अंजली दमानियांसह मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करा, धनंजय मुंडेंचे समर्थक पोलीस ठाण्यात दाखल
बीडचा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मंत्री धनंजय मुंडे यांचे शेकडो समर्थक दाखल झाले आहेत. अंजली दमानिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मुंडेंच्या समर्थकांनी केली आहे.
Beed News : मंत्री धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मंत्री धनंजय मुंडे यांचे शेकडो समर्थक दाखल झाले आहेत. अंजली दमानिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मुंडेंच्या समर्थकांनी केली आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी देखील आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी मुंडेंच्या समर्थकांनी केली आहे. बीडनंतर आता परळीत देखील वंजारी समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
बीडनंतर आता परळीत देखील वंजारी समाज आक्रमक झाला आहे. पोलीस ठाण्यासमोर गेल्या तासभरापासून ठिय्या आंदोलन सुरु करण्जायात आलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली जात आहे. जरांगे पाटील आणि अंजनी दमानिया विरोधात याठिकाणी घोषणा दिल्या जात आहेत.
नेमकं काय म्हणाल्या होत्या अंजली दमानिया?
बीडमध्ये उच्चपदांवर वंजारी समाजाचे लोकं आहेत, असं वक्तव्य दमानिया यांनी केलं होते. त्याचबरोबर गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून हे होत आलं होतं. दरम्यान, यावर बोलताना दमानिया म्हणाल्या की, मी कोणत्याही प्रकारे जाती समाजाविरोधात बोलले नाही. ट्विटरवर स्पष्ट करण्यासाठी मी दोन मुद्दे टाकले होते. भगवान बाबा नेहमीच वंदनीय आणि आदरणीय आहेत. समाज कष्टाळू, आळशी आहे, असं मी कुठेही म्हंटलं नाही. समाजाला हा प्रकार चुकीच्या पद्धतीनं सांगण्याचे काम केले गेले. सानप, मुंडे उच्च पदावरील माणसं परळीतच का? यासंदर्भात मी बोलले आणि ते लिहिलं देखील होतं आणि दाखवलं होतं. वंजारी समाजाचा वापर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडून होतोय, यात शंका नाही.शिक्षक भरतीसंदर्भात याचिका दाखल झाली होती. बिंदू नामावली निभावू, असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, यासंदर्भात पंकजा मुंडे यांनी ट्विट करत त्याला स्थगिती दिली आणि हे फॅक्ट आहे. मी पेपरशिवाय बोलत नाही, असे म्हणत त्यांनी पंकजा मुंडे यांनी केलेले ट्विट दाखवले.
नेमकं काय म्हणाले होते मनोज जरांगे?
धनंजय देशमुखांना तुम्ही धमक्या देताय? त्याचा भाऊ गेला आणि तो न्यायासाठी लढतोय, वणवण फिरतोय. त्याला तुम्ही धमक्या देताय. संतोष भैयाचे भाऊ जेव्हा पोलिस ठाण्यात गेले तेव्हा त्यांना धमकावण्यात आले. यापुढे जर त्यांचे कुटुंब आणि कुणाला धक्का लागला तर धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर लक्षात ठेवा. परळी असो की बीड, इथल्या समाजाला ही त्रास झाला तर घरात घुसून मारायचे. देशमुख कुटुंबीयांच्या मागे सगळा मराठा समाज आहे. आम्ही फक्त कायद्याला मानतोय, म्हणून आम्ही शांत आहोत.























