एक्स्प्लोर

Beed News : बीडमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राला वीज जोडणी नसतानाही तब्बल 90 हजारांचं बिल; महावितरणच्या अजब कारभाराने आरोग्य अधिकारी चक्रावले!

Beed News : बीडमध्ये महावितरण विभागाचा अनागोंदी कारभार समोर आलाय. प्राथमिक आरोग्य केंद्राला वीज जोडणी नसताना महावितरणने 90 हजारांचे वीज बिल पाठविले आहे.

Beed News : बीडमध्ये महावितरण (Mahavitaran) विभागाचा अनागोंदी कारभार समोर आलाय. प्राथमिक आरोग्य केंद्राला (Primary Health Center) वीज (Electricity) जोडणी नसताना महावितरण विभागाने आरोग्य केंद्राला 90 हजारांचे वीज बिल पाठविले आहे. विशेष म्हणजे आरोग्य केंद्राची इमारत निर्माण झाल्यापासून इमारतीला वीजपुरवठा नाही, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.  

बीड तालुक्यातील चऱ्हाटा येथे आठ वर्षांपूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत पाच कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आली. सुरुवातीपासूनच वीज जोडणी अभावी आरोग्य केंद्राची इमारत शोभेची वस्तू बनली आहे. या इमारतीला वीज जोडणी व्हावी, याकरिता अनेक आंदोलन झाली. त्यानंतर दहा लाखांचा निधी जिल्हा प्रशासनाकडून मंजूर करण्यात आला. परंतु इमारतीला वीज जोडणी नसताना महावितरण विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्राला 90 हजारांचे विज बिल पाठविले आहे. महावितरणच्या या अनागोंदी कारभाराने आरोग्य अधिकारी देखील चक्रावले आहेत. 

प्राथमिक आरोग्य केंद्राला पाठवले 90 हजारांचे बिल

बीड तालुक्यातील चऱ्हाटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला वीज जोडणी नसल्याने परिसरातील ग्रामस्थांना वीज जोडणी अभावी प्रसुती, शस्त्रक्रिया, आंतररुग्ण विभाग या आरोग्य सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होते. रुग्णांना उपचारासाठी आर्थिक भुर्दंड सहन करून बीड येथे जावे लागते. विजेअभावी रूग्णांची हेळसांड थांबावी म्हणून वीज जोडणीसाठी निधी मिळावा यासाठी डॉ. गणेश ढवळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निवेदने व आंदोलनाच्या माध्यमातून 10 लक्ष रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडून मंजूर करून घेतला. त्याचे काम अद्याप सुरू झालेले  आणि वीज जोडणी नसताना देखील या प्राथमिक आरोग्य केंद्राला महावितरणचे तब्बल 90 हजार रुपये वीज बिल पाठवल्याची तक्रार करण्यात आली आहे.

महावितरणचा अजब कारभार समोर

या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. मदन काकड यांनी सहाय्यक अभियंता म. रा. वि. वि. कं. नवगण राजुरी बीड यांना प्राथमिक आरोग्य केंद्र च-हाटा येथे अद्याप विद्युत जोडणी झालेली नाही. त्यामुळे वीजबिलाबाबत शहानिशा करून वीजबिल येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे लेखी पत्राद्वारे कळवले आहे. तरी देखील दर महिन्याला वीजबिल येते आहे. हा आकडा आता 90 हजारांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे महावितरण विभागाचा अजब कारभार समोर आला आहे. 

आणखी वाचा 

Beed Crime: बीडमध्ये काय चाललंय काय! हॉटेल चालकाला टोळक्याने लाकडी दांडके, बेल्टने बेदम फोडून काढलं, सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime: सरपंच संतोष देशमुखांना हालहाल करुन मारणाऱ्या जयराम चाटेच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, तुरुंगाबाहेर पडताच काय घडलं?
संतोष देशमुखांना हालहाल करुन मारणाऱ्या जयराम चाटेच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, तुरुंगाबाहेर पडताच काय घडलं?
Beed Crime News: बाईक अडवून डोळ्यात मिरची पूड टाकली; कत्ती, लोखंडी रॉडने मारलं, बीडमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, नेमकं काय घडलं?
बाईक अडवून डोळ्यात मिरची पूड टाकली; कत्ती, लोखंडी रॉडने मारलं, बीडमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, नेमकं काय घडलं?
Santosh Deshmukh Case: पायात महागडी चप्पल, शर्टचं पहिलं बटण उघडं अन् चेहऱ्यावर बेदरकार भाव; सरपंच संतोष देशमुखांचा मारेकरी जयराम चाटेच्या बॉडी लँग्वेजची जोरदार चर्चा
पायात महागडी चप्पल, शर्टचं पहिलं बटण उघडं अन् चेहऱ्यावर बेदरकार भाव; सरपंच संतोष देशमुखांचा मारेकरी जयराम चाटेच्या बॉडी लँग्वेजची जोरदार चर्चा
Beed Crime: जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirdi Sai Baba Temple : शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
Iran War Live Update: तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
Pune Crime News: पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
Satara News: चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Iran War Live Update: इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
Embed widget