एक्स्प्लोर

संतोष देशमुखांच्या हत्येला 60 दिवस उलटले, कृष्णा आंधळे फरार, तपास कुठपर्यंत आला? प्रत्येक दिवसाची अपडेट पाहा

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुखांच्या हत्येला 60 दिवस उलटले, कृष्णा आंधळे फरार, तपास कुठपर्यंत आला? प्रत्येक दिवसाची अपडेट पाहा

Santosh Deshmukh Murder Case : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 60 दिवस झाले आहेत. या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर वारंवार आरोप होत असलेला तसेच मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड याच्यावर खंडणीचा गुन्हा तसेच मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

6 डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता अशोक घुले, सुदर्शन घुले, प्रतिक घुले आणि इतर अनोळखी इसमानी आवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्पात अनधिकृत प्रवेश केला आणि प्रकल्प अधिकारी शिवाजी थोपटे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला..

9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला. सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.

10 डिसेंबर रोजी यातील दोषी आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी तब्बल बारा तास अहमदपूर अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग चक्काजाम करण्यात आला. त्याच दिवशी या प्रकरणात जयराम चाटे आणि महेश केदार या दोघांना अटक केली..

मनोज जरांगे पाटील यांच्या मध्यस्थी नंतर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन मागे घेऊन सरपंच देशमुख यांच्या मृतदेहावर 24 तासानंतर अंत्यसंस्कार झाले. 

11 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेने प्रतिक घुलेला पुण्यातील रांजणगाव येथून अटक केली.

11 डिसेंबर रोजी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करत थेट वाल्मीक कराडवर आरोप करत यांना दोषी ठरवले..

तर सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील देशमुख कुटुंबाची भेट घेतली यातील राक्षसी प्रवृत्तीचे लोक दहशत निर्माण करत असून कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली..

11 डिसेंबर रोजी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड अजित पवार गटाचे केज तालुका अध्यक्ष विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले याच्यावर केज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला..

12 डिसेंबर रोजी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेऊन या गुन्हेगारांचे जे कोणी आका असतील... त्यांच्यावर पहिल्यांदा कारवाईची मागणी केली...

13 डिसेंबर रोजी संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती..

तर त्याच 13 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आला...

14 डिसेंबर रोजी केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले...

14 डिसेंबर रोजी आरोपी विष्णू चाटेची अजित पवार गटातून हकालपट्टी करण्यात आली..

या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात पाहायला मिळाले.. बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके आणि नमिता मुंदडा यांनी यात न्यायाची मागणी केली...

18 डिसेंबर रोजी देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेला अटक करण्यात आली...

19 डिसेंबर रोजी सरपंच देशमुख यांचा शवविच्छेदनाचा अहवाल आला.. यात त्यांच्या अंगावर 56 जखमा आढळून आल्या.. आणि मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झालं..

21 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली झाली.. आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला..

21 डिसेंबर रोजी शरद पवार त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनी देशमुख कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले..

तर 21 डिसेंबर रोजी नवनीत कावत यांची पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली..

24 डिसेंबर रोजी मसाजोग येथील आवादा एनर्जी पवनचक्की येथे झालेल्या मारहाण तसेच खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आला..

28 डिसेंबर रोजी तीन आरोपींच्या अटकेच्या मागणीसह वाल्मीक कराडवर खून प्रकरणात गुन्हा नोंदवून अटक केली जावी.. या मागणीसाठी सर्वपक्षीयांचा मोर्चा काढण्यात आला..

30 डिसेंबर रोजी वाल्मीक कराड यांच्यावर गुन्हा नोंदवून अटक करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सत्यशोधक आंदोलन केले..

31 डिसेंबर रोजी वाल्मीक कराड पुण्यात सीआयडीला शरण गेला.. त्याच दिवशी उशिरा केज न्यायालयात कराडला हजर केले असता न्यायालयाने 14 दिवसांची कोठडी सुनावली..

3 जानेवारी रोजी देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पळून जाण्यास मदत केलेल्या डॉक्टर संभाजी वायबसेला एसआयटीने चौकशीसाठी ताब्यात घेतले..

4 जानेवारी रोजी फरार आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली..

तर त्याच दिवशी संतोष देशमुख यांचे लोकेशन देणारा सिद्धार्थ सोनवणे याला देखील कल्याण मधून अटक करण्यात आली.

या तिन्ही आरोपींना 14 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली..

6 जानेवारी रोजी जयराम चाटे, प्रतिक घुले, महेश केदार आणि विष्णू चाटे यांना केज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यातील 3 आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

7 जानेवारी रोजी पुण्यात सीआयडीला शरण येण्यापूर्वी वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ गाडी पोलिसांनी जप्त केली.

10 जानेवारी रोजी विष्णू चाटेला संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशीसाठी घेण्यासाठी सीआयडीने न्यायालयात अर्ज केला.

11 जानेवारी रोजी देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली.

16 जानेवारी रोजी वाल्मीक कराड याला एसटीने ताब्यात घेतले.

18 जानेवारी रोजी देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे न्यायालयात हजर करण्यात आले.

22 तारखेला वाल्मीक कराड vc द्वारे न्यायालयात हजर

27 तारखेला सुदर्शन घुले याला पुन्हा पोलीस कोठडी 

दरम्यान यातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे..

29 तारखेला पुन्हा सी आय डी ने कृष्णा आंधळेच्या आई वडिलांची चौकशी केली..

30 तारखेला धनंजय मुंडे हे भगवानगडावर मुक्कामी गेले आणि भगवान बाबाचे दर्शन घेतले यावेळी महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली..

31 तारखेला पुन्हा सुदर्शन घुलेला न्यायालयीन कोठडीतून बाहेर काढून पोलीस कोठडी मध्ये रवानगी करण्यात आली यावेळी पाच दिवसाचे पोलीस कोठडी सुदर्शन घुले ला बीड चा विशेष न्यायालयाने बजावली 

एक फेब्रुवारी रोजी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय भगवानगडावर जाऊन नामदेव शास्त्रीला भेटले आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पुरावे दिले..

3 फेब्रुवारीला नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांनी मस्साजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली आणि सांत्वन केले..

आतापर्यंत या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटीच्या माध्यमातून जवळपास दीडशेहून अधिक जणांची चौकशी करण्यात आली. यात वाल्मीक कराड यांच्या पत्नी, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे, यांची चौकशी झाली आहे..

धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराडवर केज पोलीस ठाण्यात दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली.. या प्रकरणात गुन्हा नोंद आहे.. ज्याचा तपास सध्या सीआयडी तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयित म्हणून एसआयटी कडून तपास सुरू आहे...

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Anjali Damania VIDEO: अजित पवारांना फोन केल्यावर ते गांगरले, मुख्यमंत्र्यांना भेटून मुंडेंच्या राजीनाम्यावर निर्णय घेतो असं सांगितलं; दमानिया-अजितदादांच्या भेटीत नेमकं काय केलं? 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार

व्हिडीओ

Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
Embed widget