एक्स्प्लोर
मुलांशी बोलण्यास मज्जाव करणाऱ्या शिक्षकाने तरुणीला मारलं; तिनेही मग फिल्मी स्टाईल बदडले!
सदर संपूर्ण प्रकार भंडाऱ्याच्या तुमसर शहरात काल सायंकाळी घडला. यानंतर तरुणीनं शिक्षकाची कॉलर पकडून थेट तुमसर पोलिसात ओढत नेतं शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली.
भंडारा: संगणकाचा वर्ग आटोपून मोबाईलवर बोलत घराकडे जाणाऱ्या तरुणीला वाटेत अडवून मोबाईलवर मुलांशी का बोलत आहे? असं म्हणत, एका तरुण शिक्षकानं मारहाण केली. वर्दळीच्या भर रस्त्यात शिक्षकाकडून मारहाण झाल्यानं तरुणीनंही मगं शिक्षकाला चांगलीच मारहाण केली. हा मारहाणीचा प्रकार सुरू असताना तिथं उपस्थित नागरिकांनीही शिक्षकास चांगलेच बदळले.
सदर संपूर्ण प्रकार भंडाऱ्याच्या तुमसर शहरात काल सायंकाळी घडला. यानंतर तरुणीनं शिक्षकाची कॉलर पकडून थेट तुमसर पोलिसात ओढत नेतं शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली. तरुणीला भर रस्त्यात मारहाण झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतरही तुमसर पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध छेडछाड आणि विनयभंगचा गुन्हा नोंद नं करता रात्री उशिरा केवळ अदखलपात्र गुन्हाची नोंद केली. नंदकिशोर उके असं शिक्षकाचं नाव आहे.
14 वर्षीय शाळकरी मुलांची इमारतीवरून उडी घेत केली आत्महत्या-
लातूर शहरातल्या खाजगी क्लासेस परिसरात एका 14 वर्षीय शाळकरी मुलांने क्लासेसच्या इमारती वरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत या मुलाने आत्महत्या केल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.. दरम्यान जखमी मुलाला उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णाला दाखल करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले आहे. दरम्यान या घटनेबाबत लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर अधिकचा तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करत आहेत.
एकुलता एक मुलगा शिक्षणासाठी लातूर
मयत मुलाचे वडील हे शेतकरी असून त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आपला मुलगा डॉक्टर व्हावा यासाठी त्यांनी लातूरला भाड्याने घर घेऊन वास्तव्य केले होते. दरम्यान त्याला फाउंडेशन कोर्ससाठी नालंदा कॅम्पस येथे शिकवणीही लावली होती. तो नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी घरातून बाहेर पडला आणि स्वतःचे जीवन संपवत आणि प्रश्न मागे ठेवले...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
Advertisement