Lumpy Virus : राजस्थान सरकारचा मोठा निर्णय, लम्पीमुळं जनावरांचा मृत्यू झाल्यास मिळणार 40 हजारांची मदत; पशुपालकांना दिलासा
Lumpy Skin : राजस्थान (Rajasthan) सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. लम्पी स्कीनमुळं मृत झालेल्या जनावरांना राजस्थान सरकार 40 हजार नुकसान भरपाई देणार आहे.
![Lumpy Virus : राजस्थान सरकारचा मोठा निर्णय, लम्पीमुळं जनावरांचा मृत्यू झाल्यास मिळणार 40 हजारांची मदत; पशुपालकांना दिलासा Lumpy Skin Disease Budget 2023 Rajasthan 40 Thousand compensation for Animals die due to lumpy Skin Disease Lumpy Virus : राजस्थान सरकारचा मोठा निर्णय, लम्पीमुळं जनावरांचा मृत्यू झाल्यास मिळणार 40 हजारांची मदत; पशुपालकांना दिलासा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/10/58d007a255f7e62df8772e0d879668951676036519685579_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Lumpy Skin Disease : देशातील अनेक राज्यात लम्पी स्कीन आजारानं (Lumpy Skin Disease) थैमान घातलं आहे. लम्पी स्कीनमुळं देशातील लाखो जनावरांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या राज्यात लम्पी स्कीनचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. या आजाराचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारनं लसीकरण (Vaccination) मोहिम राबवली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना (Farmers) काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. अशातच राजस्थान (Rajasthan) सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. लम्पी स्कीनमुळं मृत झालेल्या जनावरांना राजस्थान सरकार 40 हजार नुकसान भरपाई देणार आहे.
Rajasthan Govt : राजस्थान सरकारचा पशुपालकांना दिलासा
लम्पी स्कीन आजाराचा फैलाव झाल्यानंतर देशात वेगानं लसीकरण सुरु आहे. त्यामुळं लम्पी स्कीनचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे. राजस्थानमध्ये सर्वात जास्त लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळं तेथील पशुपालक चिंतेत आहेत. पशुपालकांना दिलासा देण्यासाठी राजस्थान सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. लम्पी स्कीनमुळं मृत पावलेल्या जनावरांना 40 हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं पशुपालकांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे.
47 हजार जनावरांचा मृत्यू
राजस्थानमध्ये लम्पी स्कीनने कहर केला होता. आता याचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. सरकारने शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात पशुपालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. लम्पी स्कीनमुळं ज्यांची दुभती जनावरे मृत्युमुखी पडली आहेत, अशांना 40 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. राजस्थान हे देशातील लम्पी स्कीनमुळं सर्वाधिक प्रभावित राज्यांपैकी एक आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरच्या आकडेवारीत राजस्थानमधील लम्पीबाबत अतिशय भयावह परिस्थिती समोर आली होती. सप्टेंबरमध्ये राजस्थानमध्ये जी आकडेवारी समोर आली होती, त्यानुसार सुमारे 11 लाख प्राणी लम्पी व्हायरसच्या विळख्यात आले होते. त्यापैकी सुमारे 47 हजार जनावरांचा मृत्यू झाला होता. पशुसंवर्धन विभागाने मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबविली होती. त्याचा परिणामही दिसू लागला आहे. हळूहळू जनावरे लम्पीच्या विळख्यातून बाहेर पडत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
Lumpy Virus : वाढत्या थंडीचा शेतकऱ्यांसह पशुपालकांना देखील फटका, लम्पीमुळे ग्रासलेल्या जनावरांना थंडीमुळे विविध रोगांची लागण
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)