Beed News : बीडमध्ये नाल्यात वाहून गेलेल्या चिमुकल्याचा मृतदेह सापडला, 24 तासानंतर शोधकार्याला यश
Beed News Update : : बीड जिल्ह्यामधील गेवराई शहरातील नाल्यात वाहून गेलेल्या तीन वर्षाच्या चिमुकल्याचा मृतदेह आज सापडला आहे. कालपासून या मुलाचा शोध सुरू होता.
Beed News Update : बीड जिल्ह्यातील गेवराई शहरातील नाल्यात वाहून गेलेल्या तीन वर्षाच्या चिमुकल्याचा मृतदेह सापडला आहे. गेवराईमधील चिंतेश्वर भागातील ज्ञानेश्वर क्षीरसागर हा तीन वर्षाचा चिमुकला काल नाल्यात वाहून गेला होता. हा नाला विद्रुपा नदीला मिळत असल्यामुळे प्रशासन आणि गावकऱ्यांनी त्याचा विद्रुपा नदीत शोध केला होता. परंतु, काल तो सापडला नव्हता. तब्बल 24 तास त्याचा पाण्यात शोध घेतल्यानंतर अखेर आज त्याचा मृतदेह सापडला आहे.
ज्ञानेश्वर क्षीरसागर हा चिमुकला शाळेतू घरी परत येत असानात खेळत- खेळत तो अचानक नाल्यात पडला होता. पावसाच्या पाण्यामुळे नाल्यातील पाण्यात वाढ झाली होती. त्यामुळे तो नाल्यात वाहून गेला होता. त्यानंतर कालपासून प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याचा शोध सुरू होता. 24 तासानंतर ज्ञानेश्वर याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला आहे.
मृत ज्ञानेश्वर क्षीरसागर कुटुंबासोबत गेवराईमधील रंगार चौकातील चिंतेश्वर गल्ली येथे राहतो. तो राहत असलेल्या ठिकाणाहून थोड्याच अंतरावर अंगणवाडीची शाळा आहे. याच शाळेत तो शिकत होता. काल दुपारी त्याची शाळा सुटल्यानंतर एका मुलासोबत तो घरी येत असतानाच रस्त्याच्या बाजूने वाहणारा नाला त्याला दिसला नसल्याने तो पाय घसरून नाल्यात पडला होता. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. परंतु, तो पाण्यात पडला त्यावेळी तेथे होणीच नव्हते शिवाय सोबतच्या मुलाल देखील तो नाल्यात पडल्याचे कोणाला सांगता येत नव्हते. त्यामुळे तो नाल्यातील पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला. हा नाला पुढे जाऊन विद्रूपा नदीला मिळत असल्याने गावकऱ्यांनी आणि प्रशासनाने त्याची नाला आणि नदीमध्ये शोधाशोध केली. परतु. विदृपा नदीमध्ये गेवराई शहरांमधील सांडपाणी येऊन मिसळते. शिवाय आधीच पावसाचे पाणी आणि त्यात गावातील सांडपाणी नदीत मिसळत असल्याने प्रशासनाला ज्ञानेश्वरचा शोध घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. त्याबरोबरच विद्रूपा नदीमध्ये घाणीचे साम्राज्य असल्यामुळे शोध कार्यात मोठा अडथळा निर्माण होत होता अखरे आज त्याचा मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आले.
बीडमध्ये मुसळधार पाऊस
बीड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाल्यांमधील पाणीसाठा वाढला आहे. ज्ञानेश्वर क्षीरसागर पडलेल्या नाला देखील भरून वाहत आहे. त्यामुळेच नाल्यात पडताच क्षणी तो पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला होता.