एक्स्प्लोर

Bhandara Crime : प्रेमाच्या त्रिकोणात मध्यस्थी करणाऱ्या मित्राची हत्या, भंडारा पोलिसांकडून दोघे अटकेत, एका अल्पवयीन आरोपीचा समावेश

Bhandara Crime : एकाच तरुणीवर दोघांचं प्रेम असल्याने या प्रेमाच्या त्रिकोणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या मित्राला स्वतःचा जीव गमवावा लागल्याची घटना भंडाऱ्यात (घडली.

Bhandara Crime : एकाच तरुणीवर दोघांचं प्रेम असल्याने या प्रेमाच्या त्रिकोणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या मित्राला स्वतःचा जीव गमवावा लागल्याची घटना भंडाऱ्यात (Bhandara) घडली. या घटनेने भंडारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून यात एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. अवेज शेख (वय 19 वर्षे) असं मृताचं नावं असून श्रेयस वाहने (वय 17 वर्षे) असं जखमीचं नावं आहे. तर, पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीत तन्वीर पठाण आणि एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. मृत हा मित्रासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेला असता त्याच्यावर आरोपीने धारदार शस्त्राने हल्ला करुन त्याची हत्या केली. 

काय आहे प्रकरण?

नागपूर (Nagpur) इथल्या तन्वीर पठाण आणि भंडारा इथल्या प्रणय कांबळे या दोघांचं एकाच मुलीवर प्रेम होतं. तरुणीचं एकचवेळी दोघांसोबत प्रेमप्रकरण (Love Affair) सुरु असल्याची बाब जेव्हा प्रणय आणि तन्वीर यांना माहित झाली, तेव्हा दोघांमध्ये फोनवर चांगलाच वाद झाला. त्यानंतर वाद मिटवण्यासाठी प्रणयने त्याचा मित्र अवेज शेखला भंडाऱ्यात बोलावलं. जवाहरनगर पोलीस स्टेशन हद्दीतील निहारवाणी गावाच्या मार्गावर तन्वीर आणि त्याचा अल्पवयीन मित्र हे दोघे आले. मात्र, त्यांच्या भेटीसाठी प्रणय स्वतः न जाता त्याचे मित्र अवेज शेख आणि श्रेयस वाहने हे दोघे गेले. यावेळी चौघांमध्ये चांगलाच वाद झाला आणि त्यात तन्वीरने आपल्यासोबत आणलेल्या धारदार शस्त्राने अवेज शेखवर सपासप वार केला. यावेळी अवेज हा गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. तर, श्रेयस हा मित्र अवेजला वाचवण्याच्या प्रयत्नात गंभीर जखमी झाला. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी (Bhandara Police) तन्वीर आणि त्याचा सहकारी अल्पवयीन अशा दोघांना अटक केली आहे.

भंडाऱ्यात याआधीही प्रेमाच्या त्रिकोणात हल्ल्याचा थरार

भंडाऱ्यात याआधीही प्रेमाच्या त्रिकोणातून अशीच घटना घडली काही महिन्यांपूर्वी घडली होती. एका तरुणीने पहिल्या प्रियकराच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराला सरप्राईज गिफ्ट आणल्याचं सांगत त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. ही घटना भंडारा तालुक्यातील झिरी देवस्थानाच्या टेकडीवर घडली होती. दरम्यान याप्रकरणी प्रेयसीसह एका तरुणावर जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गोकुळ वंजारी असं जखमी असलेल्या प्रियकराचं नाव आहे. भंडारा तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे एका तरुणासोबत चार वर्षांपासून प्रेम प्रकरण होतं.  त्यात गोकुळ वंजारी याची एन्ट्री झाली. पहिल्या प्रियकराची साथ सोड असं गोकुळने प्रेयसीला सांगितले. तिने ही माहिती पहिला प्रियकर नीरज यास दिली. त्यांनी गोकुळचा काटा काढण्याचा कट रचून त्याला झिरी देवस्थानच्या टेकडीवर बोलावून हल्ला केला. याप्रकरणी प्रेयसीसह नीरज पडोळे याच्याविरुद्ध जवाहरनगर पोलिसात भादंवि 307, 34 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मल्टीकलर साडी, ऑफ शोल्डर ब्लाऊज; जान्हवीच्या क्लासी अदा, म्हणाली,
मल्टीकलर साडी, ऑफ शोल्डर ब्लाऊज; जान्हवीच्या क्लासी अदा, म्हणाली, "कसाटा खाण्याची इच्छा होती, तर..."
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Embed widget