एक्स्प्लोर

मी फक्त 10 ते 12 कोटी खर्चून निवडणूक जिंकलो; आमदार प्रकाश सोळंकेंची उघड कबुली, गोत्यात येणार?

माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे (Majalgaon Assembly Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंकी (MLA Prakash Solanke) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

MLA Prakash Solanke : माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे (Majalgaon Assembly Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंकी (MLA Prakash Solanke) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मी फक्त 10 ते 12 कोटी रुपये खर्चून विधानसभा निवडणूक जिंकल्याचे वक्तव्य सोळंकी यांनी केलं आहे. माजलगाव विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या उमेदवारांनी 45 कोटी आणि 35 कोटी रुपये खर्च केले आहेत. मी फक्त  10 ते 12 कोटी रुपये खऱ्चून निवडून आल्याची कबुली आमदार सोळंकी यांनी दिली आहे. त्यामुळं त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. 

 राजकारणामध्ये सर्वसामान्यांची कामं करणं महत्त्वाचं, पैसा दुय्यम

निवडणूक आली की कोणीबी येतं आणि निवडणुकीत उभे राहते. कुणीबी येतो आणि पैशाच्या जोरावर निवडणुकीत उभे राहतो अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळाली. पण मी ऐकलं की माजलगाव विधानसभा मतदारसंघात एका उमेदवाराने निवडणुकीमध्ये 45 कोटी रुपये खर्च केले आहेत, असे लोक बोलतात. पण मला काही माहित नाही. दुसरा एक उमेदवार होता त्याने 35 कोटी रुपये खर्च केले असे लोक सांगतात. मी आपले फक्त दहा-बारा कोटी रुपये खर्च केले आणि निवडणूक जिंकल्याचे सोळंकी म्हणाले. राजकारणामध्ये सर्वसामान्यांची कामं करणं महत्त्वाचं आहे. पैसे दुय्यम असल्याचे सोळंकी म्हणाले. वडवणी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी सोळंकी बोलत होते. 

विधानसभा निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा किती?

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा 40 लाख रुपयांची मर्यादा ठेवली आहे. त्यामुळं विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला 40 लाखांपेक्षा अधिक रक्कम प्रचारावर खर्च करता येत नाही, असे निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. मात्र, अशातच आमदार प्रकाश सोळंकी यांनी मी 10 ते 12 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती दिली आहे. त्यामुळं आता त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला जाणार का? काही कारवाई होणार का? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. 

 

महत्वाच्या बातम्या:

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा किती, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कोणत्या अटी ?

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime Vilas Ghule Case: बीडमधील विलास घुले प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; उमेश मानेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
बीडमधील विलास घुले प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; उमेश मानेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर वरुणराजानं दिलं दर्शन, बळीराजाला दिलासा, कोण कोणत्या भागात पावसाची हजेरी?
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर वरुणराजानं दिलं दर्शन, बळीराजाला दिलासा, कोण कोणत्या भागात पावसाची हजेरी?
कापूस सोयाबीन पेरुनही उगवलं नाही, वडिलांनी घेतलेलं कर्ज फेडायचं कसं? बीडच्या तरुण शेतकऱ्यानं संपवलं जीवन
कापूस सोयाबीन पेरुनही उगवलं नाही, वडिलांनी घेतलेलं कर्ज फेडायचं कसं? बीडच्या तरुण शेतकऱ्यानं संपवलं जीवन
मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश
मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget