एक्स्प्लोर

Walmik Karad : अबब...! वाल्मिक कराड किती रुपयांचा टॅक्स भरायचा?; धक्कादायक आकडेवारी आली समोर

Walmik Karad Property Income Tax: वाल्मिक कराडची परदेशात देखील संपत्ती असल्याचा संशय सीआयडीला आहे. याबाबत तपास देखील सुरु आहे.

Walmik Karad Property Income Tax: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाचे सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्या आणि त्याच्या दोन्ही पत्नींच्या नावे पुण्यात (Pune) अनेक ठिकाणी कोट्यवधींची मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. काही वर्षांपुर्वी घरगडी असलेला कराड इतकी मालमत्ता जमवतो कशी? ऊसतोडीसाठी जिथले मजूर पोटावर संसार बांधत देशभरात जातात त्याच परळीत वाल्मिक कराड इतकी माया जमवतो कशी? ना यशस्वी उद्योजक, ना कुशल शेतकरी, ना वडिलोपार्जित संपत्ती, ना शेअर मार्केटमधला तज्ज्ञ, ना मोठी दुकानं... मग इतके कोटी कमावले कसे? इतकी संपत्ती आली कुठुन?, असा सवाल आता संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे. 

वाल्मिक कराड किती रुपयांचा कर भरायचा? (How much tax did Walmik Karad pay?)

वाल्मिक कराड हा अधिकृतपणे आयकर विभागाकडे वार्षिक किती लाख रुपयांचा कर भरायाचा, याची माहिती समोर आलेली आहे. साधारण आपल्याकडे 10 टक्के, 20 टक्के आणि 30 टक्के अशी करची प्रणाली आहे. तसेच तुमच्याकडे जर अधिकचा पैसा असेल तर सरचार्ज लागतो. अमेरिकेत सरचार्ज जसा श्रीमंतांना द्यावा लागतो. तसे भारतात देखील वेगवेगळ्या पद्धतीचे सरचार्जेस आहेत आणि जो अधिकचा आहे, त्याला 34 ते 35 टक्के कर भरावा लागतो. ऊसतोड कामगाराचा मुलगा वाल्मिक कराडची आतापर्यंत अनेक ठिकाणी संपत्ती असल्याचं समोर आलं आहे. वाल्मिक कराडची परदेशात देखील संपत्ती असल्याचा संशय सीआयडीला आहे. याबाबत तपास देखील सुरु आहे. आता वाल्मिक कराड आयकर विभागाकडे वार्षिक जवळपास 96 लाख रुपये कर भरत होता, अशी माहिती समोर आलेली आहे. 

वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर-

वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांचे एकत्रित 29 नोव्हेंबरचे सीसीटीव्ही फुटेज झाले समोर आले आहे. आवादा कंपनीकडे खंडणी मागितली, त्या दिवशीचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. केज शहरातील विष्णू चाटेच्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराड 29 नोव्हेंबरला आला होता. त्यावेळी त्याच्यासोबत सुदर्शन घुले आणि प्रतिक घुले हे सुद्धा या फुटेजमध्ये पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे केज पोलीस स्टेशनचे निलंबित पीएसआय राजेश पाटील हेसुद्धा यावेळी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेसोबत दिसत आहेत. त्यामुळे खंडणी प्रकरणातील हा सर्वात मोठा पुरावा असल्याचं बोललं जात आहे. 

वाल्मिक कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा, CCTV मध्ये मारेकरी-पोलीस एकत्र दिसले, VIDEO: 

संबंधित बातमी:

Walmik Karad Jyoti Jadhav: वाल्मिक कराडचा आणखी एक प्रताप समोर; ज्योती जाधवच्या नावानं मांजरसुंब्यात मोठं घबाड

Walmik Karad: वाल्मिक कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, सीसीटीव्ही फुटेजमध्ये मारेकरी-पोलीस एकत्र दिसले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Jabalpur Property: डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार, प्रकरण नेमकं काय?
डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार
वाशिमच्या कारंजा पोहा मार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, 9 गंभीर जखमी, वाहनांचा चक्काचूर
वाशिमच्या कारंजा पोहा मार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, 9 गंभीर जखमी
Bombay High Court : मुंबई हायकोर्टानं ईडीला ठोठावला 1 लाखाचा दंड, तपास यंत्रणा नागरिकांचा छळ करु शकत नाहीत, निरिक्षण नोंदवत दिला दणका
ईडी सारख्या तपास यंत्रणांनी कायद्याच्या कक्षेत काम करावं, नागरिकांना छळू नये, मुंबई हायकोर्टाकडून 1 लाख रुपयांचा दंड
Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 22 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सWankhde 50th Anniversary : वानखेडेचं अर्धशतक... बॅ. शेषरावांच्या नात मुक्ता वानखेडेंशी खास संवादDevendra Fadnavis : दावोसमध्ये पहिल्या दिवशी 4 लाख 99 हजार कोटींचे करारSpecial Report Saif Ali Khan Discharge Home : सैफ घरी परतला, पण आरोपी भारतात कसा घुसला? A to Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Jabalpur Property: डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार, प्रकरण नेमकं काय?
डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार
वाशिमच्या कारंजा पोहा मार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, 9 गंभीर जखमी, वाहनांचा चक्काचूर
वाशिमच्या कारंजा पोहा मार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, 9 गंभीर जखमी
Bombay High Court : मुंबई हायकोर्टानं ईडीला ठोठावला 1 लाखाचा दंड, तपास यंत्रणा नागरिकांचा छळ करु शकत नाहीत, निरिक्षण नोंदवत दिला दणका
ईडी सारख्या तपास यंत्रणांनी कायद्याच्या कक्षेत काम करावं, नागरिकांना छळू नये, मुंबई हायकोर्टाकडून 1 लाख रुपयांचा दंड
Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
Horoscope Today 22 January 2025 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Horoscope Today 22 January 2025 : आजचा बुधवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा बुधवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Embed widget