एक्स्प्लोर

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर लक्ष्मण हाके संतापले, म्हणाले, 'तुमच्यात दम असेल तर...'

Laxman Hake on Manoj Jarange: संतोष देशमुखांच्या हत्येकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी परभणीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी मनोज जरांगे बोलत होते. जरांगेंच्या या इशाऱ्यानंतर आता लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे.

पुणे: परभणीमध्ये संतोष देशमुखांच्या (Santosh Deshmukh) हत्येच्या निषेधार्थ काल(शनिवारी) सर्वपक्षीय नेत्यांचा मूकमोर्चा काढण्यात आला. त्यावेळी बोलताना, मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) किंवा त्यांच्या कुटुंबीयांना जर धक्का बसला तर घरात घुसून मारू असा इशारा दिला. आमचा एक संतोष देशमुख गेला, पण यापुढे आम्ही हे सहन करणार नाही. धनंजय देशमुख किंवा त्यांच्या कुटुंबीयांना जर धक्का लागला तर घरात घुसून मारू असा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला. मी आतापर्यंत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचं नाव घेतलं नाही, देशमुख कुटुंबीयांना जर त्रास झाला तर त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असाही इशारा त्यांनी यावेळी दिला. संतोष देशमुखांच्या हत्येकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी परभणीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी मनोज जरांगे बोलत होते. जरांगेंच्या या इशाऱ्यानंतर आता लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे.

नेमकं काय म्हमालेत लक्ष्मण हाके?

जरांगे घुसायची भाषा आम्हाला करू नका. तुमच्यात दम असेल तर कुठे घुसायचं ते सांगा, अशी चितवणीखोर वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीचा मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करावा. अन्यथा दोन समाजात अराजकता निर्माण होईल असंही लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.

लक्ष्मण हाके मनोज जरांगे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, हा काळ 200- 250 वर्षांपुर्वीचा नाही, मला वाटतं अशी चितावणीखोर वक्तव्य मनोज जरांगे करत असतील तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे, अशा माणसांचा तात्काळ बंदोबस्त करावा. नाहीतर जातीय तेढ निर्माण होईल सामाजिक सुरक्षा धोक्यात येईल आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन या महाराष्ट्र मध्ये अराजकता निर्माण होईल. जरांगे घुसायची भाषा आम्हाला सांगायची नाही, तुमच्यात जर दम असेल कधी, कुठे, केव्हा, ते सांगा आणि जातीय तेढ निर्माण करून काय मिळणार आहे. तो काळ गेला महाराष्ट्रात काट्या कुऱ्हाड्यांचा, आताचा काळ हा कायद्याचा, संविधानाचा आणि इथल्या न्यायव्यवस्थेचा आहे, असंही पुढे ते म्हणालेत. 

धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरवून द्यायला कोण आहेत ते जरांगे? जरांगे गुंड आहेत? जरांगे कुणी एस पी आहेत? कोण आहेत जरांगे? कायदा यांच्या मालकीचा आहे का? त्यामुळे असल्या चितावणीखोर बोलणं तुमच्या तिकडे कोणालातरी ऐकवा, अशा धमक्या या महाराष्ट्रामध्ये खूप लोकांच्या बघितलेल्या आहेत, असंही लक्ष्मण हाके पुढे म्हणालेत. 

अंजली दमानियांना देखील केलं लक्ष

अंजली दमानिया खूप चांगलं काम करतात. त्यांची तुलना इतर कोणाबरोबरच होऊ शकत नाही. त्यांना माझी एक विनंती आहे. आष्टी तालुक्यातील संजय उर्फ गुट्टा गायकवाड या पारधी समाजातील तरुणाची हत्या झालेली आहे. त्या हत्येची आमची तक्रार आम्ही अंजली दमानिया यांच्याकडे देतो. या प्रकरणाचा त्यांनी सोक्ष मोक्ष लावावा आणि त्या जशा इतर प्रकरणाची सुपारी घेतात तसंच आम्ही त्यांना या प्रकरणाची सुपारी द्यायला तयार आहोत, असंही पुढे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते जरांगे?

"धनंजय देशमुखांना तुम्ही धमक्या देताय? त्याचा भाऊ गेला आणि तो न्यायासाठी लढतोय, वणवण फिरतोय. त्याला तुम्ही धमक्या देताय. संतोष भैयाचे भाऊ जेव्हा पोलिस ठाण्यात गेले तेव्हा त्यांना धमकावण्यात आले. यापुढे जर त्यांचे कुटुंब आणि कुणाला धक्का लागला तर धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर लक्षात ठेवा. परळी असो की बीड, इथल्या समाजाला ही त्रास झाला तर घरात घुसून मारायचे. देशमुख कुटुंबीयांच्या मागे सगळा मराठा समाज आहे. आम्ही फक्त कायद्याला मानतोय, म्हणून आम्ही शांत आहोत. सगळे आरोपी पकडले जातील, फासावर जातील असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anjali Damania : बीडचे अधिकारी बीडच्या बाॅसची निष्पक्ष चौकशी करणार? या शासनाचं डोकं ठिकाणांवर आहे का? दमानियांनी वाल्मिक कराड आणि त्या पोलिस अधिकाऱ्याचा फोटोच समोर आणला!
बीडचे अधिकारी बीडच्या बाॅसची निष्पक्ष चौकशी करणार? दमानियांनी वाल्मिक कराड आणि त्या पोलिस अधिकाऱ्याचा फोटोच समोर आणला!
Santosh Deshmukh Case : मग गृह खातं झोपा काढत आहे का? तुमचा गृहखात्यावर आणि गृहमंत्र्यावर विश्वास नाही का? सुरेश धसांनी अजितदादांना घेरताच राष्ट्रवादी आक्रमक 
मग गृह खातं झोपा काढत आहे का? तुमचा गृहखात्यावर आणि गृहमंत्र्यावर विश्वास नाही का? सुरेश धसांनी अजितदादांना घेरताच राष्ट्रवादी आक्रमक 
Video : माझ्या खिशात काय... स्टीव्ह स्मिथच्या विकेटनंतर मैदानातच राडा! विराट कोहलीच्या हातवाऱ्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटणार?
माझ्या खिशात काय... स्टीव्ह स्मिथच्या विकेटनंतर मैदानातच राडा! विराट कोहलीच्या हातवाऱ्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटणार?
Anjali Damania : धनंजय आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड मानसिक छळ; सीएम फडणवीस, रश्मी शुक्लांची वेळ मागितली, अंजली दमानिया आज कोणता गौप्यस्फोट करणार?
धनंजय आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड मानसिक छळ; सीएम फडणवीस, रश्मी शुक्लांची वेळ मागितली, अंजली दमानिया आज कोणता गौप्यस्फोट करणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anjali Damania News : 'धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मानसिक छळ सुरु'- दमानियाSantosh Deshmukh News : संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज सकल मराठा समाजाचा मोर्चाMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : ABP MajhaABP Majha Headlines : 08 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 05 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anjali Damania : बीडचे अधिकारी बीडच्या बाॅसची निष्पक्ष चौकशी करणार? या शासनाचं डोकं ठिकाणांवर आहे का? दमानियांनी वाल्मिक कराड आणि त्या पोलिस अधिकाऱ्याचा फोटोच समोर आणला!
बीडचे अधिकारी बीडच्या बाॅसची निष्पक्ष चौकशी करणार? दमानियांनी वाल्मिक कराड आणि त्या पोलिस अधिकाऱ्याचा फोटोच समोर आणला!
Santosh Deshmukh Case : मग गृह खातं झोपा काढत आहे का? तुमचा गृहखात्यावर आणि गृहमंत्र्यावर विश्वास नाही का? सुरेश धसांनी अजितदादांना घेरताच राष्ट्रवादी आक्रमक 
मग गृह खातं झोपा काढत आहे का? तुमचा गृहखात्यावर आणि गृहमंत्र्यावर विश्वास नाही का? सुरेश धसांनी अजितदादांना घेरताच राष्ट्रवादी आक्रमक 
Video : माझ्या खिशात काय... स्टीव्ह स्मिथच्या विकेटनंतर मैदानातच राडा! विराट कोहलीच्या हातवाऱ्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटणार?
माझ्या खिशात काय... स्टीव्ह स्मिथच्या विकेटनंतर मैदानातच राडा! विराट कोहलीच्या हातवाऱ्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटणार?
Anjali Damania : धनंजय आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड मानसिक छळ; सीएम फडणवीस, रश्मी शुक्लांची वेळ मागितली, अंजली दमानिया आज कोणता गौप्यस्फोट करणार?
धनंजय आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड मानसिक छळ; सीएम फडणवीस, रश्मी शुक्लांची वेळ मागितली, अंजली दमानिया आज कोणता गौप्यस्फोट करणार?
Nashik Crime : गुजरातमधील बहीण भावाचा सराफा दुकानातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला; पोलिसांकडून पर्दाफाश
गुजरातमधील बहीण भावाचा सराफा दुकानातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला; पोलिसांकडून पर्दाफाश
Panipuri GST Notice : पाणीपुरीवाल्याचा ऑनलाईन पेमेंटचा आकडा पाहून जीएसटी विभागाला कडाक्याच्या थंडीत दरदरुन घाम सुटला! थेट नोटीस धाडली
पाणीपुरीवाल्याचा ऑनलाईन पेमेंटचा आकडा पाहून जीएसटी विभागाला कडाक्याच्या थंडीत दरदरुन घाम सुटला! थेट नोटीस धाडली
Weather Update : काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा ऑरेंज अलर्ट, सलग दुसऱ्या दिवशी दिल्ली विमानतळावर 400 उड्डाणांना उशीर; 19 वळवली, 45 रद्द
काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा ऑरेंज अलर्ट, सलग दुसऱ्या दिवशी दिल्ली विमानतळावर 400 उड्डाणांना उशीर; 19 वळवली, 45 रद्द
मुंबईवर धुळीचं सावट! पालिकेचा ढिसाळ कारभार, श्वास गुदमरतोय तरी हवेच्या चेकींगला एकच व्हॅन ती ही बिघडलेली!
मुंबईवर धुळीचं सावट! पालिकेचा ढिसाळ कारभार, श्वास गुदमरतोय तरी हवेच्या चेकींगला एकच व्हॅन ती ही बिघडलेली!
Embed widget