Maratha Reservation : बीडमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदीचा आदेश लागू, जाळपोळीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय
Maratha Reservation Protest : बीडमध्ये सोमवारी दिवसभर जाळपोळीच्या घटना घडल्या. त्यामध्ये तहसीलदार कार्यालय आणि राष्ट्रवादीचे कार्यालयही सुटलं नाही.
Maratha Reservation Protest : बीड शहर (Beed Maratha Reservation) प्रत्येक तालुका मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत त्यासोबतच जिल्ह्यातील प्रमुख नॅशनल हायवे वरती संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलन (Maratha Reservation Protest) पेटलं असून सोमवारी दिवसभर अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर कलम 144 लागू करण्यात आलं आहे.
बीड शहरात सोमवारी दिवसभरात घडलेल्या आंदोलन आणि विघातक घटनेमुळे आतापासून पुढल्या अनिश्चित काळापर्यंत ही संचारबंदी करण्यात आली आहे. बीड शहर तसेच तालुका मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरापर्यंतच्या परिसरामध्ये जमावबंदी आदेश म्हणजे कलम 144 बीडच्या कलेक्टर दीपा मुधोळ मुंडे यांच्या आदेशाने लागू झाले आहे. बीडमध्ये सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचं मोठं नुकसान होत असल्याने हा निर्णय घेतला आहे.
आमदार संदीप शिंदे यांचे घर आणि कार्यालय पेटवलं
बीडमध्ये संतप्त जमावाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर हे राहत असलेल्या बंगल्याला आग लावली आहे. बीडमध्ये सुरू असलेल्या 'या' जाळपोळीच्या घटनांमुळे बीडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याआधी मराठा आंदोलकांच्या जमावाने क्षीरसागर कुटुंबीयांच्या ताब्यात असलेल्या केएसके कॉलेजच्या संस्था कार्यालयाला आग लावली.
आंदोलकांनी बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय 'राष्ट्रवादी भवन' पेटवून दिले असल्याची घटना समोर आली आहे. त्याशिवाय मराठा आंदोलकांनी राजकीय पक्षांशी संबंधित हॉटेल, संस्थांच्या कार्यलयाच्या जाळपोळ झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
माजलगाव नगरपरिषद पेटवून दिली
बीड जिल्ह्यातील आमदार प्रकाश सोळुंके यांच्या घरावर मोठ्या प्रमाणात दगडफेक करून जाळपोळ करण्यात आल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर जमावाने थेट माजलगाव नगर परिषदेच्या कार्यालयाला आग लावल्याची घटना घडली.
ठिकठिकाणी रास्ता रोको
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेल्या आंदोलनाने आता उग्ररूप घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यामध्ये परळी-बीड त्यासोबतच धुळे-सोलापूर आणि त्यानंतर आता कल्याण विशाखापटनम महामार्गावर सुद्धा आंदोलन करत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कल्याण विशाखापटनम महामार्गावर तालखेड फाटा येथे मराठा समाज आंदोलन करत असून, रस्त्यावर टायर जाळून निषेध व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ही बातमी वाचा: