(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Election : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्यास प्रशासन सज्ज, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडेंची माहिती
Election : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका (loksabha Vidhansabha Election 2024) एकत्र झाल्यास निवडणूक आयोग आणि प्रशासन सज्ज असल्याचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे म्हणाले.
loksabha Vidhansabha Election 2024 : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका (loksabha Vidhansabha Election 2024) एकत्र झाल्यास निवडणूक आयोग (Election Commission) आणि प्रशासन सज्ज असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे (Shrikant Deshpande) यांनी दिली. निवडणुकीच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी ते भंडाऱ्यामध्ये (Bhandara) आले होते. त्यावेळी ते बोलत होते. निवडणुकीच्या पूर्व तयारीच्या अनुषंगाने सध्या देशपांडे हे राज्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी विदर्भातून दौऱ्याची सुरुवात केली आहे.
निवडणुकांच्या दृष्टीने सर्व अडचणींवर मात करुन तयारी करणं हा उद्देश
कुठलीही निवडणूक महिनाभरात होत नाही, त्याला पुरेसा कालावधी मिळतोच. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आणि निवडणूक यंत्रणेची माहिती घेणे आणि मार्गदर्शन करण्यासाठी आढावा दौरा सुरु केला आहे. सर्व अडचणींवर मात करुन तयारी करणे हा या दौऱ्यामागील मुळ उद्देश असल्याचं श्रीकांत देशपांडे यांनी सांगितलं. 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या दोन्ही निवडणुका एकत्र झाल्यास निवडणूक आयोग आणि प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.
तब्बल 32 लाखांपेक्षा अधिक मतदारांचे यादीतील फोटो सारखेच
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार याद्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यात धक्कादायक माहिती समोर आली असून, मतदार यादीतील तब्बल 32 लाखांपेक्षा अधिक मतदारांचे यादीतील फोटो सारखेच आहे. त्यामुळं यात बनावट कुठले हे पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरु असून बनावट मतदारांना यादीतून वगळण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगतिले. निवडणुकीच्या अनुषंगानं मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरु असून, यामध्ये महाविद्यालयीन तरुणांना समाविष्ट करण्यावर भर देण्यात येत आहे. 18 वयापेक्षा जास्त वयोगटातील 40 टक्केपर्यंत मृत मतदारांची नावे यादीत असून ती नावे वगळली जाणार असल्याची माहितीही यावेळी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या: