Sharad Pawar & Dhananjay Munde: शरद पवारांचा परळीत धनंजय मुंडेंना मोठा धक्का, माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख राष्ट्रवादीत दाखल, धनुभाऊंवर सनसनाटी आरोप
Sharad Pawar & Dhananjay Munde: परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने धनंजय मुंडेंना मोठा धक्का बसलाय.

Sharad Pawar & Dhananjay Munde: परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख (Deepak Deshmukh) यांनी परळी नगरपरिषदेत विकास कामात भ्रष्टाचाराचे आरोप करत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात (NCP Sharad Pawar Faction) प्रवेश केला आहे. यावेळी खासदार बजरंग सोनवणे, आमदार जितेंद्र आव्हाड, पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ फड उपस्थित होते.
परळीतील नगराध्यक्षपदाची जागा सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी राखीव असल्याने त्यांच्या पत्नी संध्या देशमुख ही निवडणूक लढवणार आहेत. मी पक्षनिष्ठ नसून व्यक्तीनिष्ठ माणूस असल्याने मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. देशमुख यांचा प्रवेश धनंजय मुंडे यांना धक्का असल्याचे बोलले जात आहे. यावेळी त्यांनी आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.
Sandhya Deshmukh: संध्या देशमुख नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार
माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख म्हणाले की, मी व्यक्तीनिष्ठ माणूस आहे, पक्षनिष्ठ नाही. येथील आमदार, सत्ताधाऱ्यांचे काम पाहिले, कोणतेही विकास कामी केले नाही. आम्ही वारंवार ही बाब वरिष्ठांच्या कानावर घातल्यावरही यावर कुठला मार्ग निघाला नाही. यामुळे परळीतील नगराध्यक्षपदाची जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सुटल्याने मी माझ्या पत्नी संध्या देशमुख यांचा उमेदवार म्हणून प्रचार सुरू केला आहे.
Deepak Deshmukh on Dhananjay Munde: परळीतील अर्धवट विकासकामांमुळे पक्ष सोडण्याचा निर्णय
आधी गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या वादामध्ये माझे तिकीट कापले गेले होते. त्यानंतर मी अपक्ष उभा राहिलो. यात कोणीही श्रेय घ्यायचे काम नाही. परळीतील अर्धवट विकासकामांमुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सहा महिन्यापासून मी या कामाला लागलो होतो. मी लोकसभेला पंकजा मुंडे यांचे काम केले. त्यानंतर विधानसभेला धनंजय मुंडे यांचे काम केले. परळीत होत असलेल्या बोगस मतदानाबाबत मी धनंजय मुंडे साहेबांना सांगितले होते की, आपण निवडून येऊ. पण, हे प्रकार थांबवले पाहिजेत. पण त्यावर त्यांनी काहीही केले नाही. मी गेल्या दीड महिन्यापासून प्रचार करत आहे. परळीतील जनता माझ्यासोबत आहे, असे त्यांनी म्हटले.
Deepak Deshmukh on Dhananjay Munde: धनंजय मुंडेंनी सगळा मनमानी कारभार केला
दीपक देशमुख म्हणाले की, परळीतला होत असलेल्या बोगस कामाचा प्रकार मी अजितदादांना एक नाही तर तीन वेळेस सांगितला पण त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. सगळी मिलीभगत असल्याचे दिसून आल्यावर मी आता शरद पवार साहेबांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. हजारो कोटींचा निधी येऊन देखील परळीतले कुठलेही काम पूर्ण नाही. तीर्थक्षेत्र विकास योजनेचे काम देखील अर्धवट आहे. धनंजय मुंडे यांनी सगळा मनमानी कारभार केला. सगळा कारभार त्यांनी बंगल्यावर बसून केलाय.
Deepak Deshmukh on Dhananjay Munde: धनंजय मुंडे बोगस मतदानावर निवडून आले
परळीत सगळे आम्हाला अर्धवटराव म्हणतात. कारण नगराध्यक्ष म्हणून आम्हाला धनंजय मुंडे यांनी काम करू दिलं नाही. आता कामे पूर्ण करण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आलोय अर्धवट कामे आता पूर्ण करायची आहेत. आतापर्यंत जेवढी करोडो रुपयांची टेंडर काढली त्या सगळ्या फाईल नगरपरिषदेतून गायब आहेत. हजारो कोटीची कामे त्यामुळेच अर्धवट आहेत. धनंजय मुंडे हे बोगस मतदानावर निवडून आले आहेत. त्यांना विधानसभेला जेवढी मत मिळाली ती आता मिळतायत का बघा. आम्ही बोगस मतदान होऊ देणार नाही. मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रातील सगळे सीसीटीव्ही काढून टाकले होते आणि त्यांच्याच कार्यकर्त्यांनी जाऊन बोगस मतदान केलं आहे, असा आरोप दीपक देशमुख यांनी केलाय.
आणखी वाचा























