Walmik Karad Jyoti Jadhav: वाल्मिक कराडचा आणखी एक प्रताप समोर; ज्योती जाधवच्या नावानं मांजरसुंब्यात मोठं घबाड
Walmik Karad Jyoti Jadhav: वाल्मिक कराडची आणखी एक प्रताप समोर आला आहे.
Walmik Karad Jyoti Jadhav: बीड प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड (Walmik Karad) याला आज व्हिसीद्वारे बीड जिल्हा न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराडच्या पोलीस कस्टडीसंदर्भात आज सुनावणी होण्याचा अंदाज आहे. मात्र याआधी वाल्मिक कराडची आणखी एक प्रताप समोर आला आहे.
वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधव (Jyoti Jadhav) हिच्या नावावर बीडच्या मांजरसुंबा परिसरात 9 एकर जमीन असून या परिसराच्या आजूबाजूला एकूण 50 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप होत आहे. मांजरसुंबा येथील शेतकरी मुकेश रसाळ यांनी आरोप केला की, ज्योती जाधव यांच्या नावाने बीडच्या मांजरसुंबा येथे 9 एकर जमीन आहे. या जमिनीवर आलिशान रिसॉर्ट उभारण्याची तयारी सुरू होती. सध्या ते काम थांबले असले तरी या परिसरात 50 एकर जमीन खरेदी करण्याचा आरोप मुकेश रसाळ यांनी केला आहे.
तक्रारीवर प्रशासनाची कारवाई नाही-
ज्योती जाधव यांनी आमच्या शेतातील मुरुम उपसा करून स्वतःच्या शेतात भरला. जमीन खरेदी केल्यापासूनच हे लोक आम्हाला त्रास देत आहेत. शेतकऱ्यांनी जुलै 2024 मध्ये प्रशासनाकडे तक्रार दिली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोपही मुकेश रसाळ यांनी केली. त्यामुळे प्रशासन आतातरी मांजरसुंबा येथील शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन कारवाई करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वाल्मिक कराड प्रकरणात भाजपच्या माजी नगरसेवकाची चौकशी-
वाल्मिक कराडचे पुण्यातील फर्गुसन महाविद्यालयाच्या समोर उभारत असलेल्या इमारतीत दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे दोन ऑफीस स्पेसेस खरेदी केलीत. हा व्यवहार दत्ता खाडेंच्या मध्यस्थिने झाल्याचा सीआयडीला संशल आहे. दत्ता खाडे गोपीनाथ मुंडेंपासून वाल्मिक कराडला ओळखतात. त्यामुळे सीआयडीने चौकशीसाठी बोलावल्याचे सांगण्यात येत आहे.
ज्योती जाधवला वाल्मिक कराडपासून दोन मुलं-
ज्योती मंगल जाधवला वाल्मिक कराडपासून दोन मुलं देखील असून त्यांच्या नावे देखील काही संपत्ती खरेदी केल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील हडपसरमधील एमेनोरा पार्क टाऊनशीपमध्ये सेक्टर आर 21, टॉवर 33, 17 वा मजल्यावर 7 नंबरचा एक फ्लॅट, तर आर 21, टॉवर 33, 8 नंबरचा दुसरा फ्लॅट आणि Gera Greensville , फ्लॅट नंबर A 3 , खराडी हा आणखी एक फ्लॅट ज्योती मंगल जाधवच्या नावावर असल्याचं समोर आलं आहे.