एक्स्प्लोर

Rohit Pawar On Walmik Karad: वाल्मिक कराडला खास ट्रिटमेंट, रुग्णालयाचा वॉर्ड रिकामा केला; रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ

Rohit Pawar On Walmik Karad: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला आहे.

Rohit Pawar On Walmik Karad: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. सदर प्रकरणातील दोन कोटींच्या खंडणीप्रकरणी मोका लागलेले आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याला मिळत असलेल्या विशेष ट्रिटमेंटबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एक्सवर पोस्ट करत निशाणा साधला आहे. 

सदर सरकारने कै. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरूवातीपासूनच गुन्हेगारांना वाचवण्याचा ठेकाच घेतल्याची ठाम भावना महाराष्ट्राच्या जनतेची झाली आहे. यात भर म्हणजे खंडणी व हत्या प्रकरणातील मोकका लागलेल्या आरोपी वाल्मिक कराडला खास ट्रिटमेंट देण्याचे काम सिव्हिल सर्जन डॉ. अशोक थोरात हे करत असल्याची चर्चा आहे. आरोपी कराडला आराम करता यावा यासाठी हॉस्पिटलमधील एक वॉर्ड रिकामा करण्यात आला हे दुर्देवी आहे. त्याचबरोबर थोरातांवर ठराविक पद्धतीने अहवाल सादर करण्यासाठी दबाव टाकला गेला असल्याची व तो कोणी टाकला याविषयी शंका व्यक्त होत आहे. मुळात आरोपी कराडला खरंच आरोग्याची तक्रार असेल, तर त्याच्यावर  K.E.M. सारख्या हॉस्पिटलमधे उपचार करण्यात यायला हवे, अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे.

सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचा तपास देखील वेगाने पूर्ण करावा- रोहित पवार

सदर अधिकाऱ्यांच्या बरोबरच पोलीस खात्यातील आधी हेमंत कदम व आत्ता शितलकुमार बल्लाळ यांसारखे अधिकारी प्रशासकीय यंत्रणेत राहून आरोपींची ज्याप्रकारे मदत करत आहेत या वरून देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेल का? असा प्रश्न सामान्यांच्या उपस्थित होत आहे. आपल्या कर्तव्यात कचराई करणाऱ्या या अधिकाऱ्यांना बाजूला करून, पारदर्शक पद्धतीने सर्व तपास चालवावा आणि  त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचा तपास देखील वेगाने पूर्ण करावा अशी सरकारला विनंती, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

रोहित पवारांची संपूर्ण पोस्ट-

सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी-

संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुदर्शन घुले याची पोलीस कोठडी मिळवण्यासाठी एसआयटीकडून बीडच्या न्यायालयामध्ये अर्ज करण्यात आला होता. त्यावर आज सुनावणी झाली. सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधील डाटा हा फॉरेन्सीक विभागकडून रिकव्हर करण्यात आला आहे. त्यानूसार पुढे तपास करायचा आहे, असा मुद्दा मांडण्यात आला. यानंतर न्यायालयाने सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 

संबंधित बातमी:

Beed : बीडच्या कारागृहातही वाल्मिकची गँग जमली, रोज मैफील अन् सात हवालदार दिमतीला; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
South Delimitation Demand : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दक्षिणेतील मुख्यमंत्र्यांचा विरोध? राजकीय नुकसानीचा मुद्दा, अमित शाहांसमोर मोठी मागणी
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दक्षिणेतील मुख्यमंत्र्यांचा विरोध? राजकीय नुकसानीचा मुद्दा, अमित शाहांसमोर मोठी मागणी
साखरेच्या दरानं चिंता वाढवली! 10 वर्षानंतर प्रथमच भारत सरकार घेणार मोठा निर्णय, देशात सध्या किती साखर शिल्लक? 
साखरेच्या दरानं चिंता वाढवली! 10 वर्षानंतर प्रथमच भारत सरकार घेणार मोठा निर्णय, देशात सध्या किती साखर शिल्लक? 

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Embed widget