Bhandara Crime : 'ती' हत्या जुन्या वादातून... भंडारा पोलिसांकडून नागपूरचे दोन तरुण अटकेत
Bhandara Crime : भंडारा जिल्ह्यातील लाखनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठवडाभरापूर्वी जळालेल्या आणि पूर्णत: कुजलेल्या अवस्थेत पुरुषाचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
Bhandara Crime : भंडारा (Bhandara) ल्ह्यातील लाखनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठवडाभरापूर्वी जळालेल्या आणि पूर्णत: कुजलेल्या अवस्थेत पुरुषाचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी (Bhandara Police) दोन जणांना अटक केली आहे. अतिफ लतिफ शेख (वय 29 वर्षे) आणि फैजल परवेझ खान (वय 18 वर्षे) अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत. या दोघांवर संबंधित पुरुषाची हत्या केल्याचा आरोप आहे.
लाखनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 13 एप्रिलला जळालेल्या आणि पूर्णत: कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. संबंधित मृत पुरुष हा 30 ते 40 वर्ष वयोगटातील होता. ज्याच्या दिवशी मृतदेह आढळल्या, त्याच्या आठवडाभर आधी त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. शिवाय त्याची हत्या झाली असावी असाही पोलिसांचा अंदाज होता.
जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी हत्या
यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. मृत व्यक्ती नागपुरातील असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. पूर्ववैमनस्यातून त्याची हत्या झाल्याचं समोर आलं. याबाबत अधिक माहिती अशी की, 2017 पासून सुरु असलेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी आरोपींनी आधी माफी मागितली. नंतर दुश्मनी दोस्तीत बदलायची, असं सांगत गोडीगुलाबीने बोलून नागपुरातील तरुणाला चारचाकी वाहनाने फिरायला भंडाऱ्यात आणलं. मग लाखनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात मारहाण करत ओढणीने गळा आवळून नंतर डिझेल अंगावर टाकून जाळून टाकलं.
या प्रकरणातील मृताची ओळख पटवून भंडारा पोलिसांनी शोध घेतला. यात मृत हा नागपूर इथला असून त्याचं नावं मोहम्मद तन्वीर अब्दुल रज्जाक शहा (वय 24 वर्षे) असल्याचं स्पष्ट झालं. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी अतिफ लतिफ शेख (वय 29 वर्षे) आणि फैजल परवेझ खान (वय 18 वर्षे) अशा दोघांना अटक केली आहे.
धारदार शस्त्राने हत्या करुन इसमाचा मृतदेह फेकला
दरम्यान 6 एप्रिल रोजी धारदार शस्त्राने हत्या करुन इसमाचा मृतदेह फेकल्याची घटना समोर आली होती. हत्या केल्यानंतर मृतदेह सुमारे 200 मीटर फरफटत नेत रस्त्याच्या कडेला फेकला होता. ही घटना भंडाऱ्यातील जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नंदोरा ते शहापूर मार्गावर उघडकीस आली होती. जिशान मोहम्मद शेख रा. धरगाव असं मृताचं नावं होतं. त्याच्या हत्येचं कारण कळू शकलेलं नाही. दोन दिवसांपूर्वी याच ठाण्याअंतर्गत येणाऱ्या निहारवानी गावालगत एका तरुणाची हत्या करण्यात आली होती, हे विशेष.
हेही वाचा