Subhash Jadhav passes away: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य समिती सदस्य कॉम्रेड सुभाष जाधव यांचे निधन; चळवळीतील लढवय्या तारा हरपला
Subhash Jadhav: सुभाष जाधव यांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात एसएफआयपासून केली. तेव्हापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत ते चळवळीशी जोडले गेले.

Subhash Jadhav passes away: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य समिती सदस्य, कोल्हापूर जिल्हा समितीचे सचिव कॉ. प्रा. डॉ. सुभाष आत्माराम जाधव (रा. कोल्हापूर) यांचे आज (28 सप्टेंबर) निधन झाले. आज सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांना इस्पितळात दाखल करण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. निधनसमयी त्यांचे वय 65 वर्षे होते. त्यांच्या अंत्यविधीसाठी कोणतेही धार्मिक विधी केले जाणार नाहीत. त्यांचे पार्थिव शांतिनिकेतन हायस्कूलजवळील निवासस्थानापासून शववाहिकेतून पंचगंगा घाटावर नेण्यात आले. विद्युतदाहिनीत जाधव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
संपूर्ण हयात चळवळीत
सुभाष जाधव यांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात एसएफआयपासून केली. तेव्हापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत ते चळवळीशी जोडले गेले. दोन दिवसापूर्वी चंदगडमधील साखर कारखाना कामगारांच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनाच्या निमित्ताने ते सक्रीय होते. त्यामुळे त्यांचा अकाली एक्झिट चळवळीसाठी खूपच धक्कादायक आणि पोकळी निर्माण करणारी भावना व्यक्त होत आहे. सुभाष जाधव सीआयटीयू या कामगार संघटना महासंघाचे महाराष्ट्र सचिव, महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार युनियनचे सचिव, चंदगड तालुका साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनचे जिल्हा कमिटी सदस्य अशा विविध पदांवर कार्यरत होते.
इतर महत्वाच्या बातम्या






















