Dhananjay Munde: आधी म्हणाले आशीर्वाद घ्यायला येतो, मग ट्विट केलं, हेलिकॉप्टर उडत नाहीये, धनंजय मुंडेंनी बीड दौरा का रद्द केला?
Dhananjay Munde Suresh Dhas: धनंजय मुंडे-सुरेश धस आज एकाच व्यासपीठावर येणार होते, मात्र, मुंडेंचा पिंपळनेर दौरा रद्द, कारणही समोर आलं आहे.

बीड: राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपाचे आमदार सुरेश धस हे आज एकाच मंचावर येणार असल्याने बीडसह राज्याच्या राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आलं होतं. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून अत्यंत क्रूर अमानुषपणे मारहाण करून हत्या केली, त्यानंतर बीड जिल्ह्याचे सामाजिक, राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलल्याचं दिसून आलं. संतोष देशमुख यांच्या प्रकरणात आमदार धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांच्यावरती वारंवार टीका केल्याचं दिसून आलं. दोन्ही नेत्यांमध्ये काही दिवसांआधी भेट झाली. पण बंद दाराआड झालेल्या या भेटीने धस यांना अडचणीत आणले होते. त्यानंतर धस पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये दिसून आले होते. त्यानंतर आज हे दोन्ही नेते एकाच मंचावर येणार होते, मात्र काही कारणास्तव धनंजय मुंडेंचा दौरा रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे.
दौरा रद्द का झाला?
माजी मंत्री धनंजय मुंडेंनी आपल्या सोशल मिडिया एक्सवरून या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नसल्याची माहिती दिली आहे. धनंजय मुंडेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'मी पिंपळनेर (ता. शिरूर कासार) येथील संत श्री भगवानबाबा यांच्या परंपरेतील नारळी सप्ताहात येण्यासाठी सकाळी साधारण दहा वाजल्यापासून मुंबई येथील पवन हंस विमानतळावर आहे. मात्र काही तांत्रिक कारणांनी अजूनही उड्डाण करण्यास परवानगी मिळत नसल्याने माझा आजचा पिंपळनेर (शिरूर कासार) दौरा जड अंतःकरणाने रद्द करावा लागतो आहे. अध्यात्मिक कार्यक्रमास आपल्यामुळे विलंब नको म्हणून याबाबत आदरणीय शास्त्री बाबांना कल्पना दिली आहे. श्री क्षेत्र भगवानगड, आदरणीय महंत न्यायाचार्य ह.भ.प. डॉ. नामदेव महाराज शास्त्री तसेच समस्त पिंपळनेर वासियांची हृदहपूर्वक क्षमा मागतो", अशी माहिती मुंडेंनी दिली आहे.
मी पिंपळनेर (ता. शिरूर कासार) येथील संत श्री भगवानबाबा यांच्या परंपरेतील नारळी सप्ताहात येण्यासाठी सकाळी साधारण दहा वाजल्यापासून मुंबई येथील पवन हंस विमानतळावर आहे. मात्र काही तांत्रिक कारणांनी अजूनही उड्डाण करण्यास परवानगी मिळत नसल्याने माझा आजचा पिंपळनेर (शिरूर कासार) दौरा जड…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 17, 2025
माजी मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस आज एका कार्यक्रमाचे निमित्त एकत्र येणार होते.आज संत भगवान बाबा गडाचा नारळी सप्ताहाची सांगता शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर या गावी होणार आहे. यावेळी महंत नामदेव शास्त्री यांच्या काल्याचे किर्तन आहे. या ठिकाणी दोन्ही नेते एकाच मंचावर येतील. आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे दोघेही एकाच मंचावर येणार असल्याने राजकीय चर्चेला उधाण आले होते. या कार्यक्रमासाठी धनंजय मुंडे हे खास हेलिकॉप्टरने मुंबईवरून दहा वाजण्याच्या सुमारास कार्यक्रम स्थळी येणार होते. या कार्यक्रमानंतर आमदार सुरेश धस आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यात दिलजमाई होणार का? याची सध्या जिल्ह्यात चर्चा रंगली होती. मात्र, मात्र काही तांत्रिक कारणांनी अजूनही उड्डाण करण्यास परवानगी मिळत नसल्याने माझा आजचा पिंपळनेर (शिरूर कासार) दौरा जड अंतःकरणाने रद्द करावा लागतो आहे, असं मुंडेंनी म्हटलं आहे.





















