Abp Majha Impact: अखेर बीड जिल्ह्यातील जनावरांचे बाजार पुन्हा सुरू होणार; 'एबीपी माझा'ने मांडली होती शेतकऱ्यांची व्यथा
Beed News: शेतकऱ्यांना प्रशासनाच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
Beed News: बीड जिल्ह्यात (Beed District) लम्पीचा (Lumpy) प्रादुर्भाव कमी झाल आहे. मात्र प्रशासनाने बंदी घातल्यामुळे जनावरांचे बाजार (Animal Market) अजूनही सुरु झालेले नाहीत. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा 'एबीपी माझा'ने मांडल्या होत्या. दरम्यान 'एबीपी माझा'च्या बातमीची दखल घेत जिल्हा प्रशासनाकडून आता जनावरांचे बाजार पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
राजस्थान आणि त्यानंतर देशभरात पाय पसरवणाऱ्या लम्पी आजाराचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. दरम्यान लम्पीचा प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने राज्यभरातील अनेक जिल्ह्यात जनावरांचे बाजार बंद करण्याचे आदेश काढले होते. याचवेळी बीड जिल्हा प्रशासनाने देखील जिल्ह्यातील जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश काढले होते. मात्र आता जिल्ह्यातील लम्पीची परिस्थिती नियंत्रणात आहे. तसेच या आजाराचा प्रादुर्भाव देखील कमी झाला आहे. मात्र असे असताना जिल्ह्यातील जनावरांचे बाजार बंद असल्याने याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत होता.
'एबीपी माझा'ने मांडली होती शेतकऱ्यांची व्यथा
दरम्यान बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील 282 गावं लम्पी आजाराने बाधित झाली होती. त्यामुळे बीड जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांपासून जनावरांचे बाजार बंद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे लम्पीचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतरही जनावरांचे बाजार सुरु न झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याची बाब 'एबीपी माझा'ने समोर आणली होती. तर याबाबत वृत्त दाखवताच प्रशासनाने याची दखल घेतली आहे. तर प्रशासनाने जिल्ह्यातील जनावरांचा बाजार सुरू करण्यास अखेर परवानगी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांनी 'एबीपी माझा'चे आभार मानले आहे.
शेतकऱ्यांना मोठा दिलासा!
आधी अतिवृष्टी आणि त्यानंतर परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अशात लम्पीच्या प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने जनावरांचे बाजार बंद केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना जनावरे विकता येत नव्हते. तर नवीन जनावरे विकत घेताना अधिक पैसे मोजावे लागत होते. त्यातच आता रब्बी हंगाम संपल्यावर जनावरे विक्रीला काढताना बाजारच बंद असल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली होती. मात्र प्रशासनाने आता पुन्हा बाजार सुरु केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: