातम्यांमध्ये असा दावा करण्यात आला होता की, 'सलमान आणि ऐश्वर्याचे आई-वडील या लग्नाच्या विरोधात असल्याने ते दोघेही लग्नाला उपस्थित नव्हते, नंतर अफवा पसरल्या की हे जोडपे हनिमूनसाठी न्यूयॉर्कला गेले आणि त्यांना मुंबईला परतण्यास सांगण्यात आलं होतं. दरम्यान, ऐश्वर्या रायचे आई-वडील तिच्या सलमान खानच्या नात्याच्या विरोधात होते, हे मात्र खरं होतं.
लग्नाच्या अफवांवर ऐश्वर्या रायची प्रतिक्रिया
एकीकडे सलमान खानने या अफवांवर मौन बाळगलं होतं, तर दुसरीकडे ऐश्वर्या रायने या अफवांवर उघडपणे प्रतिक्रिया दिली होती. BollywoodShaadi.com नुसार, सलमानसोबत लग्नावर प्रतिक्रिया देताना ऐश्वर्याने म्हटलं होतं की, "असं काही झालं तर संपूर्ण इंडस्ट्रीला कळणार नाही का? इंडस्ट्री खूप छोटी आहे. लग्नासारखी आयुष्यातील एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवेन, मी अशा प्रकारची व्यक्ती नाही. तसं असतं तर मी ते जगासमोर जाहीर केलं असते. हा सर्व फक्त मूर्खपणा आहे". असं म्हणत ऐश्वर्याने सलमान खान आणि तिच्या लग्नाच्या अफवांना पूर्वविराम दिला होता.